15. वचनाचा देश

15. वचनाचा देश — चित्र 1

आता इस्राएल लोकना कनान देशामध्ये जाण्याची वेळ आली, यहोशवाने कनानी शहर यरीहो मोठ्या वेशिनी सुरक्षित होते. तेथे दोन लोकांना पाहणी करण्यासाठी पाठवले. त्या शहरमध्ये रहाब नावाची एक वेश्या होती. तिने त्या लोकांना आपल्या घरात लपण्यास व पळून जाण्यास मदत केली.तिने असे केले कारण तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. जेव्हा इस्राएल लोक यरीहोचा नाश करतील. तेव्हा तिचे व तिच्या परिवाराला सांभाळतील असे तिला वचन दिले होते. इस्राएल लोकांना कनान देशात जाण्यासाठी यार्देन नदी ओलांडणे गरजेचे होते.

15. वचनाचा देश — चित्र 2

परमेश्वराने यहोशवाला सांगितले, पहिले याजकाना पुढे पाठव. जेव्हा याजकांच्या पाय त्या पाण्याला लागले तेव्हा यार्देन नदीचा प्रवाह थांबला व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून चालत नदीच्या पलीकडे गेले. यार्देन नदी ओलांडल्यावर परमेश्वराने सांगितले की कसा यरीहो शहरावर मारा करावा.

15. वचनाचा देश — चित्र 3

लोकांनी परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. सर्व सैनिकांनी व सर्व याजकांनी यरीहो शहराला सहा दिवस प्रत्येक दिवशी एक चक्कर मारला, मग सातव्या दिवशी इस्राएल लोकांनी आझून सात वेळा त्या शहराला चक्कर मारल्या.

15. वचनाचा देश — चित्र 4

शेवटच्या वेळेस चक्कर मारताना सैनिकांनी गर्जना केल्या व याजकांनी आपले तुताऱ्या वाजवल्या. मग यरीहो शहराच्या भिंती पडल्या.

15. वचनाचा देश — चित्र 5

परमेश्वराने सांगितल्या प्रमाणे इस्राएल लोकांनी त्या शहराचा नाश केला. त्यांनी फक्त राहाब व तिच्या परिवाराला जिवंत ठेवले, जे नंतर इस्राएल लोकांचाच भाग बनले. कनान मध्ये राहणाऱ्या दुसऱ्या लोकांनी एकेले की इस्राएली लोकांनी यरीहो शहराचा नाश केला आहे, तेव्हा इस्राएली लोक त्यांच्यावरही हल्ला करतील अशी त्यांना बीती वाटत होती. परमेश्वराने इस्राएल लोकांना आज्ञा केली की त्यांनी कनांनी लोकांशी कोणताच करार करायचा नाही.

15. वचनाचा देश — चित्र 6

पण गीबोनी समाजाची लोक कनान देशातील एक छोटासा गट यहोशवा सोबत खोट बोलला की ते कनानापासून लांब राहतात. त्यांनी यहोशवा त्यांच्यासोबत शांतीचा करार करावा अशी त्यानी विनंती केली. यहोशवा व इस्राएल लोकांनी गीबोनी लोक कुठून आले हे परमेश्वराला विचारले नाही.

15. वचनाचा देश — चित्र 7

म्हणून यहोशवाने त्यांच्याशी शांतीचा करार केला. जेव्हा इस्राएली लोकांना समजले की गीबोनी लोकांनी त्यांना फसवले आहे. तेव्हा ते खूप चिडले, पण तरीही त्यांनी तो करार पाळला कारण त्यांनी परमेश्वरासमोर त्यांना वचन दिले होते. काही दिवसांनी कानानमधील दुसरे लोक यांच्या राज्यांनी, अमोरी लोकांनी एकले, की गीबोनी लोकांनी इस्राएल लोकांबरोबर करार केला आहे. तेव्हा त्यांनी गीबोनी लोकंवर हल्ला केला. गीबोनी लोकांनी यहोशवा कडे निरोप पाठवला व त्यांना मदत करण्यासाठी विनंती केली. तेव्हा यहोशवाने इस्राएल सैनिकांना जमा केले, व गीबोण्यांकडे जाण्यासाठी रात्रभर चालता राहिले.

15. वचनाचा देश — चित्र 8

सकाळीच त्यांनी अमोरी सैनिकांना थक्क केले व त्यांच्यावर हल्ला केला त्या दिवशी इस्राएला कडून परमेश्वर लढला.

15. वचनाचा देश — चित्र 9

त्याने अमोरी सैनिकामध्ये गोंधळ निर्माण केला, व त्यांच्यावर मोठ्या गर पडल्या, ज्यामध्ये भरपूर अमोरी लोक मरून गेले. परमेश्वराने सूर्याला आकाशात एक जागेवर राहण्याची आज्ञा केली, कारण इस्राएल लोकांनी अमोऱ्यांचा नाश करण्यासाठी वेळ मिळावा.

15. वचनाचा देश — चित्र 10

त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना जिंकवले, परमेश्वराने त्या सैनिकांना हरवले, भरपूर कनानी लोकांनी एकत्र येऊन इस्राएल लोकांवर हल्ला केला.

15. वचनाचा देश — चित्र 11

यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांचा नाश केला, या लढाईनंतर परमेश्वराने इस्राएल लोकांना त्यांच्या पिढी प्रमाणे वचनाचा देश वाटून दिला

15. वचनाचा देश — चित्र 12

नंतर परमेश्वराने इस्राएलच्या सर्व सीमांवर शांती आणली. जेव्हा यहोशवा म्ह्नातारा झाला, तेव्हा त्याने सर्व इस्राएली लोकांना एकत्र केले.

15. वचनाचा देश — चित्र 13

मग यहोशवाने इस्राएली लोकांना परमेश्वराने त्यांच्याशी केलेल्या सीनाय डोंगरावर केलेल्या कराराची आठवण करून दिली. की त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या सर्व लोकांनी परमेश्वराशी विश्वासू राहायचे त्याच्या आज्ञा पाळायच्या असे वचन दिले. पवित्र शास्त्र

यहोशवा 1-24

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।