3. पाण्याचे संकट

3. पाण्याचे संकट — चित्र 1

भरपूर वर्षानंतर, पृथ्वीवर लोकांची संख्या खूप वाढली. ते मानस वाईट व खुनी बनत गेले, ते इतके वाईट बनले की परमेश्वराने ठरवले की पाण्याच्या संकटाने त्यांना मारून टाकावे.

3. पाण्याचे संकट — चित्र 2

पण नोहा नावाच्या माणसावर परमेश्वराची नजर होती. पृथ्वीवरच्या वाईट लोकांमध्ये राहणारा एक चांगला व धार्मिक माणूस हा होता. परमेश्वर एक मोठा पाण्याचा पूर आणणार होता. त्या पाण्याच्या संकटाविषयी त्याने नोहाला सांगितले त्याला एक मोठे जहाज बनवायला सांगितले.

3. पाण्याचे संकट — चित्र 3

परमेश्वराने नोहाला, 140 मीटर लांब, 23 मीटर रुंद, व 13.5 मीटर उंचीचे जहाज बनवायला सांगितले. त्याने नोहाला त्या जहाज मध्ये तीन माजले करायला लावले. भरपूर खोल्या, व छत खिडक्या बनवण्यास सांगितल्या. त्या जहाजीमध्ये नोहा व त्याचा परिवार, आणि पृथ्वीवरचे प्रत्येक जातीचे जनावरे संकटापासून लांब राहणार होते.

3. पाण्याचे संकट — चित्र 4

नोहाने परमेश्वराची आज्ञा आयकली, त्याने आणि त्याच्या तिन्ही मुलांनी सांगितल्या प्रमाणे जहाज बांधले. हे जहाज बनवण्यासाठी भरपूर वर्ष लागले. कारण ती जहाज खूप मोठी होती. नोहाने लोकांना पाण्याच्या संकटाविषयी सांगितले व परमेश्वराकडे येण्यास सांगितले पण कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

3. पाण्याचे संकट — चित्र 5

परमेश्वराने नोहा व त्याच्या परिवारासाठी व जनावरांसाठी भरपूर अन्न गोळा करायला सांगितले. जहाज बनवून झाल्यावर परमेश्वराने नोहा त्याची बायको, व त्याच्या मुलांना सुनांना जहाजमध्ये जायला सांगितले ते एकूण आठ झन होते.

3. पाण्याचे संकट — चित्र 6

परमेश्वराने नोहाकडे प्रत्येक प्रकारच्या जनावरांचे जोडे नर व मधी अशे पाठवले. अशासाठी की त्यांनी जहाज मध्ये जावे व पाण्याच्या संकटापासून ते वाचावे. परमेश्वराने जातीजातीच्या जनावरांचे सात नर व सात माध्या पाठवल्या. त्यांचा उपयोग अर्पण करण्यासाठी होणार होता. त्या सर्वांनी जहाज मध्ये गेल्यानंतर परमेश्वराने जहाजीचा दरवाजा बंद केला.

3. पाण्याचे संकट — चित्र 7

आणि मग पाऊस चालू झाला, पाऊस पाऊस आणि पाऊस चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस चालूच होता. पृथ्वीखाली पाण्याचे झरे मोकळे झाले. व पाणी खूप वाहू लागले. सर्व पृथ्वी पाण्याने भरून गेली, व त्याच्याने सर्व डोंगर पण बुडाले.

3. पाण्याचे संकट — चित्र 8

जहाजीतील माणसे व जनावरे सोडून, जहाजाच्या बाहेर जमिनीवर असलेले सर्व काही पाण्याने भरून गेले, जहाज पाण्यावर तरंगत होते. व जहाजीमधले सर्व बुडण्यापासून सुरक्षित होते.

3. पाण्याचे संकट — चित्र 9

पाऊस थांबल्यावर जहाज पाच महिने पाण्यावर होते, व तेव्हापासून पाणी कमी होत गेले. मग एकदिवशी जहाज एका डोंगरावर येवून टेकले. पण सर्वठिकाणी पाणीच पाणी होते. आणि आणखी तीन महिन्यानंतर डोंगराचे टेकड्या दिसू लागल्या.

3. पाण्याचे संकट — चित्र 10

त्यानंतर चाळीस दिवसानी नोहाने एक कावळा बाहेर सोडला, पाणी सुकले की नाही बघण्यासाठी. तो कावळा पाणी सुके पर्यन्त पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहिला. पण त्याला कोरडी जमीन भेटली नाही.

3. पाण्याचे संकट — चित्र 11

नंतर नोहाने एक कबुतर बाहेर सोडले. पण त्यालाही कोरडी जमीन न सापडल्यामुळे तो नोहाकडे परत आला, एक आठवड्याने त्याने परत एक कबुतर बाहेर सोडले व ते आपल्या चोचीत जैतुनाच्या फांदी घेऊन आला. पाणी कमी होत होते. आणि झाडे झुडपे वाढू लागले.

3. पाण्याचे संकट — चित्र 12

नोहाने आणखी एका आठवड्याने तिसर्यांदा कबुतराला बाहेर सोडले. त्याला उतरण्यासाठी जागा मिळाली म्हणून ते परत वापस आले नाही. पाणी कमी होत होते.

3. पाण्याचे संकट — चित्र 13

दोन महिन्यानंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, तु आणि तुझा परिवार आता जहाजीमधून बाहेर येवू शकता. तुम्हांला भरपूर मुले व नातवंडे होवो, व पृथ्वी भरून टाका. मग नोहा व त्याचा परिवार जहाजीमधून बाहेर आले

3. पाण्याचे संकट — चित्र 14

नोहा जहाजीबाहेर आल्यानंतर त्याने एक वेदी बांधली व अर्पानासाठी वापरणाऱ्या जनावारांपैन्की प्रत्येक काही घेऊन त्यांचे देवाला काही अर्पण केले. परमेश्वर नोहाच्या अर्पणाने प्रसन्न झाला व त्याला त्याच्या परिवाराला आशीर्वाद दिला.

3. पाण्याचे संकट — चित्र 15

परमेश्वर बोलला, मी वचन देतो येथून पुढे माणसाच्या वाईटामुळे पृथ्वीला श्राप देणार नाही, व पाण्याने जगाचा नाश करणार नाही, कारण माणसे लहानपणापासूनच पापी असतात.

3. पाण्याचे संकट — चित्र 16

मग परमेश्वराने पहिल्यांदा मेघधनुष्य बनवला व नोहासोबत करार केल, मेघ धनुष्य जेव्हा जेव्हा आकाशात दिसेल तेव्हा तेव्हा माणसावर परमेश्वराने केलेल्या करारची आठवण होईल. व त्याच्या पिढीलाही आठवण राहील.

पवित्र शास्त्र : उत्पत्ति 6-8

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।