22. योहानाचा जन्म
पूर्वीच्या काळात, देव आपल्या लोकांसोबत देवदूत व संदेष्ट्यांच्या द्वारे बोलत असे, पण त्यानंतर 400 वर्ष तो लोकांशी काहीच बोलला नाही. अचानक एक दिवशी जखऱ्या नावाचा एक म्हाताऱ्या याजकाकडे एक देवदूत एक संदेश घेऊन आला जखऱ्या व त्याची बायको अलीशिबा हे दोघे खूप धार्मिक होते. पण त्यांना मुलबाळ नव्हते.
देवदूत जखर्याला म्हणाला, “तुझ्या बायकोला मुलगा होणार आहे “त्याचे नाव तु योहान ठेव. तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, मासिहाच्या येण्यासाठी लोकांच्या मनाची तयारी करील. “ जखऱ्याने सांगितले मी आणि माझी बायको आता खूप म्हातारे झाले आहे आणि आता आम्हाला मुले होऊ शकत नाही. हे घडेल कशावरून मी समजू ?
देवदूत जखऱ्याला म्हणाला, “तुला ही सुवार्ता सांगण्यासाठी देवाने मला पाठवले आहे. तु या माझ्या सुवार्तेवर विश्वास ठेविला नाही, म्हणून बाळाचा जन्म होत नाही तोपर्यंत तुला काहीच बोलता येणार नाही. तो मुक्का झाला. तेव्हा देवदूत त्याला सोडून गेला. त्यानंतर जखऱ्या आपल्या घरी आला व त्याची बायको गर्भवती झाली.
जेव्हा अलीशिबा ही सहा महिन्याची गरोधर होती, तेव्हा तोच देवदूत अलीशिबाच्या नात्यातील कुवारी मरीयेसमोर प्रगत झाला. ती कुवारी होती व योसेफ नावाच्या मनसाशी तिचा वाग्दान झाला होता. देवदूत तिला म्हणाला, “ तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. तो परात्पर देवाचा पुत्र असेल व सर्वकाळ राज्य करेल”.
मारीयेने उत्तर दिले, “ हे कसे होणार, मी तर कुवारी आहे ? देवदुताने तिला स्पष्ट सांगितले. “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ तुझ्यावर सावली करील. याप्रकारे ते बाळ पवित्र, देवाचा मुलगा असेल. “ देवदुताने सांगितलेल्या वार्तेवर तिने विश्वास ठेवला.
देवदूताच्या भेटीनंतर लगेच मारीया अलीशिबाकडे तिला भेटण्यासाठी आली. मारीयेचे हे अभिवादन ऐकताच अलीशिबेच्या पोटातील बाळाने आनंदाने उडी मारली. देवाने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याविषयी दोन्ही बायांनी एकत्र आनंद केला. अलीशिबेस भेटून तीन महिन्यानंतर मारीया आपल्या घरी परत आली
अलीशिबेने आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर, देवदुताने सांगितल्याप्रमाणे जखऱ्या व अलीशिबाने त्याचे नाव योहान ठेविले. जखऱ्यास परत बोलण्याची मोकळीक मिळाली. तो म्हणाला “ देवाची स्तुती असो कारण त्याने आपल्या लोकांची आठवण केली आहे. माझ्या मुला, तु परात्पर देवाचा महान संदेष्टा होशील. जो लोकांना सांगेल की त्यांच्या पापाची क्षमा कशी होईल.
बायबल कथा :लूक 1
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।