10. दहा पिडा

10. दहा पिडा — चित्र 1

मोशे आणि अहरोन फारो राजा कडे गेले. ते त्याला म्हणाले,”इस्राएल चा देव म्हणतो आहे, माझ्या लोकांना जाऊ दे.फारोने त्यांचे काही एक ऐकले नाही. इस्राएल च्या लोकांना सोडण्या ऐवजी त्याने त्यांना अझून ज्यास्त त्रास दायक कामे करण्यास सांगितले

10. दहा पिडा — चित्र 2

फारोने इस्राएल लोकांना जाण्यासाठी नेहेमी नाही म्हंटले .म्हणून देवाने मिसर देशावर दहा गंभीर पिडा पाठवल्या. या सर्व पिडांच्याद्वारे देवाने दाखवले की तो फारो आणि मिसर देशातील देवांपेक्षा खूप शक्तिशाली आहे .

10. दहा पिडा — चित्र 3

देवाने मिसरामध्ये असलेल्या नाईल नदीच्या पाण्याचे,”रक्त बनवले, पण तरीही फारो इस्राएल लोकांना मिसारातून जाऊ देण्यास मनाई करू लागला

10. दहा पिडा — चित्र 4

मग देवाने सर्व मिसर देशामध्ये बेडूक पाठले. फारोने मोशेस हे सर्व बेडूक दूर व्हावे म्हणून विनंती केली, पण सर्व बेडूक मेल्यानंतर फारोचे मन आणखीनच काढीन झाले. व त्याने इस्राएल लोकांना मिसरातून जाऊ देण्याची मनाई केली.

10. दहा पिडा — चित्र 5

मग देवाने उवांची पिडा पाठवली. मग त्याने गोमाशांची पिडा पाठवली. मग फारो राजाने मोशे आणि अहरोन यांना बोलावून म्हंटले की जर ह्या आलेल्या पिडा दूर होतील तर तो इस्राएल लोकांना मिसारातून जाऊ देईल. ज्यावेळेस मोशेने देवाची प्रार्थना केली,त्या वेळेस सर्व गोमाशांची पिडा दूर झाली. पण फारोने आपले मन आणखीनच कठीण केले. व इस्राएल लोकांना मिसारातून जाण्यास मनाई केली.

10. दहा पिडा — चित्र 6

मग , देवाने मिसरी लोकांचे सर्व पाळलेली जनावरे आजारी पाडून मारून टाकली. पण तेव्हा फारोचे मन अधिकच कठीण होत गेले .व त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.

10. दहा पिडा — चित्र 7

मग परत देवाने मोशेला फारोसमोर हवेमध्ये राख फेकण्यास सांगितले. त्याने तसे केल्यानंतर, सर्व मिसर देशातील लोकांना अंगावर मोठे फोड झाले, पण मात्र इस्राएल लोकांवर त्याचा प्रभाव पडला नाही. देवाने फारोचे मन अधिक कठीण केले. फारो त्यांना जाण्यास मनाई करू लागला .

10. दहा पिडा — चित्र 8

त्यानंतर, देवाने मिसर देशावर गारांची पिडा पाठवली. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच शेतातल्या पिकांचे नुकसान झाले. व बाहेरच्या हर एक माणसाला मारून टाकले. फारोने मोशेला व अहरोन यांना बोलावून सांगितले. “ मी मोठे पाप केले आहे, तुम्ही सर्व मिसरातून जाऊ शकता. “ मग मोशेने प्रार्थना केली. व गारांचा पाऊस बंद झाला.

10. दहा पिडा — चित्र 9

ह्या वेळेला पुन्हा फारोने पाप केले. व आपले मन कठीण केले.

10. दहा पिडा — चित्र 10

देवाने मिसर देशावर टोळांची पिडा पाठवली. या गारा पडल्यामुळे राहिलेले शेतातले पिक या टोळांनी खाऊन टाकले.

10. दहा पिडा — चित्र 11

त्यानंतर देवाने मिसर देशावर तीन दिवस निबिड अंधाराची पिडा पाठवली. एवढा अंधार आणि काळोख होता .की मिसरी लोक घराबाहेर निघू शकत नव्हते, पण इस्राएली लोक होते त्याठिकाणी प्रकाश होता.

10. दहा पिडा — चित्र 12

अशाप्रकारे नऊ पिडा नंतरही फारोने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही. फारो एकत नसल्यामुळे देवाने आणखी एक पिडा त्यांच्यावर पाठवली. या पीडे नंतर फारोचे मन बदलून गेले .

बायबल कथाःनिर्गम 5-10

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।