13. देवाचा इस्राएल लोकांशी करार

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 1

तांबडा समुद्र ओलांडल्या नंतर, देव इस्राएल लोकांना जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला. ज्या ठिकाणी मोशेने जळते झाड पहिले होते, तो हाच पर्वत होता. इस्राएल लोकांनी त्या पर्वताच्या जवळ आपले तंबू लावले.

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 2

देव मोशेशी व इस्राएल लोकांशी बोलला,”जर तुम्ही माझे नियम व करार पळाल, तर तुम्ही माझे विशेष निवडलेले लोक व्हाल, व राजकीय याजकगन व पवित्र राष्ट्र असे होणार “

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 3

तिसऱ्या दिवशी, इस्राएल लोकांची आध्यात्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वतावर उतरत असताना मेघ गर्जना, विजेचा अति प्रकाश, धूर, भयंकर शिंगाचा नाद यात देव पर्वतावर उतरून आला. पर्वतावर जाण्याची परवानगी फक्त मोशेलाच होती.

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 4

मग देवाने त्यांना हे वचने सांगितली,”मी याहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हांला मिसरदेशातून गुलामगिरीतून सोडवले. तुम्ही दुसऱ्या देवांची पूजा करू नये,

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 5

“आपल्या साठी कोरलेली मूर्ती बनवू नको ,व तिच्या पाया पडू नको , कारण मी, याहोवा, तुमचा ईर्षावान देव आहे. तु माझे नाव व्यर्थ घेऊ नये. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो दिवस पवित्र पणे पाळ. म्हणजे सहा दिवस तु आपले सर्व काम कर व सातवा दिवस हा तुझा आरामाचा दिवस माझी आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ”

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 6

“आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. तु खुन करू नको. तु व्यभिचार करू नकोस. तु चोरी करू नकोस. तु खोट बोलू नको. तु आपल्या शेजारच्या बाईचा, व त्याचा घराचा, किवा त्याच्या कुठल्याही गोष्टीचा हेवा करू नको

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 7

मग देवाने ह्या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर कोरून लिहून मोशेकडे दिल्या, देवाने त्याना पाळण्यासाठी आणखीन दुसऱ्या आज्ञा व विधी पण त्यांना दिले, जर त्यांनी हे सर्व आज्ञा व विधी पाळले,तर देव त्यांना आशीर्वादित करेन व त्यांचे रक्षण करेल असे अभिवचन त्यांना दिले. जर त्यांनी तसे केले नाही, तर देव त्यांना त्याची शिक्षा करेल .

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 8

देवाने इस्राएल लोकांना त्याच्यासाठी एक निवास मंडप करण्यासाठी पूर्ण माहिती दिली. ह्याला निवास मंडप म्हणत असे. यामध्ये दोन खोल्या होत्या आणि त्यांना वेगळे करणारा एक मोठा पडदा होता. पडद्याच्या पाठीमागे असणाऱ्या खोली मध्ये फक्त महायाजकच जाऊ शकत होता. कारण तेथे देव राहत होता

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 9

देवाची आज्ञा मोडणारा प्रत्येक माणूस त्या निवास मंडप समोर असलेलेया वेदीवर देवाला होमार्पण करायला पशु आणत असे. त्या पशुला मारून त्याचे त्या वेदीवर होमार्पण करत असे. त्या पशूच्या रक्ताद्वारे त्या माणसाच्या हातून घडलेले पाप झाकले जाऊन तो माणूस देवाच्या मर्जीने शुद्ध होत असे. मोशेचा भाऊ अहरोन व आहारोनाचे मुले याना देवाने आपले याजक म्हणून निवडले होते .

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 10

देवाने दिलेल्या आज्ञा पाळावयाला व फक्त त्याचीच पूजा करायला, त्याचे खास लोक होण्यास इस्राएल लोक सहमत झाले .पण देवाला आज्ञा पालन करण्याचे वचन देऊन थोड्याच दिवसांनी त्यांनी खूप मोठे पाप केले .

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 11

.भरपूर दिवस झाले. मोशे सिनाय पर्वतावर देवाशी बोलत होता. लोक त्याची वाट पाहत – पाहत कंटाळले, म्हणून त्यांनी सोने आणून त्याची मूर्ती बनवण्यासाठी ते सर्व आहारोनाकडे दिले.

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 12

आहरोनाने त्याची एक सोन्याच्या वासराची मूर्ती बनवली. लोक आपले भान सोडून त्या वासराची पूजा करू लागले. व त्या मूर्तीस यज्ञ करू लागले. त्याच्या ह्या पापामुळे देवला खूप राग आला व त्याने त्यांचा नाश करावा असे ठरवले .

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 13

पण मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना विनंती केली आणि देवाने त्याची प्रार्थना एकली व त्यांचा नाश करण्याचे टाळले, मोशेने पुन्हा दहा आज्ञा लोहीण्यासाठी दगडाच्या दोन नवीन पाट्या बनवल्या, कारण पहिल्या पाट्या त्याने रागात फोडल्या होत्या

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 14

मग मोशेने त्या मूर्तीचा बारीक चुरा केला, व चुरा त्याने पाण्यात टाकून ते पाणी लोकांना प्यावयास दिले. देवाने इस्राएल लोकांवर भयंकर पिडा पाठवली व त्या पिडेमध्ये बरेच इस्राएली लोक मारले गेले.

13. देवाचा इस्राएल लोकांशी करार — चित्र 15

मोशे पुन्हा सीनाय पर्वतावर गेला व त्याने लोकांच्या पापक्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली. देवाने मोशेचे एकले व त्यांना क्षमा केली. मोशे दहा आज्ञा लोहिलेल्या नव्या पाट्या घेऊन खाली उतरतो .मग देवाने सीनाय पर्वतापासून वचनदत्त देशाकडे जाण्यासाठी इस्राएल लोकांचे मार्गदर्शन केले .

बायबल कथाःनिर्गम 19-34

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।