25. येशूची सैतानाकडून परिक्षा

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 1

बाप्तिस्मा झाल्यानतर पवित्र आत्म्याने येशूला लगेच जंगलात नेले, त्या ठिकाणी येशू चाळीस दिवस व चाळीस रात्र उपास करत होता. तेव्हा सैतान तेथे येऊन येशूची परीक्षा बघायला लागला.

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 2

सैतानाने येशूला लालूच दाखवली, “जर तु खरोखर देवाचा पुत्र आहे, तर ह्या दगडाला भाकर होण्याची आज्ञा कर म्हणजे तुला खायला अन्न मिळेल.”

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 3

येशूने उत्तर दिले की, “ देवाच्या वचनात असे लिहिले आहे, “लोकांना जिवंत राहण्यासाठी फक्त भाकरीची गरज नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाची गरज आहे.”

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 4

मग सैतान येशूला घेऊन मंदिराच्या मध्य भागी उभे राहिले. आणि त्यांनी त्याला म्हंटले, “तु देवाचा मुलगा आहेस तर खाली उडी मार, कारण असे लिहिले आहे की, “ देव आपल्या देवदुताला तुझ्याविषयी आज्ञा करेल, आणि ते तुझा दगडावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून घेतील.”

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 5

पण येशूने सैतानाला नियमशास्रातूनच उत्तर दिल. की,”देव आपल्या वचनातून आपल्या लोकांना आज्ञा देतो, तु आपला देव याची परीक्षा बघु नको.”

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 6

मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व मोठे वैभव दाखवले आणि म्हणाला, “जर तु माझ्या पाया पडून मला नमन करशील तर हे सर्व मी तुला देईल.”

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 7

येशूने त्याला म्हंटले, “अरे सैताना, निघून जा देव आपल्या वचनामध्ये लोकांना सांगतो की, तुझा देव ( यहोवा ) ह्याला नमन कर व केवळ त्याचीच आराधना कर.”

25. येशूची सैतानाकडून परिक्षा — चित्र 8

अशा प्रकारे येशू सैतानाच्या लालुचच्या माघे लागला नाही. त्यामुळे सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला. मग देवदुतानी येवून येशूची सेवा केली.

बायबल कथा:मत्तय 4:1 - 11; मार्क 1 : 12 -13 1; लूक 4 : 1-13

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।