12. निर्गम
मिसर देश सोडताना इस्राएल लोकांना खूप आनंद झाला. आता ते गुलाम ( नोकर ) नवते, ते आता वचन दत्त देशाकडे जात होते. मिसर देशातील लोकांनी इस्राएल लोकांना सांगितलेल्या सर्व काही म्हणजेच सोन, चांदी व इतर अति मौल्यवान गोष्टी त्यांना दिल्या. काही परदेशी लोकांनीही देवावर विश्वास ठेवला आणि इस्राएल लोकांसोबत त्यांनीही मिसर देश सोडला.
देवाने एका उंच आणि अद्भूत ढगांच्या खांबाद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले. जो दिवसा त्यांच्यापुढे चालत होता. तोच ढगांचा खांब रात्रीच्या वेळेस अग्नी खांब बनत होता. देव नेहेमी त्यांच्या बरोबर राहत होता. वा त्यांच्या मार्गावर त्यांचे मार्ग दर्शन करत होता. आणि त्यांना त्याच्या बदल्यात एकच गोष्ट करायची होती. ते म्हणजे आज्ञा पालन .
थोड्याच वेळेमध्ये मिसराचा राजा फारो व त्यांचे लोक यांचे मन बदलले. व इस्राएलाना परत त्यांचे गुलाम करावे असे त्यांना वाटले. देवाने फारोला हट्टी आणि कठोर केले. अशासाठी की लोकांना खरा जिवंत देव समजावा व याहोवा देव हा फारो व त्याच्या देवतापेक्षा खूप महान आणि शक्तिशाली आहे हे त्यांना कळावे .
मग फारो राजा व त्यांचे सैन्य इस्राएल लोकांवर पुन्हा त्यांना गुलाम करण्यासाठी त्यांचा माघे लागले. जेव्हा इस्राएल लोकानी मिसरी सैन्य त्यांच्या माघे लागले आहे हे पहिले, तेव्हा त्यांना समजले,की आता मिसरी सैन्य आणि तांबडा समुद्र यांच्यात आपण आडकलो, तेव्हा ते खूप घाबरले व ओरडू लागले, “ आम्ही मिसर देश का सोडला ? आता आम्ही मारणार !
मोशे इस्राएल लोकांशी बोलू लागला, “ की घाबरू नका, देव आपल्या सोबत आहे व तोच आपल्या बाजूने लढेल .व सर्वांचे तारण करेल. मग देव मोशेला म्हणाला, “ लोकांना तांबड्या समुद्राकडे जायला सांग .”
मग देवाने इस्राएल लोकांच्या व मिसरी सैन्य यांच्यात ढगांचा खांब उभा केला व यामुळे मिसरी सैन्य इस्राएल लोकांना पाहू शकले नाही.
देवाने मोशेला तांबड्या समुद्रावर आपली काठी उगारण्यास सांगितली व तो समुद्राचे दोन भाग करण्यास संगीतले. मग देवाने भयंकर जोरदार वाऱ्याच्या मदतीने समुद्राचे पाणी डावी व उजवी कडे हटवले, व समुद्रामध्ये कोरडा रस्ता तयार केला
इस्राएल लोक समुद्राच्या मध्यभागी कोरड्या रस्त्यावर चालत होते .त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी भिंती सारखे होते
मग देवाने ढगांचा खांब त्यांच्या मार्गावरून हटवला अशासाठी की इस्राएल लोकांना आपल्या हातातून निघून जात आहे हे त्यांनी पाहावे. मिसरी सैन्यांनी त्यांचा पाटलाग करण्याचे ठरवले .
व ते सैन्य इस्राएल लोकांचा पाटलाग करत समुद्रामध्ये केलेलेया रस्त्याने आत आले, पण देवाने त्यांना घाबरे केले. व त्यांचे रथ चिखला मध्ये फसले, ते ओरडले, “ पळा “ कारण देव इस्राएलच्या बाजूने लढत आहे.
सर्व इस्राएल लोक सुरक्षित समुद्राच्या दुसऱ्या किनार्याला पोहचले, तेव्हा देवाने मोशेला सांगितले आपला हाथ उंच कर,व त्याने तसे केल्यानंतर, समुद्राचे पाणी मिसरी सैन्यावर पडले व समुद्र पहिल्यासारखा झाला व सर्व मिसरी सैन्य पाण्यात बुडून गेले.
ज्यावेळेस इस्राएल लोकांनी बघितले की मिसरी सैन्य मेले आहे, तेव्हा त्यांनी देवावर विश्वास ठेवला. व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याच्यावर पण विश्वास ठेवला.
इस्राएल लोकांनी खूप आनंद केला, कारण देवाने त्यांना मरण आणि गुलामगिरीतून तारले होते, आता ते आपल्या देवाची उपासना करण्यासाठी मोकळे झाले. इस्राएल लोकांनी त्यांना मिळालेल्या मोकळीकते बद्दल भरपूर गाणे गाऊन देवाची स्तुती करत आनंद केला, कारण देवाने त्यांना मिसरी सैन्यापासून वाचवले होते .
देवाने इस्राएल लोकांना मिसरी लोकांवर कशाप्रकारे विजयी केले .व त्यांची गुलामगिरीतून कशी सुटका केली. याचे स्मरण त्यांना राहावे .म्हणून देवाने इस्राएलास दरवर्षी वाल्हांडन सन साजरा करण्याची आज्ञा दिली. निष्कलंक कोकाऱ्याचे बलिदान देऊन त्याचे मांस बेखमीर भाकरीसोबत खाऊन त्यांनी हा सन साजरा केला.
बायबल कथाःनिर्गम 12:33-15:21
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।