50. येशू परत येत आहे
जवळपास 2,000 वर्षापासून जगात सर्व ठिकाणी भरपूर लोक येशू विषयी सुवार्ता सांगत होते. मंडळी वाढत होती. येशूने सांगितले आहे की जगाच्या शेवटच्या वेळी तो परत येईल. आझून तो परत नाही आला आहे. तरीपण तो आपल्या सांगितल्या प्रमाणे करेल.
जेव्हा आम्ही येशू जवळ जाण्याची वाट बघत आहे. परमेश्वर आम्हाला अशा प्रकारे जीवन जगायला सानाग्त आहे जे पवित्र आणि त्याचे सन्मान करावे. जेव्हा येशू जगात होता. तेव्हा तो म्हणत होता. माझे शिष्य जगात सर्वलोकाना परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगतील, तेव्हा शेवट होईल.
बऱ्याच लोकांनी अझून येशूची सुवार्ता आयकली नाही. स्वर्गात जाण्याच्या पहिले, येशूने शिष्यांना त्यांना सुवार्ता सांगयला सांगितली, ज्यांनी हे कधीच नाही आयकले. त्याने सांगितले जा आणि सर्व जातीच्या लोकांना शिष्य करा, कारण कापण्यासाठी शेत पिकलेले आहे.
येशूने हे पण सांगितले, कोणत्या मालकाचा सेवक त्याच्या मालकापेक्षा मोठा नाही, ह्या जगातल्या लोकांनी माझ्याशी वाईट वागले, आणि माझ्यामुळे ते तुम्हांला पण त्रास देतील व मारून टाकतील, ह्या जगात तुम्हांला त्रास होईल, पण तुम्ही खंबीर बना, कारण मी सैतानाला हरवले आहे. जो ह्या जगावर राज्य करत आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्याशी विश्स्वसू राहणार तर परमेश्वर तुम्हांला वाचवील.
येशूने आपल्या शिष्यांना समजवण्या साठी एक गोष्ट सांगितली, जेव्हा जगाचा शेवट होईल, तेव्हा लोकांसोबत काय होईल, त्याने त्यांना सांगितले, कोणत्या माणसाने आपल्या शेतात चांगले बी पेरले जेव्हा तो झोपला तेव्हा तेव्हा त्याचा वैरी आला व गव्हाच्या बी मध्ये जंगली रोप्यांचे बी पेरून निघून गेला.
जेव्हा त्या बी मधून रोपे यायला लागली तेव्हा त्या व्यक्तीने त्याला म्हंटले, हे मालक आपण तर आपल्या शेतात चांगले बी पेरले होते, मग यात जंगली रोपे कसकाय आली? त्या व्यक्तीने उत्तर दिले, फक्त माझे वैरी हे काम करू शकता. हा माझा कोणी शत्रू आहे ज्याने हे केले आहे.
त्या सेवकांनी आपल्या मालकाला म्हणाले, काय आम्ही जंगली रोपे उपटून टाकू का? त्यांच्या मालकानी सांगितले नाही, जर तुम्ही असे कराल तर तुम्ही गहूचे रोपे पण उपटून टाकणार. कापणीच्या वेळेपर्यंत वाट बघा, तेव्हा जंगली रोपण एका खड्यात जमा करा की त्यांना आग लावता येईल. पण गहू माझ्याकडे आणा.
शिष्याना ह्या गोष्टीचा अर्थ नाही समजला, म्हणून त्यांनी येशूला समजावून सांगण्यासाठी विनंती केली. येशूने म्हंटले, चांगले बी पेरणारा मासिहाचा सेवक आहे. शेत हे एक जग आहे. आणि चांगले बी परमेश्वराच्या राज्यातल्या लोक आहे.
जंगली रोपे ते वाईट लोक ते सैतानाचे लोक आहे. आणि त्या माणसाचा वैरी सैतान आहे. ज्याने जंगली रोपे पेरले होते. कापणी ह्या जगाच्या कापणीच उदाहरन आहे. आणि कापणी करणारे परमेश्वराचे देवदूत आहे.
जेव्हा जगाचा शेवट होईल तेव्हा देवदूत त्या सर्व लोकांना एका ठिकाणी जमा करतील जे सैतानाचे आहे. देवदूत त्यांना एका खूप ज्यास्त आगीत टाकून देतील. तिथे लोक भयानक यातने मध्ये राहतील ते रडतील व दात खातील. पण जे लोक धार्मिक आहे ज्यांनी येशूला स्वीकारले आहे ते त्यांच्या परमेश्वराच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील.
येशूने हे पण सांगितले आहे की जगाच्या शेवट होण्याच्या आधी तो पृथ्वीवर येईल. तो त्याच प्रकारे परत येईल जसा गेला होता. म्हणजेच त्याच्या जवळ शरीर राहील, आणि तो आकाशात ढगांवर बसून येईल. जेव्हा येशू परत येईल तेव्हा जे विश्वासू मेलेले आहेत ते जिवंत होतील. आणि आकाशात येशूला भेटतील.
तेव्हा विश्वासू जिवंत आहेत ते आकाशात उचले जातील आणि त्या दुसर्या विश्वासू लोकामध्ये एकत्र होतील जे मेलेल्यातून जिवंत झाले आहे. ते सर्व तिथे येशू सोबत राहतील, त्याच्या नंतर येशू आपल्या लोकांसोबत राहील. जेव्हा ते एकत्र सोबत आहेत तर त्यांच्या जवळ कायमची शांती राहील.
येशूने त्याच्यावर विश्वास ठेवानाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुकुट देण्याचे वचन दिले आहे. ते परमेश्वरासोबत प्रत्येक गोष्टीवर राज्य करणार. त्यांच्या जवळ शांती असेल.
पण परमेश्वर त्या सर्वांचा न्याय करणार ज्यांनी येशूवर विश्वास नाही ठेवला, तो त्या सर्वाना नरकात टाकून देईल.तिथे ते रडतील व दात खातील. आणि ते कायम त्रासात राहतील. कधी ना विझणारी आग त्यांना जाळतच राहील, आणि किडे त्यांना खातच राहतील.
जेव्हा येशू परत येईल तेव्हा तो सैतानाला व सैतानाच्या राज्याला पूर्णपने करेल. तो सैतानाला नरकात टाकेल. तिथे सैतान नेहेमी साठी जळत राहील. त्या सर्वांनी परमेश्वराच्या गोष्टी न आयकता सैतानाच्या गोष्टी आयकल्या व त्याच्या माघे जाण्याचा निर्णय घेतला.
कारण आदाम व हव्वा ने परमेश्वराची आज्ञा मोडली आणि पापाला जगात आणले. परमेश्वराने त्यांना श्राप दिला आणि त्यांचा नाश करण्याचा निर्णय घेतला. पण एकदिवशी परमेश्वर एक नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी बनवणार जे चांगले असणार.
येशू आणि त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील, आणि सर्वकाळासाठी सर्व वस्तूवर राज्य करतील. तो त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकील, आता कोणतीच पिडा नाही दुख नाही राहणार. ते रडणार नाहीत, ते आजारी पडणार नाहीत, आणि मारणार नाही.आणि त्याठिकाणी काहीच वाईट नसणार.येशू आपल्या राज्यावर न्यायाने व शांतीने राज्य करेल. तो नेहेमीसाठी आपल्या लोकांसोबत राहील.
मत्तय 24:14; 28:18; योहान 15:20, 16:33; प्रगटीकरण 2:10; मत्तय 13:24-30, 36-42;1 थेस 4:13 5:11, याकोब 1:12, मत्तय 22: 13, प्रगटीकरण 20:10, 21:1-22:21 पासून एक पवित्र शास्त्राची गोष्ट
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।