11. वल्हांडनाचा सन
देवाने फारोला सांगितल्याप्रमाणे जर त्याने इस्राएल लोकांना सोडले नाही, तर देव मिसारातील पहिला जन्मलेला माणूस किवा जनावर यांना मारून टाकेल. जेव्हा हे फारोने ऐकले तेव्हा पण त्याने पहिल्यासारखेच केले की इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
जो माणूस देवावर विश्वास ठेवील त्याच्या घरातील पहिला जन्म लेला वाचण्यासाठी देवाने एक मार्ग दाखवला. प्रत्येक परिवारातल्या एका चांगले कोकरू घ्याचे व ते मारायचे .
देवाने इस्राएल लोकांना सांगितले की त्यांनी मारलेल्या कोकरा याचे रक्त त्यांच्या घराच्या दरवाजा च्या चारही बाजूला लावावे. आणि त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखामिर भाकर व कडू भाजी बरोबर घाईघाईने खावे. त्यांचे भोजन झाल्यानंतर मिसर देश सोडण्याच्या तयारीत राहायला सांगितले
देवाने सांगितल्या प्रमाणे इस्राएल लोकांनी केले. मग मध्य रात्रीच्या वेळी, देवाने जाऊन मिसरातील पहिले जन्म लेले मुले व जनावरे मारले
इस्राएलच्या सर्व घरांच्या चारही बाजूंना कोकाऱ्याचे रक्त लावल्या मुळे देव त्या घरांना ओलांडून गेला. त्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होता, कोकाऱ्याच्या रक्तामुळे त्यांचा बचाव झाला
पण मिसारातील लोकांनी देवावर विश्वास ठेवला नाही व त्याच्या आज्ञा पाळल्या नाही, म्हणून देवाने त्यांचे ओलांडले नाही, देवाने मिसरातील प्रत्येक पहिला जन्म लेलयास मारून टाकले.
बंदिवासात असलेल्या पहिल्या जन्मलेल्या मुलापासून तर फारोच्या घरातील पहिल्या जन्मलेल्या प्रत्येक मिसरी पुरुष मरण पावले. मिसर देशातील पुष्कळ लोक खूप दुखाने विव्हळ होऊन रडत होते.
. त्याच रात्री, फारोने मोशे आणि अहरोन यांना बोलावून सांगितले, “ इस्राएलाना घेऊन ताबडतोप मिसर देश सोडा व आपल्या देवाची भक्ती ( उपासना ) करा. मिसरी लोकांनीही इस्राएल लोकांना मिसर देश सोडण्याची विनंती केली .
बायबल कथाःनिर्गम 11:1-12:32
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।