17. देवाचा दाविदाबरोबर करार
शौल इस्राएलचा पहिला राजा. इस्राएल लोकांना पाहिजे तसा दिसायला सुंदर व उंच होता. काही वर्षे शौलाने इस्राएलवर राज्य केले. पण नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मोडली, म्हणून देवाने त्याच्या जागेवर दुसरा माणूस राज्य करण्यासाठी निवडला
देवाने शौलानंतर दाविद नावाच्या एका इस्राएल नवतरुण मुलाला राजा होण्यासाठी निवडले. दाविद हा बेथलेहेम नगरीतला एक मेंडपाळ होता. आपल्या पित्याचे मेंढरे राखत असताना दविदाने बऱ्याचदा मेंढरावर हल्ला करणाऱ्या सिंह आणि अस्वलीला मारून टाकले होते. दाविद हा खूप नम्र व देवाला भिणारा नीतिमान माणूस होता.
दाविद एक महान योद्धा व पुढारी बनला. दाविदाने लहान वयातच गल्याथ नावाच्या राक्षसरुपी माणसासोबत युद्ध केले. गल्याथ एक शिक्षित, बलाढ्य व तीन मीटर उंचीचा माणूस ( सैनिक ) होता. पण देवाने दाविदाची मदत केली व त्याच्याकडून गाल्याथाचा वाढ केला. व इस्राएल लोकांना सोडविले. त्याच्यानंतर दविदाने इस्राएलच्या शत्रूंवर बऱ्याच दा जय मिळवला त्यामुळे इस्राएल लोकांनी त्याची प्रशंसा केली.
लोक दाविदाची प्रशंसा करत असता. शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने बऱ्याचदा त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण दाविद स्वतःला शौलापासून लपवत होता. एकदा शौल दाविदाला मारण्यासाठी शोधत होता. दाविद लपलेल्या गुहेमध्ये शौल गेला. पण शौलाला तो दिसला नाही. दाविद शौलाच्या अगदी जवळ होता. व तो त्याला मारू शकत होता. पण त्याने तसे केले नाही. पण त्याने शौलाच्या कपड्याचे एक काठ कापला व हे दाखवले की राजा होण्यासाठी तो शौलाचा वध करणार नाही.
नंतर शौल युद्धात मेला आणि दाविद इस्राएलचा राजा झाला. तो खूप चांगला राजा होता आणि लोक त्याच्यावर खूप प्रेम करत होते. देवाने दाविदाला आशीर्वादित केले. व तो सफळ झाला. दाविदाने बरेच युद्ध केले व देवाने त्याला इस्राएलच्या शत्रूवर विजय मिळवून दिला. दाविदाने यरुशलेम जिंकले व तिला आपली राजधानी बनवले. दाविदाच्या काळात इस्राएल शक्तिशाली व श्रीमंत राष्ट्र झाले.
दाविदाला एक मंदिर बांधायच होत. ज्याच्यात सर्व इस्राएली लोक देवाची आराधना व अर्पण करू शकतील. जवळपास 400 वर्षे इस्राएली लोक मोशेने तयार केलेल्या दर्शन मंडपासमोर देवाची आराधना व अर्पणे आणत.
पण देवाने नाथान संदेष्ट्याच्या द्वारे दाविदाला सांगितले. की तु युद्धाचा माणूस आहेस. त्यामुळे तु मंदिर बांधू शकणार नाहीस. “ तुझा मुलगा ते मंदिर बांधेल. पण मी तुला खूप आशीर्वादित करीन. तुझ्याच पिढीतील एक व्यक्ती माझ्या लोकांवर राज्य करील. सदासर्वदा राज्य करणारा दाविदाच्या वंशातला एकच माणूस म्हणजे “मसीहा “ हा देवाचा निवडलेला अभिषिक्त जगातील सर्व लोकांना त्यांच्या पापापासून सोडविणार.
दाविदाने हे शब्द ऐकल्यावर देवाचा धन्यवाद केला. व त्याची प्रशंसा केली. कारण देवाने त्याला हा सन्मान व अनेक आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते. देव हे अभिवचने कधी पूर्ण करेल याविषयी दाविदाला काहीच माहिती नव्हत. पण मसीहा येण्याच्या पहिले इस्राएली लोकांना जवळपास 1000 वर्ष त्याची वाट बघावी लागली.
दाविदाने विश्वासूपने व न्यायाने बरेच वर्ष राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले. पण त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुद्ध मोठे पाप केले.
एका दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना, त्याने आपल्या राजवाड्यातून एक सुंदर बाई आंघोळ करताना पहिली. तिचे नाव बथशेबा होते.
दुसरीकडे पाहण्या ऐवजी, दाविदाने त्या बाईला ( बथशेबा ) आपल्याकडे आण्यासाठी कोणालातरी पाठवले. तो तिच्या जवळ झोपला. व तिला तिच्या घरी पाठवून दिले. कांही काळानंतर आपण गरोधर असल्याचा निरोप तिने दाविदास कळविला.
बथशेबाचा नवरा उरिया हा दाविदाचा शूरवीर सैनिक होता. दाविदाने उरीयास युद्धापासून परत बोलावले. व आपल्या पत्नीसोबत राहण्यास सांगितले. पण दुसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे चांगले नाही. असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे दाविदाने उरीयास परत युद्धासाठी रवाना केले. व सेनापतीला सांगितले. की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरीयाला नेमावे. म्हणजे उरिया युद्धात मारला जाईल.
उरीया मेल्यावर दाविदाने बथशेबाशी लग्न केले. नंतर तिने दाविदाच्या मुलाला जन्म दिला. दाविदाने केलेल्या पापाबद्दल देवाचा राग भडकला, व त्याने नाथान संदेष्ट्याच्या द्वारे दाविदाचे पाप किती दुष्ट आहे हे त्याला दाखवले. दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चात्ताप केला आणि देवाने त्याला क्षमा केली. नंतर मरेपर्यंत दाविदाने अगदी कठीण प्रसंगात पण देवाच्या आज्ञा पाळल्या.
पण पापाची शिक्षा म्हणून दाविदाचा मुलगा मेला. दाविदाच्या उरलेल्या दिवसात त्याच्या जीवनात व कुटुंबात भांडणे होत गेली. व त्याचे सामर्थ्य पण खूप कमी झाले. जरी दाविद देवाशी विश्वासू राहू शकला नाही. तरीपण देव आपल्या वाचनाविषयी दाविदाशी विश्वासू राहिला. नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी रक मुलगा झाला, आणि त्याचे नाव त्यांनी शालमोन ठेवले.
बायबल कथा : शमूवेल 10; 15-19; 24; 31; 2 शमूवेल 5 : 7; 11 - 12
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।