16. तारणारे

16. तारणारे — चित्र 1

यहोशवा मेल्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराचे आयकले नाही उरलेल्या कनानी लोकांना हाकलून दिले नाही, व परमेश्वराचे आज्ञा पाळल्या नाही यहोवा खऱ्या परमेश्वराची आराधना न करता इस्राएली लोक कनानी देवांची पूजा करू लागले. इस्राएल लोकांना राजा नव्हता म्हणून प्रतेक झन आपल्या बरे वाटेल त्या गोष्टी करत होते.

16. तारणारे — चित्र 2

इस्राएल लोकांनी देवाची आज्ञा नेहेमी मोडल्या मुळे परमेश्वराने त्यांना त्यांच्या वैर्यांच्या पुढे हरवले, व त्यांना शिक्षा दिली, ह्या वैर्यानी इस्राएल लोकांच्या वस्तूंची चोरी केली, त्यांच्या संपत्ती नाश केला, व त्यांच्यातील कित्येकांना मारून टाकले. भरपुर वर्षानंतर देवाची आज्ञा न आयकल्याने व वैर्यांच्या त्रास सोसल्यावर त्यांचे डोळे उघडले व त्यांनी यातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना केली.

16. तारणारे — चित्र 3

मग परमेश्वराने त्यांच्यासाठी एक सोडवणारा पाठवला ज्याने त्यांना वैर्यांपासून साडवले व त्यांच्यामध्ये शांती कायम ठेवली. पण नंतर इस्राएल लोक परमेश्वराला विसरले, व ते परत दुसर्या देवांची पूजा करायला लागले, मग परमेश्वराने त्यांच्या शेजारी मिद्यानी लोकांच्याद्वारे त्यांना हरवले.

16. तारणारे — चित्र 4

मिद्यानी लोकांनी सात वर्षांपर्यंत इस्राएल लोकांचे अन्न धन्य चोरले. इस्राएली लोक खूप घाबरले व आपण आपल्या वैर्यांच्या हातात सापडू नये. म्हणून ते गुहेत राहायला लागले. शेवटी त्यांनी वाचावे म्हणून ते परत परमेश्वराकडे प्रार्थना करू लागले.

16. तारणारे — चित्र 5

एकदिवशी गीदोन नावचा एक इस्राएली माणूस मिद्यानांनी आपले अन्न धान्य चोरू नये, म्हणून लपून त्यांना झटकत होता, परमेश्वराचा एक देवदूत येवून त्याला म्हणाला, हे बलवान माणसा परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. जाऊन इस्राएल लोकांना मिद्यानाच्या हातातून सोडव.

16. तारणारे — चित्र 6

गीदोनाच्या बापाने एका मूर्तीसाठी एक वेडी बनवली, परमेश्वराने ती वेडी तोडायला सांगितले. पण गीदोन लोकांना घाबरला व तो अंधार पडण्याची वात बघत होता. मग त्याने ती वेदी तोडून तिचे तुकडे तुकडे केले. मूर्तीसाठी बांधलेल्या वेदिजवळ त्याने जिवंत परमेश्वरासाठी एक नवीन वेदी बांधली. व त्यावर त्याच्यवर अर्पण केले.

16. तारणारे — चित्र 7

दुसऱ्या दिवशी त्या वेदिजवळ कोणीतरी तोडफोड केली आहे हे बघून ते लोक चिडले. ते गीदोनाला मारून टाकण्यासाठी त्याच्या घरी गेले. पण गीदोनाचा बाप त्यांना म्हणाला, तुम्ही आपल्या देवाची मदत करण्याचा प्रयत्न का करता? जर तो देव आहे तर त्याला त्याचे रक्षण करू द्या, त्याने असे बोलल्यामुळे त्यांनी गीदोनाला मारले नाही.

16. तारणारे — चित्र 8

मग मिद्यानी लोक परत इस्राएल लोकांचे अन्न चोरायला आले. ते लोक भरपूर होते. ते मोजता येणार नाही एव्हडे होते गीदोनाणे इस्राएल लोकांना जमा केले. व मिद्यानी लोकांसोबत लढाईला तयार केले. गीदोनाला इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सुटकेसाठी परमेश्वर उपयोग करणार आहे हे त्याला माहिती होते. म्हणून परमेश्वराकडे त्याने दोन चिन्हे मागितली.

16. तारणारे — चित्र 9

पहिले चिन्ह गीदोनाने जमिनीवर कपडा ठेवला व परमेश्वराला म्हंटले की उद्या सकाळी जमिनीवर ओलावा न राहता फक्त माझ्या कपड्यावर ओलावा राहावा, परमेश्वराने तसेच केले दुसऱ्या रात्री त्याने म्हंटले की जमीन भिजवी पण कपडा सुकलेला असावा असे होवो, परमेश्वराने तेही केले. ह्या दोन्ही चिन्हाच्या द्वारे गीडोनाला खरे पटले की परमेश्वर त्याचा उपयोग इस्राएल लोकांना सोडवण्यासाठी करत आहे.

16. तारणारे — चित्र 10

32,000 इस्त्रायली सैनिक त्याच्याकडे आले, परंतु देवाने त्याला सांगितले की, ते खूप आहेत.म्हणून युध्द करण्यास भिणा-या 22000 सैनिकांना त्याने परत पाठविले.देवाने गिदोनास सांगितले की ते अजूनही पुष्कळ आहेत.म्हणून 300 सैनिकांना सोडून बाकी सर्वांना त्याने घरी पाठवून दिले.

16. तारणारे — चित्र 11

त्या रात्री देवाने गिदोनास सांगितले,‘‘तू मिद्यान्यांच्या छावणीकडे जा व ते काय बोलतात हे ऐकून भयभित होऊ नकोस.’’म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला व आपणास पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या मित्रास सांगत असल्याचे गिदोनाने ऐकले.त्या सैनिकाचा मित्र म्हणाला,‘‘ हया स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य मिद्यानी सैन्यांचा पराभव करील असा होतो!’’गिदोनाने हे ऐकून देवाची उपासना केली.

16. तारणारे — चित्र 12

मग गिदोन आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली.मिद्यानी सैनिक झोपले होते त्या छावणीस त्यांनी घेरा घातला.गिदोनाच्या 300 सैनिकांनी आपल्या मशाली मडक्यात घालून ठेवल्यामुळे मिद्यान्यांना त्यांचा प्रकाश दिसला नाही.

16. तारणारे — चित्र 13

मग, एकाच वेळी गिदोनाच्या सैनिकांनी मडकी फोडली व आपल्या मशालीचा जाळ दिसू दिला.त्यांनी आपापली रणशिंगे फूंकली व गर्जना केली,‘‘याव्हे देवाची तलवार व गिदोनाची तलवार!’’

16. तारणारे — चित्र 14

देवाने मिद्यान्यांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसांतच एकमेकांवर हल्ले करु लागले व मारु लागले.लगेच, मिद्यान्यांना हाकलण्यासाठी मदत करायला म्हणून बाकीच्या इस्राएली लोकांना त्यांच्या घरी बोलावणे पाठवले गेले.त्यांनी त्यांपैकी कित्येकांना जीवे मारिले व बाकीच्यांना इस्त्राएलाच्या भूमितून घालवून दिले.त्याच दिवशी 120000 मिद्यांनी सैनिक मारले गेले.देवाने इस्त्रायलाची अशा प्रकारे सुटका केली.

16. तारणारे — चित्र 15

लोक गिदोनास आपला राजा बनवू पहात होते.गिदोनाने त्यांना असे करण्यास मना केले, पण त्यांच्यातील प्रत्येकाने मिद्यान्यांकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठयांपैकी कांही त्याने मागितल्या.लोकांनी गिदोनास पुष्कळ सोने दिले.

16. तारणारे — चित्र 16

मग गिदोनाने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले.परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले.मग देवाने इस्त्रायलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती.देवाने त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला.शेवटी त्यांनी देवाचीच मदत मागितली व देवाने त्यांना दुसरा तारणारा पाठविला.

16. तारणारे — चित्र 17

हया नमुन्याची अनेकदा पुनरावृत्ती झाली. इस्त्रायली पाप करत, देव त्यांना शासन करी, ते पश्चात्ताप करत आणि देव त्यांचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत असे.अनेक वर्षापासून, देवाने इस्त्राएली लोकांकडे त्यांना शत्रूंपासून सोडविण्यासाठी अनेक तारणारे पाठविले.

16. तारणारे — चित्र 18

शेवटी, लोकांनी इतर राष्ट्रांसारखा राजा देवाकडे मागितला.त्यांना उंच, सशक्त व युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा हवा होता.देवाला हे आवडले नाही, तरीही त्याने त्यांच्या मागणी नुसार त्यांना एक राजा दिला.

पवित्र शास्त्र :शास्ते 1-39 ; 6-8

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।