23. येशूचा जन्म
मारीयेचे वाग्दान योसेफ नावाच्या एका चांगल्या माणसासोबत झाले होते. मारीयाने गरोधर असल्याचे ऐकून त्याला समजले नाही की,हे बाळ त्याचे नाही. तो चांगला माणूस होता म्हणून मारियाला बदनाम करण्याची त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने तिला गुपचूप सोडून देण्याचा प्रयत्न केला. तो असे करेल येच्या पहिलेच, एक देवदूत स्वप्नामध्ये त्याच्याशी बोलला.
देवदूत त्याला म्हणाला, “योसेफा, मारियाला तु आपली बायको म्हणून स्वीकार कर घाबरू नकोस. तिच्या पोटात जो गर्भ आहे तो पवित्र आहे. ते बाळ पवित्र आत्म्यापासून आहे. ती त्या मुलाला जन्म देईल. त्याचे नाव तु येशू असे ठेव म्हणजे ( देव तारणारा ) कारण तो लोकांना त्यांच्या पापापासून सोडवील.”
तेव्हा योसेफाने मारीयेशी लग्न केले व आपली बायको म्हणून तिचा स्वीकार केला. पण त्या बळाचा जन्म झाल्याशिवाय त्याने मारियाला हाथ पण लावला नाही.
जेव्हा बाळाचा जन्म होण्याची वेळ आली, तेव्हा रोमी सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले. योसेफ आणि मारिया यांना नासरेथाहून बेथलेहेम असा मोठा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा पण बेथलेहेम गावाचा होता.
बेथलेहेम याठिकाणी आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली नाही. तिथे फक्त गुरेढोरे असतात त्या गोठ्यात त्यांना जागा मिळाली. बाळाचा जन्म त्या गोठ्यातच झाला व त्याच्या आईने त्याला गव्हाणीत ठेवले. त्यांनी त्याचे नाव येशू ठेवले.
त्याठिकाणी रात्रीच्या वेळेला मेंढपाळ आपले मेंढरे रानात राखत होते. तर एकाएक एक देवदूत येऊन त्यांच्यासमोर प्रगट झाला, आणि ते खूप घाबरले. देवदूत त्यांना म्हणाला, “ घाबरू नका, कारण मी तुम्हांला मोठ्या आनंदाची वार्ता ऐकवतो पहा,आज बेथलेहेम नगरात तुमच्यासाठी मसीहा जन्माला आहे, म्हणजेच प्रभू जन्मला आहे.”
जा आणि बाळाला शोधा आणि तो तुम्हांला बाळत्यामध्ये गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले तुम्हांला दिसेल. एकाएक आकाशात देवदूत देवाची आराधना करत म्हणाले, “ वर स्वर्गात देवाला गौरव आणि जमिनीवर ज्या माणसांवर त्याची कृपा आहे त्यांना शांती असो.”
मेंढपाळ लगेच येशूला शोधत त्याठिकाणी पोहोचले जेथे येशू बाळ होता. देवदुताने सांगितल्याप्रमाणे त्यांना गव्हाणीत ठेवलेले बाळ दिसले. हे बघून त्यांना खूप आनंद झाला. मारीयास पण खूप आनंद झाला. आपण जे पहिले व ऐकले त्याविषयी ते आनंद करत सर्व मेंढपाळ आपल्या मेंढराकडे परत आले.
थोड्या दिवसानंतर, पूर्व दिशेला एक तारा ज्ञानी लोकांनी बघितला. त्यांना समजले की, हा याहुद्यांचा एक नवा राजा जन्मास आला आहे. म्हणून त्याचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रवास केला. ते बेथलेहेम याठिकाणी पोहोचले. आणि जेथे येशू व त्याचे आई वडील राहत होते ते घर त्यांनी शोधले.
जेव्हा ज्ञानी लोकांनी येशू बाळाला त्याची आई मारिया सोबत बघितले तेव्हा त्यांनी त्याला नमन केले व त्याची आराधना केली. त्यांनी येशू बाळाला मौल्यवान भेटवस्तू दिल्या व ते आपल्या घरी परत गेले.
बायबल कथा:मत्तय 1; लूक 2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।