24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 1

योहान, जखऱ्या व अलीशिबा यांचा मुलगा, मोठा होऊन तो एक संदेष्टा बनतो. तो जंगलात राहत असे व रानमध आणि टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे उंटाच्या केसापासून बनलेली होती.

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 2

योहानाचे भाषण ऐकण्यासाठी भरपूर लोक जंगलामध्ये जाऊ लागली. त्याने त्यांना संदेश दिला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 3

योहानाचा संदेश ऐकून बऱ्याच लोकानी पश्चात्ताप केला, आणि योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला.अनेक धार्मिक पुढारी पण बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे आले, पण त्यांनी आपल्या पापाविषयी पश्चात्ताप केला नाही, व आपले पाप काबुल केले नाही.

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 4

योहान त्या धार्मिक पुढाऱ्याना म्हणाला, “ तुम्ही सापाच्या पिलानो पश्चात्ताप करा आणि तुमची बदला. प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही, ते तोडले जाईल व अग्नीमध्ये टाकण्यात येईल. योहानाने संदेष्ट्याच्या या वचनाला पूर्ण केले, “ पाहा मी आपला दूत तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी रस्ता तयार करील,”

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 5

काही यहूदी लोकांनी योहानाला विचारले की तूच मसीहा आहे का ? योहान म्हणाला, “मी मसीहा नाही, पण माझ्या मागून एक जन येत आहे. तो खूप महान आहे. त्याच्या चपलेचा बंद सोडण्याच्या लायकीचा देखील मी नाही”

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 6

दुसऱ्या दिवशी येशू योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. व योहान त्याला बघून म्हंटला, “पहा हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा,”

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 7

योहान येशूला म्हणाला, “ मी तुला बाप्तिस्मा देईल एव्हडी माझी लायकी नाही. मलाच तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे. पण येशू त्याला म्हणाला,” तु मला बाप्तिस्मा दे, कारण हे देवाच्या इच्छेने केलेले योग्य आहे. त्यावेळेस योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला, तरीपण येशू तर निष्पाप होता. त्याने काहीच पाप केले नव्हते.

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 8

जेव्हा येशू बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वर आला, तेव्हा आकाशातून देवाचा आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला व थांबला. त्याचवेळी आकाशवाणी झाली,” तु माझा आवडता मुलगा आहेस, तुझ्यावर मी खूप खुश आहे,”

24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो — चित्र 9

देवाने योहानाला सांगितले होते की, “ तु बाप्तिस्मा दिल्यानंतर ज्या माणसावर पवित्र आत्मा उतरेल. तोच माणूस देवाचा मुलगा असेल. “ एकाच देव आहे. पण जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला, तेव्हा त्याने देवाला बोलताना पहिले, देवाचा मुलगा येशूला बघितले, आणि पवित्र आत्म्याला पण बघितले.

बायबल कथा:मत्तय 3; मार्क 1:9 - 11; लूक 3: 1 - 23

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।