14. जंगलात भटकणे
देवाने इस्राएल लोकांसोबत केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम व विधी त्यांना पाळण्यासाठी दिले होते. ते सांगितल्यानंतर त्यांनी सीनाय पर्वत सोडला. देव त्यांना वचन दत्त देशाकडे, ज्याला कनान देश पण म्हंटले जाते .त्याकडे त्यांना देव घेऊन जात होता. कनान देशाकडे जात असताना ढगांचा खांब त्यांच्या पुढे चालला व ते लोक त्याच्या माघे चालले
देवाने अब्राहम, इसहाक व याकोब यांना सांगितले होते की त्यांच्या पिढीतील लोकांना तो वचनदत्त देश देईल. पण आता तर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जातीचे लोक राहत होते. त्यांना कानांनी लोक म्हणत होते. कानांनी लोक देवाची आराधना उपासना करत नव्हते. व त्याची आज्ञा पाळत नव्हते. ते खोट्या देवतांची पूजा करीत होते, व भरपूर वाईट गोष्टी करत होते
देव इस्राएल लोकांस बोलला, “ वचनदत्त देशातील कानांनी लोकांचा तुम्ही पूर्णपणे नाश करा. त्यांच्यासोबत शांतीने वागू नका व त्यांच्याशी लग्न करू नका. तुम्ही त्यांच्या सर्व प्रकारच्या मुर्त्यांचा नाश करा .जर तुम्ही माझ्या आज्ञा व विधी पाळल्या नाही, तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्या मुर्त्यांची उपासना कराल त्याच्या पाया पडाल”
जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेजवळ आले. तेव्हा मोशेने इस्राएल च्या बारा वंशामधून प्रत्येकी एक एक असे माणसे निवडले. त्याने त्यांना सांगितले त्याठिकाणी कसे जायचे व देशाला कस हेराव याविषयी माहिती देऊन तो देश कसा आहे. हे बघण्या साठी पाठवले. कानांनी लोकांवर पण नजर ठेवायला सांगितले की ते लोक शक्तिशाली आहे की दुर्बल हे पाहावे
ही बारा माणसे चाळीस दिवसापर्यंत कनान देशात फिरून परत आले. त्यांनी लोकांना सांगितले .” जमीन एकदम सुपीक आहे व पीकपाणी भरपूर आहे. पण दहा हेर ( माणसे ) म्हणाले, “ शहरे खूप कट्टर व तटबंदीची आहे. तेथले लोक धिप्पाड व उंच आहे, “ जर आपण त्यांच्यावर आक्रमण केले तर ते नक्कीच आपलयाला जिंकू देणार नाही. व आपणास मारून टाकतील .
लगेचच कालेब आणि यहोशवा हे दोघे पण त्या सर्व हेराणा म्हणाले, “ कानानी लोक उंच व धिप्पाड बलाढ्य आहे ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे, पण आपण त्यांना निश्चितच हरवू शकतो. कारण देव आपल्या बाजूने लढेल
पण लोकांनी कालेब व यहोशवा यांचे एकले नाही. ते मोशे व अहरोन यांच्यावर रागावले. व बोलू लागले. “ तुम्ही अशा भयानक ठिकाणी आम्हाला का आणले ? इथे युद्धामध्ये मरण्यापेक्षा व आमच्या बायको मुलांना गुलाम बनवण्यापेक्षा आम्ही मिसर देशातच बरे होतो. आपल्यला परत मिसर देशात घेऊन जाईल असा नेता ते शोधत होते
हे बघून देव त्यांच्यावर भयंकर रागावला व दर्शन मंडपाजवळ आला. देव बोलला,” तुम्ही माझ्या विरुद्ध बंड केले आहे. आता तुम्हांला ह्या जंगलामध्ये भटकावे लागेल. फक्त यहोशवा आणि कालेब, यांना सोडून बाकी सर्व वीस वर्षाचे व वीस वर्षाच्या वरील लोक या जंगला मध्ये मरतील व त्यांचा वचनदत्त देशामध्ये प्रवेश नाही होणार,”
लोकांनी हे एकल्या नंतर, त्यांना असे केल्याचे दुख झाले. त्यांनी आपले हत्यारे घेऊन कनांनी लोकांवर युद्ध करण्यासाठी चढाई केली. मोशेने त्यांना मनाई केली व सांगितले की तुम्ही जाऊ नका कारण देव तुमच्याबरोबर नाही, तर त्यांनी मोशेचे एकले नाही.
या युद्धमध्ये देव त्यांचाबरोबर नव्हता, म्हणून ते त्या युद्धात हारले व बरेच इस्राएली तेथे मारले गेले. मग इस्राएली लोक कनांनदेशाजवळून परत आले व जंगलात चाळीस वर्षे फिरत राहिले.
त्यांच्या या चाळीस वर्षाच्या फिरण्याच्या वेळात देवाने जंगलात त्यांना सर्व काही पुरवले. त्याने त्यांना स्वर्गातील भाकर म्हणजे,” मान्ना “ त्यांना सर्वाना खायला दिला. त्याने त्यांच्या तंबू जवळ लाव्या पक्ष्याचे ( हे पक्षी छोटे व मध्यम आकाराचे असतात ) मोठे थवे पाठवले, अशासाठी की त्यांना मांस खायला मिळावे. या सर्व काळात देवाने त्यांचे कपडे फाटू दिले नाही व त्यांचे वाहने ( चप्पल ) घासू दिले नाही.
देवाने अद्भूत प्रकारे त्यांना खडकातून पाणी प्यायला दिले. पण तरीही इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर केली. तरी पण देव अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या वचना विषयी विश्वासू होता .
अझून लोकानी जेव्हा त्यांना प्यावयास पाणी नव्हते, तेव्हा देव मोशेला बोलला, “ खडकाशी बोल म्हणजे त्यातून पाणी निघेल. “ पण त्या खडकाला बोलण्याचे सोडून त्याने त्या खडकावर दोनदा काठी मारून इस्राएल लोकांसमोर देवाचा अपमान केला. सर्वाना पिण्यासाठी खडकातून पाणी आले, पण देव मोशेवर खूप रागावला आणि म्हणून, “ तु वचनदत्त देशात जाणार नाहीस असे देवाने त्याला सांगितले “
चाळीस वर्ष इस्राएल लोक जंगलात फिरले, ज्या इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले होते. ते सर्व तेथेच मरण पावले. मग देवाने लोकांस परत त्या वचनदत्त देशाकडे जाण्यास सांगितले. आणि त्यांचे मार्गदर्शन केले. मोशे आता खूप म्हातारा झाला होता. त्यामुळे देवाने लोकांचे नेतृत्व करण्यासाठी व त्यांची मदत करण्यासाठी यहोशवाला निवडले. देवाने मोशेस हे आश्वासन दिले की एक दिवस त्याच्या सारखाच दुसरा संदेष्टा देव पाठवील
मग देवाने मोशेस अबिराम पर्वताचे नबो नावाच्या एका उंच ठिकाणी जाऊन वचनदत्त देश पहावयास सांगितले. मोशेने वचनदत्त देश पहिला, पण देवाने त्याला तेथे जाण्यास सक्त मनाई केली. मग मोशे मरण पावला व इस्राएल लोकांनी चाळीस दिवस त्याच्यासाठी शोक केला. यहोशवा त्यांचा नवीन नेता बनला. यहोशावा एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विस्वास ठेवला व त्याच्या आज्ञा व विधी पाळल्या
बायबल कथाःनिर्गम 16-17; गणना 10-14; 20; 27; अनुवाद 34
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।