6. परमेश्वर इसहाकाला मदत करतो
जेव्हा अब्राम म्हातारा झाला होता, तेव्हा त्याचा मुलगा, इसहाक जवान माणूस झाला. म्हणून आब्राहामाने आपल्या सेवकाला त्याचे नातेविक राहत होते त्याठिकाणी त्या देशात जाऊन आपल्या मुलगा इसहाक याच्यासाठी एक नवरी आणायला पाठवले.
खूप लांबपर्यन्त प्रवास केल्यावर अब्राहामचे नातेवाईक राहत होते त्याठिकाणी, परमेश्वर सेवकाला रीबेकाकडे घेईन जातो. ती अब्राहामाच्या भावाची नात होती.
रिबेका आपल्या बापाचे घर सोडून त्या सेवाक्काबरोबर इसहाकाच्या घरी जाण्यास निघाली, ती आल्यानंतर लगेच इसहाकाने तिच्याशी लग्न केले.
भरपूर वर्षानंतर अब्राहाम मरून गेला, व परमेश्वराने त्याला कराराचे सर्व वचने इसहाकाकडे सोपवून दिली. परमेश्वराने अब्राहामाला भरपूर पिढी होईल असे वचन दिले होते. पण इसहाक व त्याच्या बायकोला मुलबाळ काहीच नव्हते.
इसहाकाने रीबेकासाठी प्रार्थना केली व परमेश्वराच्या आशीर्वादाने ती गरोधर झाली. तिच्या पोटात जुळे मुळे होते. हे दोन मुले रीब्र्काच्या पोटात एकमेकांशी भांडू लागली, तेव्हा तिने परमेश्वराला विचारले अस कबर होत आहे.
परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या पोटातील दोन मुले म्हणजेच दोन राष्ट्र होतील, ते एकमेकांशी भांडतील आणि मोठा लहान्याची सेवा करील.
जेव्हा रिबेकाच्या मुलांचा जन्म झाला, तेव्हा पहिला मुलगा तांबड्या रंगाचा होता, व त्याच्या अंगावर भरपूर केस होते. त्याचे एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा लहान भाऊ एसावाची पायाची टाच धरून बाहेर आला आणि त्याचे नाव याकोब ठेवले.
पवित्र शास्त्र : उत्पत्ति 24:1-25:26
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।