21. देव मसिहा पाठवण्याचे अभिवचन देतो
सुरुवातीलाच, देवाने मासिहाला पाठवण्याची योजना केली होती. मसीहा संबंधित सर्व अभिवचने पहिले आदाम व हव्वा यांच्याकडे आले. हव्वेला एक आपत्य होईल, ते सापाचे डोके ठेचील. ज्या सापाने हव्वेला फसवले तो सांप सैतान होता. ह्यानुसार अभिवचनांचा अर्थ असा होतो, की मसीहा सैतानाला पूर्णपणे हरवेल.
देवाने अब्राहामास असे वचन दिले. की त्याच्या द्वारे जगातील सर्व वंश आशीर्वादित होतील. पुढे एनाऱ्या दिवसात मसीहा आल्यानंतर ह्या अभिवचने पूर्ण होणार. तो प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक वंशातील लोकांचे तारण करेल.
देवाने मोशेस वाचन दिले होते की भविष्यकाळात तो मोशेसारखा संदेष्टा तयार करील. हे मासिहाविषयीचे दुसरे अभिवचन होते. जे थोड्या काळानंतर पूर्ण होणार होते.
देवाने दाविद राज्याला पण वचन दिले होते की त्याच्याच वंशातील एक व्यक्ती देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील. त्याचा अर्थ असा होतो की मसीहा हा दाविदाच्या घराण्यात जन्मास एणार होता.
यिर्मायाच्या संदेशा मध्ये पण, देवाचे वचन होते की तो एक नवा करार करणार आहे. पण तो सिनाय डोंगरावर इस्राएल लोकांशी बोला तो करार तसा नसेल. नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा माणसाच्या मनावर लिहिल, लोक देवाला स्वतःकरिता ओळखतील ते त्याचे लोक होतील व देव त्यांच्या अपराधांची त्यांना क्षमा करेल. मसीहा हा नव्या कराराची सुरुवात राहील.
देवाच्या संदेष्ट्यानी पण सांगितले होते की मसीहा एक संदेष्टा, याजक, आणि राजा असेल. संदेष्टा हा एक असा माणूस असतो की तो देवाच्या गोष्टी माणसाला सांगतो. देवाने अभिवचन दिलेला मसीहा हा एक पूर्ण संदेष्टा असेल.
इस्राएली याजक लोक लोकांच्या पापक्षमेसाठी पश्चात्ताप म्हणून देवाला होमार्पण करत होते. याजक लोकांसाठी देवाला प्रार्थना पण करत असत. मसीहा हा एक पूर्ण महायाजक असणार जो देवाला स्वतःचे पूर्ण बलिदान करणार होता.
राजा म्हणजे जो लोकांवर राज्य करतो व त्यांचा न्याय करतो. आपला पूर्वज दाविद याच्या सिंहासनावर बसणारा मसीहा एक पूर्ण राजा असणार. तो संपूर्ण जगावर सर्वकाळ राज्य करणार आणि प्रामाणिक पणे न्याय कारेल व योग्य निवाडा करेल.
देवाच्या संदेष्ट्यानी मासिहाविषयी बऱ्याच गोष्टी पहिलेच सांगून ठेवल्या होत्या. मलाखी संदेष्ट्याने भविष्य केले की मसीहा येण्याच्या पहिले एक महान संदेष्टा येईल. यशया संदेष्ट्याने पण भविष्यवाणी केली की मसीहा हा एका कुवारी मुलगीच्या पोटी जन्म घेईल. मीखा संदेष्ट्याने सांगितले की तो बेथलेहेम नगरात जन्मास येईल.
यशया संदेष्टा हेही म्हणाला की मसीहा गालीलमध्ये राहील. निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करेल. आणि बंदिवानांना सोडवील व तारणाची घोषणा करेल. त्याने हेपण सांगितले की मसीहा आजारी, आंधळ्या, मुक्क्या, बहिऱ्या लोकांना बरे करेल.
यशया संदेष्ट्याने हेपण सांगितले की मासिहाचा विनाकारण छळ केला जाईल. व त्याला नाकारले जाईल. बाकीच्या संदेष्ट्यानी पहिलेच हे सांगून ठेवले की मसीहाला मारणारे लोक त्याचे कपडे फाडून वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकतील. आणि मासिहाचा एक जवळचा माणूसच त्याचा घात करेल. जखऱ्या संदेष्ट्याने सांगितले की मासिहाचा घात करण्यासाठी त्याच्या जवळच्या माणसाला वेतन म्हणून चांदीचे तीस नाणे दिले जातील.
संदेष्ट्यानी मसीहा कसा मरेल याचेही वर्णन केले होते. यशयाने भविष्य केले की लोक मासिहावर थुकतील, त्याची थट्टा करतील व त्यांस फटके मारतील. जरी त्याने काहीही वाईट केले नाही. तरी त्याला खिळे ठोकून भयंकर वेदना दायक मरण देतील.
संदेष्ट्यानी हेपण सांगितले की मसीहा परिपूर्ण व निष्पाप असेल. तो सर्व लोकांच्या पापांसाठी पश्चात्ताप म्हणून मरेल. त्याला मिळालेली शिक्षा माणूस आणि देव यांच्यामध्ये जवळीक निर्माण करेल. ह्या कारणासाठी, मासिहास ठेचावे अशी देवाची इच्छा होती.
संदेष्ट्यानी भविष्य केले होते की मसीहा मरेल आणि देव त्याला पुन्हा जिवंत करील. मासिहाच्या मरणानंतर व त्याच्या पुन्हा जिवंत होण्याच्या द्वारे देव आपली योजना पूर्ण करील, पाप्यांचे तारण करून एक नवा करार स्थापित करेल.
देंवाने संदेष्ट्याना मसीहा विषयी भरपूर गोष्टी सांगितल्या, पण त्या संदेष्ट्यापैकी कोणाच्याही वेळी मसीहा आला नाही. शेवटच्या भविष्यवाणी नंतर जवळपास 400 वर्षांनी अगदी योग्य वेळेत देवाने मासिहाला जगात पाठविले.
बायबल कथा :उत्पत्ति 3:15; 12: 1 -3; अनुवाद 18:15; 2 शमूवेल 7; यिर्मया 31; यशया 59:16; दानिएल7; मलाखी 4 : 5; यशया 7:147; मीखा 5 : 2; यशया 9:1-7; 35 : 3-5; 61; 53; स्तोत्र 22 : 18; 35 : 19; 69 : 4; 41 : 9 जख-या 11 : 12 - 13; यशया 50 : 6; स्तोत्र 16 : 10-11
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।