4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 1

पाण्याच्या संकटाच्या भरपूर वर्षानंतर, जगामध्ये परत माणसे वाढले, व सर्वांची एकच भाषा होती. परमेश्वराने सांगितल्या प्रमाणे पृथ्वी भरून न टाकता ते जमले व त्यांनी एक शहर बांधले.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 2

ते खूप गर्वाने फुगलेले होते, परमेश्वर काय बोलला हे त्यांनी लक्ष दिलोये नाही. त्यांनी आकाशापर्यंत जाईल असा एक उंच बुरुज बांधायला सुरुवात केली, परमेश्वर बोलला अशा प्रकारे वाईट करण्यासाठी ते जमा झाले आहे. म्हणून ते ज्यास्त वाईट काम करतील.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 3

मग परमेश्वराने त्यांच्या भाषेमध्ये गोंधळ केला व भरपूर भाषा बनवल्या व अशा प्रकारे त्यांना सर्व जगात पसरवले. जे शहर त्यांनी बनवण्यास तयार होते. त्याला बाबेल म्हणजे गोंधळ असे म्हंटले.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 4

हजारो वर्षानंतर, परमेश्वर अब्राम नावाच्या माणसाबरोबर बोलला, व त्याला सांगितले, तु आपला देश अ आपले नातेवाईक सोडून मी दाखवतो त्या देशात जा, मी तुला आशीर्वादित करीन व तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र बनवेल. मी तुझे मोठे करीन. तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईल व जे तुला श्राप देतील त्यांना मी श्राप देईल.तुझ्यामुळे पृथ्वीवरचे सर्व माणसे आशीर्वादित होतील.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 5

अब्रामाने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाने केले.त्याने आपली बायको सारा व सर्व नातेवाईक नोकरचाकर सोबत मिळवलेली सर्व संपत्ती घेऊन अब्राम परमेश्वराने दाखवलेल्या कनान देशात जायला निघाला.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 6

कनान देशात आल्यानंतर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तु तुझा आजूबाजूला बघ हा देश जो तु बघत आहेस मी तुला व तुझ्यानंतर तुझ्या पिढीला वतन म्हणून देईल. मग अब्राम तेथे राहायला लागला.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 7

एकदिवशी अब्राम परमेश्वराचा याजक मलकीसदेकला भेटतो. मलकीसदेकने अब्रामाला आशीर्वाद दिला व म्हणाला, आकाश आणि पृथ्वीचा राजा जो परमेश्वर अब्रामाला आशीर्वाद देवो, मग अब्रामाने मलकीसदेकला आपल्या सर्व संपत्तीचा दहावा भाग दिला.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 8

भरपूर वर्ष झाले पण अब्राम व सारा यांना मुलबाळ नव्हते. परमेश्वराने अब्रामाला परत दर्शन देऊन सांगितले की त्याला मुलगा होईल व त्याची पिढी आकाशातील ताऱ्याप्रमाणे होईल. अब्रामाने परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला. परमेश्वरावर ठेवलेल्या विश्वासामुळे अब्राम धार्मिक ठरला.

4. परमेश्वराचा अब्राहामासोबत करार — चित्र 9

मग देव अब्रामाबरोबर करार करतो. करार हा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये केला जातो. देव बोलला, “तुला तुझ्याच पोटचा पुत्र होईल.”तुझ्या संतानाला मी कनान देश देईल.” परंतु अद्याप अब्रामास पुत्र झाला नव्हता

पवित्र शास्त्र : उत्पत्ति 11-15

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।