2. पाप जगात आले

2. पाप जगात आले — चित्र 1

देवाने बनवलेल्या बगिच्यामध्ये आदाम व त्याची बायको हे दोघी पण खूप खुश होते. ते दोघे बिना कपड्याचे होते, पण त्यांना त्याची काही लाज वाटत नव्हती, कारण त्यावेळी पाप नव्हते. ते दोघी पण बगिच्या मध्ये परमेश्वरासोबत फिरायचे व त्याच्याशी बोलायचे.

2. पाप जगात आले — चित्र 2

पण त्या बगिच्यामध्ये एक कपटी सांप होता. तो त्या बाईला म्हणाला, तुम्ही बगीच्यातल्या कोणत्याही झाडाचे फळ खायचे नाही असे परमेश्वराने तुम्हांला सांगितले आहे का ?

2. पाप जगात आले — चित्र 3

त्या बाईने त्याला सांगितले, बगिच्यातल्या कोणत्या ही झाडाचे फळ खायला आम्हाला मुभा आहे. फक्त चांगले व वाईट याचे बुद्धी देणाऱ्या झाडाचे फळ खायला आम्हाला ताकीद आहे. परमेश्वर म्हणाला, जर तुम्ही त्या फळाला खळ किंवा हात लावाल तर तुम्ही मराल.

2. पाप जगात आले — चित्र 4

सापाने बाईला सांगितले, हे खोट आहे तुम्ही मारणार नाही. परमेश्वराला माहित आहे की हे फळ खाल्ल्यावर तुम्हांला त्याच्याब सारखे चांगले व वाईट याची बुद्धी मिळेल.

2. पाप जगात आले — चित्र 5

बाईने बघितले की फळ खायला चवदार व दिसायला चांगले आहे. तिला हुशार बनायचे होते, म्हणून तिने काही फळ काढली व खालले. मग तिने ते फळ आपल्या नवऱ्याला पण दिले, तो तिच्या जवळच होता, त्याने पण ते फळ खाल्ले

2. पाप जगात आले — चित्र 6

एकाएकी त्यांचे डोळे उघडले व ते बिनाकपड्याचे आहे हे त्यांना समजले. मग त्यांनी झाडाची पाने शिवून अंगात घालण्यासाठी कपडे बनवले.

2. पाप जगात आले — चित्र 7

मग आदाम व त्याच्या बायकोने परमेश्वर बगिच्यात असल्याचा आवाज आयकला. ते दोघी पण परमेश्वरापासून लपायला लागले. मग परमेश्वर बोलला, आदामा तु कुठे आहे? तो म्हणाला, बगिच्यात तुझा आवाज आयकला व आम्ही घाबरलो. कारण आम्ही बिनाकपड्याचे आहे, म्हणून लपलो.

2. पाप जगात आले — चित्र 8

मग परमेश्वराने विचारले, तु बिनाकपड्याचा आहे ‘तुला कोणी सांगितल? मी नाही सांगितलेले फळ तु खाल्ले आहे का? आदाम म्हणाला, तु मला ही बाई दिली तिने हे फळ मला दिले. मग देव बाईला म्हणाला, तु हे काय केले? ती म्हणाली सापाने मला फसवले.

2. पाप जगात आले — चित्र 9

परमेश्वर सापाला म्हणाला, तु शापित आहे. तु आपल्या पोटाने चालशील व माती खाशील तु आणि बाई तुमच्यात वैर करीन व तुझ्या व तिच्या पिढीत वैर करीन. बाईची पिढी तुझे डोके फोडेल व तु तिची टाच फोडशील.

2. पाप जगात आले — चित्र 10

मग परमेश्वर बाईला म्हणाला, तु मोठ्या त्रासाने मुलांना जन्म देशील असमी करीन. तरी पण तुझे आकर्षण नवर्यावर राहील, व तो तुझ्यावर आधिकार चालवेल.

2. पाप जगात आले — चित्र 11

परमेश्वर माणसाला म्हणाला, तु आपल्या बाईचे आयकले व माझी आज्ञा मानली नाही म्हणून जमीन शापित झाली आहे. तुला आता कष्टाने अन्न मिळेल व तु मरशील, आणि तुझे शरीर मातीत मिळेल. आदामाने त्याच्या बायकोला हव्वा हे नाव दिले. याचा अर्थ जन्म देणारी तिच्या मुळे माणसे जन्माला आले. मग परमेश्वराने आदाम व हव्वा यांना चामडीचे कपडे बनवून घातले.

2. पाप जगात आले — चित्र 12

मग परमेश्वर बोलला, आता माणूस आपल्यासारखा झाला आहे. त्याला चांगले वाईट समजायला लागले आहे, त्यांनी जीवनाचा झाडाचे फळ खाऊ नये व कायम जिवंत राहू नये. म्हणून परमेश्वराने आदाम व हव्वा यांना बागिच्यातून हाकलून दिले. त्याने बगिच्याच्या आजूबाजूला देवदुतांचा पहारा ठेवला, की कोणी त्या झाडाचे फळ खायला नको.

बायबल कथाःउत्पत्ति 3

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।