50. येशु न पुनरागमन (येशु न परत येन)
सुमारे 2000 वरीस पासून पुरा जग मा जास्त न जास्त लोक येशु ख्रिस्त ना सुवार्ता ना बारामा आयकी ऱ्हायनात. आणि मंडळी नि वाळ हुई ऱ्हायनी. येशु नि आश्वासन दिन कि तो युग ना आखरी मा परत पृथ्वी वर येणार शे. जरी तो अद्याप उना नई, तरी बी तो आपला वचन पूर करीनच.
आपण येशु नि येवानी वाट देखातांना परमेश्वर नि अशी इच्छा शे कि आपण पवित्र आणि तेना आदर कराना जीवन जगा ले पाहिजे. आपण तेना राज्य ना बारामा दुसरास्ले सांगाले पाहिजे अशी बी तेनी इच्छा शे. जव येशु ह्या पृथ्वी वर होता तव तेनी सांग, “मना शिष्य परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता पुरा जग मा गाजाळतीन, तव शेवट हुईन.”
कारण कि गैरा लोकस्नी आजून येशु ना बारामा आयकेल नई. स्वर्ग मा जावा ना पहिले येशु नि ख्रिस्ती लोकस्ले सांग कि, ज्या लोकस्नी कदीच सुवार्ता आयकेल नई शे तेस्ले जाईसन सांगा. तेनी सांग, “ज्या आणि पुरा राष्ट्र ना लोकस्ले शिष्य बनावा.” आणि, “वावरस्मा कापणी कापा साठे तयार हुई जायेल शे.”
येशु नि हय बी सांग, “सेवक आपला मालक पेक्षा महान नई ऱ्हात. जस मले ह्या जग मधला अधिकारीस्नी मना द्वेष करा तसाच त्या तुमना बी छळ करतीन व मना नाव साठे तुमना वध करतीन. जरी बी तुमले ह्या जग मा त्रास आणि संकट शेतस तरी बी धीर धरा, कारण कि मनी सैतान वर जो ह्या जग वर राज्य करस तेले हाराई टाकेल शे.”
ह्या युग ना शेवट मा जग ना लोकस्न काय हुईन हय स्पष्ट करा साठे येशु नि शिष्यस्ले एक गोष्ट सांगी. तेनी सांग, “एक माणुस नि आपला वावर मा चांगल बी पर. जव तो जपी ऱ्हायंता, तव तेना शत्रू ईसन तेना मा गवत पर आणि तो चालना ग्या.
जव त्या बीज ले अंकुर भूटाले लागण, त्या मालक ना सेवक नि सांग, महाराज, आपण वावर मा चांगल बीज पेरेल होत. पण आते तेना मा गवत कोठून उन? मालक नि उत्तर दिध, शत्रू नि ते पेरेल हुईन.
सेवक नि आपला मालक ले सांग, आमी गवत ले उपाळी टाकुत का? मालक मी सांग, नई, जर कदी आपण असा करसुत त आपण तेना संगे गहू ले बी उपाळी टाकसुत. हंगाम लगून वाट देखा आणि नंतर गवत ले चेटाळा साठे पेंड्या बांधीसन ठेवा, आणि गहू ले मना कोठारा मा एकत्र करीसन ठेवा.”
शिष्यस्ले हय गोष्ट समजनी नई, म्हणून तेस्नी तेले समजाळीसन सांगाले विनंती करी. येशु नि सांग, “जेनी चांगल बीज पेर, तो मसीहा शे. वावर हय जग शे. चांगल बीज म्हणजे परमेश्वर ना राज्य मधला लोक.”
“गवत म्हणजे सैतान ना लोक. ज्या शत्रू नि गवत पेर, तो शत्रू म्हणजे सैतान. कापणी म्हणजे जग ना शेवट आणि कापणी करणारा म्हणजे परमेश्वर ना दूत.”
“जव जग न शेवट हुईन, तव देवदूत सैतान ना सर्वा लोकस्ले भळकणारी अग्नी मा टाकी दिन. तठे रळान आणि दात खान चालीन. तव आपला बाप ना राज्य मा नीतिमान सूर्य सारखा चमकतीन.”
येशु नि हय बी सांग कि जग ना शेवट ना पहिले तो ह्या पृथ्वी वर परत ईन. जसा तो स्वर्ग मा लेवामा उना, तसाच तो ईन, म्हणजे तेले एक शरीर राहीन व तो आकाश ना ढग वर बठीसन ईन. जव येशु परत ईन, प्रत्येक ख्रिस्ती जो मरी जायेल शे तो मरेल मधून जित्ता हुईन व अंतराळ मा येशु ले भेटीन.
तव ज्या जित्ता ख्रिस्ती ऱ्हातीन ज्या मरेल मधून जित्ता हुयेल ख्रिस्ती भावूस्ले समोर जातीन. तठे त्या सर्वा येशु ना संगे ऱ्हातीन. तेना नंतर, येशू आपला लोकस संगे परिपूर्ण शांती मा व एकता मा कायम राहीन.
येशु नि आपला वर विश्वास ठेवणारा प्रत्येकस्ले एक मुकुट देवाना आश्वासन दियेल शे. त्या तठे राहातीन व परमेश्वर ना संगे पुरी शांती मा कायम राज्य करतीन.
पण येशु वर विश्वास नई ठेवणारा प्रत्येकस्ना परमेश्वर न्याय करीन. तो तेस्ले नरक मा टाकीन, ज्या जागा वर रळान व दुख कण दात खान कायम चालीन. तेस्ले कदीच नई मलावणार अग्नी मा चेटाळा साठे टाका मा ईन व किळा तेस्ले कायम खात ऱ्हातीन.
जव येशु परत ईन, तो सैतान आणि तेना राज्य ना नाश करीन. तो सैतान ले नरक मा टाकीन, ज्या जागा वर तो कायम चेटत राहीन, तेना संगे जेस्नी तेना मांगे जावाले निवाळ व परमेश्वर नि आज्ञा नई मानी त्या बी राहातीन.
आदाम आणि हव्वा नि परमेश्वर ना आज्ञा ना उल्लंघन करा मुळे पाप ह्या जग मा उना व परमेश्वर नि तेना नाश कराना निर्णय लीधा. पण एक दिन परमेश्वर परिपूर्ण अस नवा आकाश व नवी पृथ्वी बनावणार शे.
येशु आणि तेना लोक नवीन पृथ्वी वर राहातीन, व तो अस्तित्व मा सर्वा गोष्टीस्वर कायम राज्य करीन. तो तेना सर्वा आसूस्ले पुशी टाकीन व त्या जागा वर कोणताच त्रास, शोक, रळण, दुष्टाई, दुख व मृत्यु नई राहावं. येशु आपला राज्य मा शांती कण व न्याय कण राज्य करीन व तो आपला लोकस संगे कायम राहीन.
बायबल नि गोष्ट:मत्तय 24:14; 28:18; योहान 15:20, 16:33; प्रकटीकरण 2:10; मत्तय 13:24-30, 36-42; 1 थेस्सल 4:13-5:11; याकोब 1:12; मत्तय 22:13; प्रकटीकरण 20:10, 21:1-22:21
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।