18. राज्याची विभागणी
बऱ्याच वर्षानंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा मुलगा शलमोन हा इस्राएलावर राज्य करू लागला. देवाने शलमोनास दर्शन देऊन त्याला काय पाहिजे आसे विचारले. तेव्हा शाल्मोनानी बुद्धी मागितली तेव्हा देव त्याच्यावर खूप खुश झाला आणि देअवाने त्याला जगातील सर्वात ज्ञानी व्यक्ती बनवले. शल्मोन खूप गोष्टी शिकला व एक हुशार न्यायाधीश झाला. देवाने त्याला खूप श्रीमंत पण बनविले.
आपला बाप दाविद याच्या इच्छा प्रमाणे व त्याने जमा केलेल्या सर्व साधन संपत्तीने शलमोनाने यरुशलेम मध्ये एक मंदिर बांधले. लोक दर्शनमंडपासमोर आराधना न करता आता मंदिरात देवाची आराधना व अर्पण करू लागले. देव मंदिरात आला व त्याची उपस्थिती त्या मंदिरात होती, देव आपल्या लोकांमध्ये वस्ती करू लागला.
पण शलमोनाने परदेशीय बायांवर प्रेम केले. त्याने अनेक स्त्रियांशी लग्न केले व देवाची आज्ञा मोडली. त्याने 1000 बायांशी लग्न केले. त्यापैकी बऱ्याच बाया परदेशी होत्या त्यांनी आपापली देवदेवता पण आपल्या सोबत आणली व त्यांची पूजा करू लागल्या. शल्मोन पण म्हातारा झाल्यावर त्यांच्यासोबत त्या देवांची पूजा करू लागला
देव शल्मोनाच्या वागण्याविषयी त्याच्यावर रागावला. त्याच्या ह्या अविश्वासूपनाबद्दल देवाने त्यांस शिक्षा केली. देवाने शल्मोनाच्या मरणानंतर इस्राएलचे दोन भागात विभाजन केले
शल्मोन मरण पावल्या नंतर त्याचा मुलगा रहबाम हा राजा झाला. रहबाम हा एक मूर्ख माणूस होता. इस्राएल राष्ट्रातील लोकांनी त्याला राजा म्हणून मान्यता दिली. व त्याचा राज्याभिषेक करण्यासाठी जमले. त्यांनी रहबामकडे गाऱ्हाणे केले की, शलमोनाने त्यांच्याकडून खूप कष्ट करून घेतले. व ज्यास्त प्रमाणात जकात गोळा केला.
रहबामाने वेड्यासारखे त्यांना उत्तर दिले की, “ तुम्हला वाटत असेल की माझा बाप शल्मोन याने तुमच्याकडून ज्यास्त कष्ट करून घेतलीत. पण मी तर त्यांच्यापेक्षा ज्यास्त तुमच्याकडून कष्ट करून घेइल् व तुमच्याशी अगदी गंभीर प्रकारे वागेन.”
इस्राएल राष्ट्राच्या दहा वंशानी जमून रहबाम विरुद्ध बंद पुकारले. फक्त दोनच वंश त्याच्याशी विश्वासू होते. हे दोन वंश मिळून याहुदाचे राज्य झाले.
इस्राएल राष्ट्राच्या त्या दहा बंडखोर वंशानी अबीयाम नावाच्या माणसाला आपला राजा म्हणून नेमले. त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यांस इस्राएल चे राज्य सांगितले.
अबीयामाने देवाविरुद्ध बंद केला. व लोकांना पापात पाडले. याहुद्यांच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात आराधना न करता त्याने आपल्या लोकांसाठी दोन मुर्त्या बनविल्या व त्यांची पूजा करू लागले.
याहुद्यांचे राज्य व इस्राएलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्याच्यामध्ये नेहेमी युद्ध होऊ लागले.
इस्राएलच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे अगदी दुष्ट होते. त्यापैकी बऱ्याच राज्यांना अन्य इस्राएली लोकांनीच मारले. जे त्या जागेवर बसू बघत होते.
सर्व राजे व इस्राएली राज्यातील मोठी प्रजा मूर्तीची पूजा करू लागली. त्यांच्या ह्या मुर्तीपुजेत बऱ्याच दा व्यभिचार व नरबली म्हणजे लहान मुलांचे पण अर्पणाचा समावेश होता.
याहुदाचे राजे हे दाविदाचे वंशातील होते. त्यापैकी काही राजे चांगले होते. त्यांनी न्यायाने राज्य केले. आणि खऱ्या देवाची उपासना केली.पण यहुद्यांच्या राजापैकी अनेक राजे खूप दुष्ट होते. त्यांनी बहकून जाऊन मूर्तीपूजा केली. त्यापैंकी काही राजांनी तर स्वतःच्या मुलांचे पण अर्पण मूर्तींना केले. यहुद्यांच्या राज्यातील मोठ्या प्रजेने हे देवाविरुद्ध बंद केले. व अन्य मूर्तींची पूजा केली.
बायबल कथा :1 राजे 1 - 6; 11 - 12
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।