1. सृष्टी
असल्या प्रकारान सगळ्या गोष्टींची सुरवात झाली. देवान सगळा जग नी तेच्यातले सगळे वस्तु सा दिवसात बनयल्यान. पृथ्वीची निर्मिती केल्यार ती तशीच काळोखी आणि रिकामी व्हती आणि तिच्यार काययेक नव्हता. पण देवाचो आत्मो थय जलार (पाणयार) व्हतो.
मगे देव बोललो, "प्रकाश व्होन्दे!" नी प्रकाश झालो. देवान बघल्यान की प्रकाश चांगलो हा नी तेना तेका "दिवस" म्हटल्यान. देवान तेका आंधारापासना यगळो केल्यान नी आंधाराक "रात्र" म्हटल्यान. देवान सृष्टीच्या पयल्या दिवसाक प्रकाश बनवलो.
उत्पत्तीच्या दुसऱ्या दिवसाक, देव बोललो नी पृथ्वीच्या वरती आकाश बनवल्यान. तेना वरच्या आणि खालच्या पाणयाक यगळा करून आकाश बनयल्यान.
तिसऱ्या दिवसाक, देव बोललो आणि पाणयापासना कोरडी जमिन यगळी केल्यान. तेना कोरड्या जमनिक "पृथ्वी" नी पाणयाक "समुद्र" म्हटल्यान. देवान बघल्यान की तेना जा काय निर्माण केल्यान ता चांगला हा.
मगे देव बोललो, "पृथ्वीर येगयेगळ्या प्रकाराची झाडा तयार व्होन्देत." आणि तसाच झाला. देवान बघल्यान की तेना जा काय बनयल्यान ता सगळा चांगला हा.
सृष्टीच्या चौथ्या दिवसाक, देवान आपल्या शब्दान सूर्य, चंद्र आणि तारे बनयल्यान. देवान तेंका पृथ्वीर प्रकाश देवसाठी नी दिवस-रात्र, ऋतु नी वर्षा दाखवक बनयल्यान. देवान बघल्यान की तेना जा काय निर्माण केल्यान ता सगळा चांगला हा.
पाचव्या दिवसाक, देवान जलचर प्राणी नी पक्षी बनयल्यान. देवान बघल्यान की ह्या चांगला हा नी तेना तेंका आशिर्वाद दिल्यान.
उत्पत्तीच्या साव्या दिवसाक, देव बोललो, "पृथ्वीर वस्ती करणारे प्राणी तयार व्होन्देत!" आणि देवबाप बोलल्याप्रमाण सगळा काय झाला. ह्या प्रकारान काय ग्रामपशु, जमनीर रांगणारे नी काय वन्यपशु निर्माण झाले. नी देवान बघल्यान की ह्या चांगला हा.
मगे देव बोललो, "आपल्या प्रतिरुपाचो माणूस आपण करायचो. तेंका पृथ्वीर नी सगळ्या प्राण्यांवर सत्ता चालवक येयत."
मगे देवान मातीपासना माणूस निर्माण केल्यान नी तेच्या नाकपुड्यात जीवनाचो श्वास फुकल्यान. ह्या माणसाक आदाम ह्या नाव दिल्यानं. देवान आदामाक ऱ्हवासाठी येक बाग निर्माण केल्यान नी तेची काळजी घेवसाठी तेका थय ठेयल्यान.
बागेच्या मधी देवान दोन खास झाडा लावल्यान - जीवनाचा झाड नी बऱ्यावायटाचा ज्ञान करून देणारा झाड. देवान आदामाक सांगल्यान की तेना बागेतल्या खयच्याव झाडाचा फळ खायचा, फक्त बऱ्यावायटाचा ज्ञान करून देणाऱ्या झाडाचा फळ खाव नये. जर तेना त्या झाडाचा फळ खाल्यान, तर तो खास मरात.
मगे देव बोललो, "माणूस यकटो असना ह्या बरा नाय." प्राण्यांतूर आदामाक योग्य जोडीदार मिळालो नाय.
मगे देवान आदामाक गाढ झोप लागाक दिल्यान. मगे देवान आदामाच्या येका फासळीपासना येक बाय-माणूस तयार करून तेका आदामासमोर आणल्यान.
आदामान तेच्याकडे बघून म्हटल्यान, "शेवटाक मिळाली! ही तर माझ्यासारखीच हा! तिका 'नारी' म्हणायचा, कारण ती नरापासना बनवलली हा." आणि म्हणानच बापयो आपल्या आवशी-बापाशीक सोडून आपल्या बायलेक जडान ऱ्हवता.
देवान आपल्या प्रतिरुपाचे बाय-बापयो बनवल्यान. देवान तेंका आशीर्वाद दिल्यान, "तुमका मॉप झिल-चेडवा नी नातवंडा व्होन्देत नी पृथ्वी व्यापून टाका!" देवान बघल्यान की सगळा काय चांगला हा नी त्या सगळ्याविषयी तो आनंदित झालो. ह्या सगळा उत्पत्तीच्या साव्या दिवसाक घडला.
सातव्या दिवसाक उत्पत्तीचा काम पुरा झालला व्हता. मगे आपल्या कामापासना त्या दिवसाक देवान इश्रांती घेतल्यान. देवान सातव्या दिवसाक आशिर्वादित करून पवित्र ठरवल्यान कारण त्या दिवसाक तेना कामापासना इश्रांती घेतल्यान. ह्या प्रकारान जग नी तेच्यातला सगळा काय देवान निर्माण केल्यान.
बायबलातली गोष्ट:उत्पत्ति 1 -2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।