8. देव योसेफाचे व त्याच्या परिवाराचे रक्षण करतो
बऱ्याच वर्षा नंतर याकोब म्हातारा झाला, त्याने आपला आवडता मुलगा, योसेफ, यास मेंढरे राखण करत असलेल्या आपल्या मोठ्या भावांकडे पाठविले यासाठी की त्यांचे कसकाय चालू आहे, हे बघण्यासाठी.
आपला बाप याकोब याचे योसेफावर खूप ज्यास्त प्रेम असल्यामुळे आणि योसेफ आपल्या मोठ्या भावावर राज्य करील असे स्वप्न त्याला पडल्यामुळे त्याचे भाऊ त्याच्यावर चिडू लागले. जेव्हा योसेफ आपल्या मोठ्या भावांकडे आला, त्यावेळेस त्यांनी त्याला कोणत्या तरी गुलामाच्या व्यापाऱ्यांसविकून टाकले .
योसेफाच्या भावांनी घरी इंयापुर्वी योसेफाचा झगा ( शेळी ) बकरीच्या रक्तामध्ये बुडवून मग तो झगा आपल्या बापाला दाखवला अशासाठी की जंगली प्राण्यांनी योसेफाला मारून टाकले आहे. आणि ह्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसावा असे केले. त्यानंतर याकोबाला खूप दुख झाले
त्या गुलामाच्या व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात आणले. नाईल नदीच्या काठावर असलेल्या मिसर देश हा एक खूप मोठा, व शक्तिशाली देश होता. गुलामांच्या व्यापाऱ्यांनी योसेफाला एका श्रीमंत सरकारी अधिकाऱ्याला विकून टाकले. योसेफाने आपल्या मालकाची खूप चांगली सेवा केली. आणि देवाने योसेफास आशीर्वादित केले
त्याच्या मालकाच्या बायकोने योसेफा सोबत वाईट काम करण्याचा प्रयत्न केला, पण योसेफाने देवाच्या विरोधात पाप करण्यास नकार दिला. त्यामुळे तिने रागात योसेफावर खोटा आरोप केला व योसेफास पकडून तुरुंगात टाकून दिले. तुरुंगात पण योसेफ देवाशी विश्वासू राहिला, आणि देवाने त्यांस आशीर्वाद दिला.
दोन वर्षानंतर, निर्दोष असताना पण योसेफ तुरुंगात होता. एका रात्री फारोला, दोन चिंताजनक स्वप्न पडले. त्याच्या सर्व सल्ला देणाऱ्या पैंकी कोणीही त्याला स्वप्नाचा अर्थ सांगू शकले नाही .
देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे दान दिले होते. म्हणून फारोने योसेफास तुरुंगातून आपल्या घरी आणले. योसेफाने त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगीतले की, “ देव सात वर्ष भरपूर पिक पाणी पुरवील व त्यानंतर सात वर्ष दुष्काळ पडेल .
योसेफाची फारोवर एवडी छाप पडली की त्याने योसेफाला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले .
योसेफाने लोकांना चांगल्या काळातील सात वर्षा मध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवण्यास सांगितले. मग योसेफाने दुष्काळातील सात वर्षे लोकांना खाण्यासाठी परेल इतके धान्य विकले.
तो दुष्काळ फक्त मिसर देशातच नवता तर याकोब आणि त्याचे परिवार राहत होते. त्या कनान देशामध्ये पण होता
मग याकोब आपल्या मोठ्या मुलांस अन्न विकत घेण्यासाठी मिसर देश्यात पाठवले .धान्य विकत घ्यायला आलेले भाऊ योसेफाच्या समोर उभे होते. पण त्यांनी त्याला ओळखले नाही. पण योसेफाने त्या सर्वाना ओळखले .
ते बदलून गेले आहे की तसेच आहे .हे पाहण्यासाठी, योसेफ त्यांना म्हणाला, “ मी तुमचा भाऊ योसेफ आहे. घाबरू नका. तुम्ही मला गुलाम म्हणून विकले माझे वाईट करण्याचा प्रयत्न केला. पण देवाने त्याच वाईटच उपयोग माझ्या चांगल्यासाठी केला .या आणि मिसर देशात राहण्यासाठी या म्हणजे मी तुम्हांला व तुमच्या परिवाराच्या लोकांना अन्नाचा पुरवठा करील .
जेव्हा योसेफाचे भाऊ घरी आले व त्यांनी आपल्या बापाला,याकोबाला सांगितले की योसेफ जिवंत आहे. तेव्हा याकोबाला खूप आनंद झाला .
जरी याकोब आता म्हातारा झाला होता, तरीही तो आपल्या परिवारासोबत मिसर देशात आला व ते सर्व तेथे येवून राहू लागले. याकोबाने आपल्या मरणा अगोदर. आपल्या सर्व मुलास आशीर्वाद दिला .
देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन इसाहाकाकडे, मग याकोबाच्या आणि त्याच्या बारा मुलांकडे व त्यांच्या परिवाराकडे सोपविण्यात आले. या बारा मुलांची पिढी हीच इस्त्राएलचे बारा वंश झाले .
बायबल कथाःउत्पत्ति 37-50
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।