9. देव मोशेला पाचारण करतो
योसेफ मेल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक मिसर देशात राहत होते. ते आणि पिढी भरपूर वर्षे तेथे राहिली व त्यांस भरपूर लेकरे झाली. त्या सर्वना इस्त्राएली म्हणत.
भरपूर वर्षानंतर इस्त्राएली लोकांची संख्या वाढली. योसेफाने केलेले सर्व कामकाज मिसरी लोक विसरून गेले होते. त्यांना आता इस्त्राएली लोकांची भीती वाटू लागली ते त्यांना घाबरू लागले .कारण त्यांची संख्या खूप ज्यास्त होती. त्यावेळेस मिसर देशात राज्य करीत असलेला फारो ने इस्त्राएली लोकांना मिसरी लोकांचे गुलाम ( नोकर ) करून ठेवले होते .
मिसर देशातील लोक, इस्त्राएली लोकांकडून मोठे मोठे बांधकाम आणि मोठ्या मोठ्या इमारत बांधून घेत होते. अशा कष्टांच काम कर्ण त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होते. पण देवाने त्यांना आशीर्वादित केल व त्या सर्वाना अझून मुले झाले .
फारोने बघितले की ह्या इस्त्राएल च्या लोकांना भरपूर मुले होत होती. म्हणून त्याने त्यांच्या विरुद्ध आदेश पाठवला की इस्त्राएल च्या सर्व मुलांना नाईल नदीमध्ये फेकून जीवे मारावे .
एका इस्त्राएली बाईने मुलाला जन्म दिला, तिने व तिच्या नवर्याने आपल्या मुलाला काही काळापर्यंत लपविण्याचा प्रयत्न केला .
जेव्हा आईवडील त्या मुलाला ज्यास्त वेळ लपवू शकले नाही,तेव्हा त्यांनी त्या मुलाला मरणा पासून वाचवण्यासाठी त्याला एका हलक्या तरंगणाऱ्या टोपलीत ठेवून नाईल नदीत सोडले. व त्या मुलाची मोठी बहिण बघत होती की त्याचसोबत काय होते .
फारोच्या मुलीने ते टोपले उघडून आत पहिले. तेव्हा तिने त्या बाळाला पहिले. तिने त्या बाळाला दुध पाजण्यासाठी एका इस्त्राएली बाईला बोलाविले,पण ती बाई त्याचीच आई होती. हे तिला माहिती नव्हते. जेव्हा ते बाळ मोठे झाले. व त्याला आता दुधाची गरज नव्हती. तेव्हा तिने त्यांस फारोच्या मुलीकडे सोपवून दिले, आणि तिने त्याचे नाव, “ मोशे “ ठेवले .
.एका दिवशी, जेव्हा मोशे मोठा झाला होता. तेव्हा त्याने एका मिसरी माणसाला इस्त्राएली गुलामाला मारताना बघितले, व मोशेने आपल्या इस्त्राएली भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला
आपल्याला कोण्हीच बघितले नाही,असे बघून मोशेने त्या मिसरी माणसाला मारून टाकले. व त्याचे प्रेत पुरून टाकले. पण मोशेने केलेली हत्या कोणीतरी बघितली होती.
जेव्हा फारोने मोशेने केलेल्या हत्ये विषयी एकले तेव्हा,त्याने त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. फारोच्या शिपाया पासून सुरक्षित राहण्या साठी मोशे मिसर देश सोडून निघून गेला. व जंगलात पळत फिरला
मोशे आता मिसर देशापासून खूप लांब जंगलात मेंढरे चारू लागला, व त्याने तिथेच एका बाईशी लग्न केले. व त्याला दोन मुले झाली
एका दिवशी मोशे मेंढरे चारत असता, मोशेने बघितले एका झाडाला आग लागली आहे. पण ते झाड जळत नाही आहे. मग हे काय आहे हे पाहण्यासाठी तो त्या झाडा जवळ गेला. तो त्या आग लागलेल्या झाडाजवळून जात असताना, देवाचा आवाज त्याला एकू आला, “ मोशे, तु आपल्या पायातील वाहना काढ कारण जिथे तु उभा आहेस ती जागा पवित्र आहे.
देव त्याच्याशी बोलला “मी आपल्या लोकांचे दुख क्लेश बघितले आहे. मी तुला फारोकडे पाठवतो. माझ्या लोकांना त्या मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी, मी त्यांना कनान देश देणार आहे, जो मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याचे अभिवचन दिले होते.
मोशे देवाला म्हणाला, “जर लोकानी मला विचारले की तुला आमच्यासाठी कोणी पाठवले आहे ? तर मी त्यांना काय सांगू ? “ देव मोशेला म्हणाला “ मी आहे तो आहे. त्यांना सांग, मी आहे त्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. त्यासर्वाना हेही सांग की मी त्यांच्या पूर्वजांचा म्हणजेच, अब्राहाम, इसहाक व याकोबाचा देव आहे, हेच माझे सर्व काळचे नाव आहे
मोशे फार घाबरलेला होता, व फारोकडे जाण्यास नकार देत होता कारण त्याला व्यवस्थित बोलायला जमायचे नाही. म्हणून देवाने मोशेचा भाऊ, अहरोन ह्याला त्याच्या मदतीसाठी पाठविले. देवाने मोशे व अहरोन ह्यांना आधीच सांगून ठेवले होते की फरो राजा हट्टी पणा करेल
बायबल कथाःनिर्गम 1-4
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।