7. देव याकोबास आशीर्वाद देतो
हे मुले मोठे होत असता, याकोबाला घरीच राहायला आवडत होते. पण एसावला शिकार करायला आवडायचे .याकोब रिबेकाचा आवडता होता. पण एसाहाकाला इसाव आवडत होता .
.एक दिवशी, एसाव शिकार करून आला, आणि त्याला खूप भूक लागली होती .एसाव याकोबास म्हणाला, “तु बनवलेले जेवण त्यातून मला थोडस दे. “याकोबाने म्हंटले, “ पहिल्याने, तु मोठा मुलगा म्हणून जे हक्क आहेत ते सर्व हक्क मला दे. “ अशा प्रकारे एसावाने याकोबाला आपला मोठे पनाचा सर्व अधिकार हक्क देऊन दिला. मग याकोबाने त्याला काही जेवण खावयास दिले.
इसहाकची इच्छा होती .की एसावालाच आशीर्वाद द्यावा. पण असे होण्याच्या पहिलेच रिबेका आणि याकोब यांनी मिळून याकोबाला एसाव सारखे दाखवून (नाटक करून )इसाहाकाला फसवले. इसाहाक खूप म्हातारा झाल्यामुळे त्याला ज्यास्त दिसत नवते. याकोबाने एसावाचे कपडे घालून आणि आपल्या मानीवर व हातावर बकरीची ( शेळी ) कातडी घातली
याकोब इसाहाकाकडे येवून बोलला, “ मी एसाव आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्यावा म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे .”जेव्हा इसाहाकाने बकरीच्या ( शेळीच्या ) केसास हाथ लावला व त्याच्या कपड्याचा वास घेतला, तेव्हा तो एसावच आहे,असे म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिला.
एसाव याकोबावर चिडू लागला. कारण याकोबाने त्याला फसवून मोठेपणाचा हक्क आणि आशीर्वाद पण चोरून घेतला होता. म्हणून एसाहाक मेल्यानंतर त्याने याकोबाला मारून टाकण्याची योजना केली.
पण रीबेकाने एसावाच्या योजनेबाबद एकले. मग तिने आणि इसाहाकाणे याकोबास आपल्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी पाठवले .
याकोब बऱ्याच वर्ष रिबेकाच्या नातेवाइकाडे राहिला. या काळात त्याने लग्न केले व त्याला बारा मुलगे व एक मुलगी झाली. देवाने त्यास खूप आशीर्वादित व श्रीमंत केले.
त्यानंतर तो वीस वर्षा नंतर कनान देश्यात आपल्या घरी परतला आपला परिवार व नोकर – चाकर गुराढोरांच्या काळपासोबत .
याकोब खूप घाबरत होता, कारण त्याला वाटत होते की, त्याचा भाऊ एसाव अझून पण त्याला मारण्यासाठी टपला आहे. म्हणून त्याने आपल्या जनावरांचे भरपूर कळप एसावाकडे भेट म्हणून पाठवले. ज्या नोकरांनी ते कळप एसावाकडे नेले ते त्याला म्हणाले .” तुमचा सेवक याकोब तुमच्यासाठी हे कळप भेट म्हणून पाठवले आहे. तो लवकरच येत आहे .
पण एसावाने पहिलेच याकोबाला क्षमा केली होती. आणि त्यांना दोघांना एकमेकांशी भेटून खूप आनंद झाला. मग याकोब सुखाने कानान देशात राहू लागला. मग इसाहाक पण मरण पावला. आणि याकोब व एसाव यांनी त्याला मूठमाती दिली. देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसाहाकाकडून याकोबाकडे सोपविण्यात आले.
बायबल कथाःउत्पत्ति 25:27-33:20
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।