19. संदेष्ट्ये

19. संदेष्ट्ये — चित्र 1

इस्राएलच्या सर्व भूतकाळात, देवाने त्यांच्याकडे संदेष्ट्ये पाठवले. संदेष्ट्यांच्या द्वारे देव त्यांना संदेश देत होता. व तो लोकांपर्यंत पोहोचावीत होता.

19. संदेष्ट्ये — चित्र 2

जेव्हा आहाब इस्राएलचा राजा होता तेव्हा एलीया हा संदेष्टा होता. आहाबा हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बाल्देवाची आराधना करण्यास लाविले. एलीया आहाबास म्हणाला, “ जोपर्यंत मी सानागत नाही तोपर्यंत इस्राएल्मधे पाऊस पडणार नाही. “ हे शब्द ऐकून आहाबाला खूप राग आला

19. संदेष्ट्ये — चित्र 3

आहाब एलीयाला मारण्यास टपला होता. म्हणून देवाने एलीयास जंगलात एका तळ्याजवळ लपून राहण्यास सांगितले. रोज सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देव त्याला अन्न पाठवत होता. अहाब व त्याचे सैन्य एलीयास शोधात होते. पण त्यांना तो सापडला नाही. पण दुष्काळ एव्हडा वाढला की ते तळे पण आटून गेले.

19. संदेष्ट्ये — चित्र 4

म्हणून एलीया शेजारच्या देशामध्ये गेला. त्या देशात राहणारी एक विधवा व तिचा मुलगा यांच्याकडे असणारे अन्न दुष्काळामुळे संपत आले होते. पण त्यांनी एलीयाची काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पुरवल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुपीतील तेल कधीच संपले नाही. संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत त्यांच्याकडचे अन्न भरपूर होते. एलीया त्या ठिकाणी भरपूर दिवस राहिला.

19. संदेष्ट्ये — चित्र 5

साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयाला इस्राएलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठवणार आहे. अशी घोषणा आहाब राज्यासमोर करण्यास सांगितली. जेव्हा आहाबाने त्याला बघितले तेव्हा तो म्हणाला, “ तूच ना तो त्रासदेणारा “ एलीयाने उत्तर दिले, “ तूच आहे त्रास देणारा, तु आपल्या खऱ्या ( यहोवा ) देवाची उपासना सोडून बाल्देवाची पूजा करत आहेस. इस्राएलच्या सर्व लोकांना कर्मेल डोंगरावर घेऊन ये,

19. संदेष्ट्ये — चित्र 6

तेव्हा इस्राएलचे सर्व लोक, बाल्देवाच्या 450 संदेष्ट्यासोबत कर्मेल डोंगरावर आले. एलीया लोकांना म्हणाला, “ तुम्ही किती वेळ आपले मन बदलत राहणार ? जर यहोवा खरा आहे तर त्याचीच सेवा करा. जर बालदेव खरा असेल तर त्याची सेवा करा.

19. संदेष्ट्ये — चित्र 7

मग एलीया बाल्देवाच्या संदेष्ट्याना म्हणाला, “ एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यांस आग लावू नका. मी पण तसेच करेन. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव खरा “ अशा प्रकारे बाल्देवतेच्या याजकांनी होमार्पण तयार केले. पण त्यास आग लावली नाही.

19. संदेष्ट्ये — चित्र 8

मग बाल्देवतेच्या याजकांनी व संदेष्ट्यानी खूप प्रार्थना केल्या विनवण्या केल्या, “ बाल्देवता आमचे एका “ ते दिवसभर प्रार्थना करत राहिले व ओरडत राहिले. त्यांनी स्वतःला चाकूने कापले तरीही त्यांना बाल्देवाने उत्तर दिले नाही.

19. संदेष्ट्ये — चित्र 9

शेवटी संद्याकाळ झाली एलीयाने देवासाठी होमार्पण तयार केले. मग त्याने लोकांस बारा घागरी व पाण्याने भरलेले मोठे भांड्यातले पाणी त्या होमबली व इंधनावर टाकायला लावले. इतके की होमबली व इंधन व वेदी जवळची सर्व जमीन पाण्याने भिजून गेली.

19. संदेष्ट्ये — चित्र 10

मग एलीयाने प्रार्थना केली की, हे देवा, अब्राहाम, इसहाक व याकोबाच्या देवा, इस्राएल्मध्ये तुच देव आहे. व मी तुझा सेवक आहे हे सर्वांस दाखव. मला उत्तर दे म्हणजे तूच खरा देव आहेस अशी या लोकांना खात्री पटेल.

19. संदेष्ट्ये — चित्र 11

तेव्हा देवापासून अग्नी आला आणि त्या अग्नीने होमबली, इंधने, दगड आणि माती ते साठलेले पाणी पण भस्म केले. हे पाहून सर्व लोक पालथे पडले व म्हणाले, की देव यहोवा हाच खरा देव आहे.

19. संदेष्ट्ये — चित्र 12

तेव्हा एलीया त्यांना म्हणाला, “ बाल्देवाच्या संदेष्ट्याना धरा, त्यातल्या एकालापण पळून जाऊ देऊ नका, तेव्हा त्यांनी त्यांस पकडून लांब नेऊन, मारून टाकले.

19. संदेष्ट्ये — चित्र 13

मग एलीयाने आहाबास सांगितले, “ लवकर नगरात जा कारण पाउस येत आहे.” लगेच आकाशात काळे ढग जमा झाले. व खूप मुसळधार पाऊस पडू लागला. यहोवा देवाने अशाप्रकारे दुष्काळ दूर केला व आपणच देव आहे हे दाखवले.

19. संदेष्ट्ये — चित्र 14

एलीया नंतर देवाने आलीशा नावाच्या माणसाला निवडले. देवाने आलीशाद्वारे अनेक चमत्कार केले. एक चमत्कार तर शत्रूच्या टोळीतला सेनापती नामान, याच्यासाठी केला.त्याला एक भयंकर कुष्ट रोग होता. त्याने आलीशा विषयी ऐकले म्हणून तो त्याच्याकडे आला व आपणास बरे करावे अशी विनंती केली. आलीशाने नामानास यार्देन नदीत सात वेळा डुबक्या मारायला लावल्या.

19. संदेष्ट्ये — चित्र 15

सुरुवातीला नामानास राग आला की ह्या गोष्टी वायफळ आहेत, कारण ते त्याला मूर्खपणाचे वाटत होते. पण नंतर त्याचे मन परिवर्तन झाले व त्याने यार्देन नदीत जाऊन सात वेळा डुबक्या मारल्या, जेव्हा सातवी डुबकी मारली तेव्हा त्याचा रोग पूर्ण पाने बारा झालेला त्याला दिसला देवाने त्याला बरे केले होते.

19. संदेष्ट्ये — चित्र 16

देवाने अन्य संदेष्ट्याना पाठवले. त्या सर्वांनी लोकांना सांगितले की मूर्तीपूजा बंद करा आणि दुसऱ्या लोकांना न्याय व दया दाखवा असे सांगितले.संदेष्ट्यानी त्यांना सावध केले की जर त्यांनी आपला वाईटाचा मार्ग सोडून देवाच्या आज्ञेच पालन केले नाही तर देव त्यांना शिक्षा करेल.

19. संदेष्ट्ये — चित्र 17

भरपूर वेळा लोकानी देवाच्या आज्ञा पाळल्या नाही, त्यांनी परत परत संदेष्ट्याचा अपमान केला व कधी कधी तर त्यांना मारून टाकले. एकदा त्यांनी यिर्मया संदेष्ट्यास मारण्यासाठी कोरड्या विहिरीत ढकलून दिले. विहिरीच्या तळाशी असलेल्या गालामध्ये तो अडकला, पण नंतर राजाला त्याची दया आली. व तो मारण्याच्या आधी काढण्याची त्याने त्या सेवकांना आज्ञा दिली.

19. संदेष्ट्ये — चित्र 18

जरी लोक त्यांचा द्वेष करत होते, तरी संदेष्टे देवासाठी बोलत होते. त्यांनी लोकांना सावध केले की जर त्यांनी पश्च्यात्ताप नाही केला. तर देव त्यांचा नाश कारील. देवाच्या वचना प्रमाणे मसीहा ( ख्रिस्त ) येणार याची पण आठवण त्यांना करून दिली.

बायबल कथा :1 राजे 16 - 18; 2 राजे 5 ; यिर्मया 38

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।