1. जग

1. जग — चित्र 1

ह्या प्रकारे सुरुवातीला देवाने सर्व गोष्टीची निर्मिती केली. त्याने सहा दिवसात जग आणि जगात असणार्या गोष्टीची निर्मिती केली. देवाने पृथ्वी बनवली त्या वेळेस तिच्यावर अंधार आणि संपाट होती. कारण देवाने अझून तिच्यावर काहीच बनवले नव्हते. पण देवाचा आत्मा त्या पाण्यावर फिरत होता .

1. जग — चित्र 2

मग देव बोलला, “प्रकाश होवो “ आणि प्रकाश झाला. देवाने बघितले की प्रकाश चांगला आहे आणि त्याला दिवस म्हंटले .आणि त्याने अंधाराला वेगळे केले आणि त्याला रात्र असे म्हंटले .देवाने जग बनवण्याच्या आधी प्रकाशाची निर्मिती केली हा पहिला दिवस होता.

1. जग — चित्र 3

जग बनविण्याच्या दुसर्या दिवशी देव बोलला, “ पाण्याच्या वरती अंतर होवो. आणि अंतर झाले. देवाने त्या अंतराला आकाश म्हंटले

1. जग — चित्र 4

तिसर्या दिवशी देव बोलला, “ पाणी एका जागेवर जमा होवो. आणि कोरडी जमीन दिसो. त्याने कोरड्या जमिनीला पृथ्वी म्हंटले आणि पाण्याला समुद्र म्हंटले. देवाने पाहिले की जे त्याने बनवले ते चांगले आहे .

1. जग — चित्र 5

मग देव बोलला “पृथ्वी वर सर्व प्रकारचे झाडे आणि गवत येवो,आणि तसे झाले आणि देवाने पहिले की जे त्याने बनवले आहे ते चांगले आहे .

1. जग — चित्र 6

जग करण्याच्या चौथ्या दिवशी देव बोलला, “ आकाशात दोन ज्योती होवो, आणि सूर्य, चंद्र, तारे, झाले .देवा बोलला पृथ्वी ला प्रकश देण्या साठी आणि दिवस, रात्र वृतू आणि वर्ष यांच्यात फरक करण्यासाठी केले.

1. जग — चित्र 7

पाचव्या दिवशी देव बोलला, जिवंत प्राण्यांनी पाणी भरून जावो आणि आकाशात पक्षी उडो, ह्या प्रकारे देवाने पाण्यात राहणारे सर्व प्राणी आणि पक्ष्यांना बनवले. देवाने बघितले की हे चांगले आहे. आणि त्या सर्वाना त्याने आशीर्वाद दिला.

1. जग — चित्र 8

जगाच्या सहाव्या दिवशी देव बोलला, “ जमिनीवर राहणारे सर्व प्रकारचे प्राणी होवो. आणि देवाने बोलल्या प्रमाणे झाले. काही प्राणी पाळीव होते, तर काही “ जमिनीवर रांगणारे आणि काही, जंगली प्राणी होते .आणि देवाने पहिले की हे चांगले आहे

1. जग — चित्र 9

मग देव बोलला, चला आपण आपल्या प्रतीरुपाचा आणि आपल्या सारखा माणूस बनवू. तो पृथ्वीवर आणि प्राण्यावर नियंत्रण ठेवेल.

1. जग — चित्र 10

आता देवाने मातीपासून माणूस बनवला आणि त्यात जीवनाचा श्वास फुंकला. ह्या मांसाच नाव आदाम होते. देवाने आदामाल राहण्या साठी मोठी बाग बनवली. आणि त्याची देखरेख करण्यासाठी आदामाल तिथे ठेवले

1. जग — चित्र 11

त्या बागीचे मध्ये मध्यभागी देवाने दोन विशेष झाडे लाविली होती. – जीवनाच झाड आणि बरे आणि वाईट याच ज्ञान करून देणारे झाड. देवाने आदामाल म्हंटले की तु ह्या बगिच्या मध्ये असणार्या दोन झाड ( जीवनाचे, आणि बरे वाईटच ज्ञान करून देणारे झाड )ह्यांना सोडून सर्व झाडांची फळे तु खाऊ शकतो. आणि जर तु नाही सांगितलेल्या झाडाचे फळ खाशी तर तु मरशील.

1. जग — चित्र 12

मग देव बोलला, : माणसाने एकटे राहणे चांगले नाही, “ पण कोणता ही प्राणी आदामाचा जोडीचा नवता

1. जग — चित्र 13

त्यामुळे देवाने आदामाला गाड झोप दिली. मग देवाने आदामाची एक फसळी काढून त्याची स्त्री बनवली आणि तिला आदामा जवळ आणले

1. जग — चित्र 14

जेव्हा आदामाने तिला बघितले आणि म्हंटले की, “ कमीत कमी ही तर माझ्या सारखी आहे. हिला स्त्री म्हणतील, कारण ही माणसापासून बनलेली आहे. “ ह्याच्या मुळे माणूस आपल्या आई – बापाला सोडून आपल्या बायको सोबत राहील .आणि ते एक होतील

1. जग — चित्र 15

देवाने माणसाला आणि स्त्री ला आपल्या सारखे बनवले. त्याने त्यांना आशीर्वाद दिला. आणि म्हंटले “सर्व मुला, बाळना जन्म द्या आणि पृथ्वीला भरून टाका. आणि देवाने बघितले की जे काही त्याने बनवले आहे. ते खूप चांगले आहे. आणि तो त्या सर्वावर खुश होता. हे सर्व जग बंविण्याच्या सहाव्या दिवशी झाले

1. जग — चित्र 16

जेव्हा सातवा दिवस आला आणि जे काही देव करत होता. त्याने ते सर्व काम संपविले. आणि त्याने सातवा दिवस आशीर्वादित करून,पवित्र ठरवला, कारण त्या दिवशी त्याने सर्व गोष्टी बनवून संपविले होते. ह्या प्रकारे देवाने जग आणि जे काही तेच्यात आहे ते निर्माण केले

उत्पत्ति अध्याय 1-2 से बाइबल की एक कहानी

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।