20. पाडाव आणि सुटका
इस्राएलचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनी देवाविरुद्ध पाप केले. देवाने त्यांच्याशी सिनाय डोंगरावर केलेला करार त्यांनी तोडला. त्यांनी पश्चात्ताप करावा व देवाकडे वळावे म्हणून देवाने भविष्यवक्ते पाठवले, पण त्यांनी आज्ञेंचा नकार केला.
म्हणून देवाने त्या दोघी राज्यांना शिक्षा केली. त्यांच्या शत्रूंच्या हातून त्यांचा नाश होऊ दिला. अश्शूर ह्या दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्राएलचा नाश केला. अश्शूरी लोकांना इस्राएलच्या खूप लोकांना मारून टाकले, मौल्यवान वस्तू लुटून घेतली. व देशाचा बराच भाग अग्नीने जाळून टाकीला.
अश्शूरी लोकानी इस्राएलच्या सर्व नेत्यांना, धनवानाना व कुशल कारागीर यांना एकत्र करून आपल्या देशाकडे नेले. केवळ जे गरीब लोक जे युद्धामध्ये मारले गेले नाही, तेच इस्राएली लोक त्याठिकाणी शिल्लक राहिले.
तेव्हा अश्शुराने इस्राएल लोक राहत होते त्याठीकाणी परदेशी लोकांना राहण्यासाठी आणले. परदेशियानी नाश झालेले शहर पुन्हा तयार केले. व इस्राएली स्त्रियांशी त्यांनी लग्न केले. इस्राएली वंशापैकी ज्या लोकानी परदेशियांशी लग्न केले. त्यांना शोमारोनी माण्यात आले.
यहुदा राज्यातील लोकांनी बघितले की, इस्राएली लोकांना त्यांच्या अविश्वास व आज्ञाभंग केल्यामुळे देवाने त्यांना शिक्षा दिली आहे. पण तरीही त्यांनी मूर्तीपूजा केली व कनानी देवदेवतांची आराधना केली. देवणी त्यांना सावध केले व त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले, पण त्यांनी त्यांचे पण ऐकले नाही.
जवळपास 100 वर्षानंतर जेव्हा अश्शूराने इस्राएल राष्ट्राचा नाश केला, तेव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखदनेसर ह्या बाबेलच्या राज्याला पाठवले. बाबेल हे एक प्रबळ व शक्तिशाली मोठे राष्ट्र होते. यहूदाचा राजा नबूखदनेसर राजाचा सेवक होण्यास तयार झाला. व प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पैशाची रक्कम देण्यास पण तयार झाला.
पण काही वर्षानंतर यहूदाचा राजाने बाबेल विरुद्ध बंद पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहूदाचा राज्यावर चढाई केली. व त्यांनी यरुशलेम शहर त्यांनी ताब्यात घेतले. मंदिराचा नाश केला. शहर व मंदिरातली सर्व संपत्ती घेऊन गेले.
यहूदाचा राज्याचे हे बंद पुकारल्यामुळे शिक्षा म्हणून नबूखदनेसरच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलांना मारून टाकले. व त्या राज्याचे डोळे फोडून त्याला मारण्यासाठी बाबेल मधील बंदिशाळेत टाकले.
नबूखदनेसर व त्याच्या सर्व सैनिकांनी याहुदाच्या राज्यातील जवळपास सर्व लोकांना बाबेल मध्ये आणले फक्त जे खूपच गरीब होते. त्यांना शेती करण्यासाठी माघे ठेवले. ह्याच काळात जेव्हा देवाच्या लोकांस वचनदत्त देश सोडून जाण्यास सक्ती करण्यास आली, त्यास हद्दीपार करणे असे पण म्हंटले जाते.
जरी देवाने आपल्या लोकांचा त्यांच्या पापामुळे त्यांना हद्दपार करू दिली तरी देव त्याचे वचन जे त्यांच्या पूर्वजांना दिले होते. ते विसरला नाही. देवाची आपल्या लोकांवर कृपा होती व संदेष्ट्यांच्या द्वारे देव त्यांच्याशी बोलता असे. त्याने त्यांना आश्वासन दिले की, सत्तर वर्षानंतर तो त्यांना पुन्हा वचनदत्त देशात घेऊन येईल.
त्याच्यानंतर जवळपास सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश याने बाबेलच्या राज्याला हरवले. व बाबेलच्या राज्याच्या ठिकाणी पारसाचे राज्य आले. इस्राएली लोक आता यहूदी नावाने ओळखले जायला लागले. व त्यांच्यापैकी खूप लोक आपल्या आयुष्भर बाबेल्मध्येच राहिले. फक्त थोडक्या म्हाताऱ्या यहूद्याना यहूदी राजाची आठवण होती.
पारसाचे राज्य खूप मोठे होते. पण आपण हरवलेल्या लोकांविषयी ते दयाळू होते. कोरेश पारसाचा राजा झाल्यानंतर त्याने लगेच फर्मान काढले की जर कोणी यहूदी यहूदामध्ये परत जात असेल तर त्याने जावे. त्याला तशी मोकळीक आहे. त्याने त्यांना मंदिराची दुरुस्ती साठी आर्थिक मदत पण केली. अशा रीतीने सत्तर वर्षानंतर यहूदांचा छोटा लोक समुदाय यरुशलेम मध्ये आला.
यरुशलेम मध्ये आल्यानंतर मंदिराचे पुन्हा बांधकाम चालू केले. व शहराच्या वेशी पुन्हा बांधल्या. जरी आझून त्यांच्यावर अन्य लोकांचे राज्य होते. तरी आता पुन्हा एकदा वचनदत्त देशामध्ये ते राहू लागले व मंदिरामध्ये देवाची आराधना करायला लागले.
बायबल कथा: राजे 17; 24-25 ; 2 इतिहास 36; एज्रा 1 - 10; नहेम्या 1 : 13
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।