26. येशू आपल्या सेवेचा आरंभ करतो
सैतानाच्या परीक्षेवर जय मिळवल्या नंतर येशू पवित्र आत्म्याने भरून आपण राहत होतो त्या गलील या ठिकाणी परत आला. येशू देवाच्या राज्याचे शिक्षण देत भरपूर ठिकाणी फिरला. प्रत्येक माणूस त्याच्याविषयी चांगले बोलत असे.
येशू त्याच्या लहानपणी राहत होता त्या नासरेथ या ठिकाणी आला. शब्बाथ दिवशी तो आराधना करण्यासाठी मंदिरात गेला. त्यांनी त्याला यशया संदेष्ट्याचा लेख वाचायला दिला. येशूने त्या लेखातील काही भाग लोकांसमोर वाचला.
येशूने वाचले,” देवाने त्याचा आत्मा मला दिला दिला आहे. ते यासाठी की गरिबाला सुवार्ता संगावी. धरून देण्याऱ्याची सुटका व आंधळ्यांना परत दिसावे व जे मरत आहे त्यांना सोडवावे ह्याची घोषणा करावी. देवाच्या दयेच्या दिवसांची घोषणा करावी.
त्यानंतर येशू खाली बसला. प्रत्येक माणसांनी त्याला चांगले बघितले. त्यांना समजले होते की येशूने वाचलेला शास्र भाग ख्रिस्त येशू विषयी होता. येशू म्हणाला, “ हा शास्र लेख आज पूर्ण झाला.” त्यावेळेस सर्व लोक नवल करू लागले. हा योसेफाचा मुलगा ना ? ते असे बोलू लागले.
मग येशू बोलला, “ कोणत्याही संदेष्ट्याला आपल्या गावात मानसन्मान मिळत नाही. संदेष्ट्याच्या काळात इस्राएल मध्ये अनेक विधवा होत्या. पण जेव्हा साडे तीन वर्षे दुष्काळ होता तेव्हा देवाने इस्राएलमधिल विधवांना मदत करण्यासाठी एलीयास पाठविले नाही. तर परदेशी विधवेस मदत करण्यासाठी पाठविले.
येशू परत म्हणाला, “ आणि आलीशा संदेष्ट्याच्या दिवसांमध्ये इस्राएलात बरेच रोगी होते. अलीशाने त्यापैंक कोनालाही बरे केले नाही. त्याने ओळखत नसलेल्या नामान रोग्याला बरे केले. तो इस्राएलाच्या शत्रुंचा सेनापती होता. येशू बोलत असलेले सर्व लोक ऐकत होते. लोक यहुदी होते. म्हणून त्यांनी हे ऐकले त्यांना त्याचा खूप राग आला.
नासारेथकरांनी येशूला पकडून नेऊन डोंगरावरून ढकलून मारण्यासाठी नेले पण येशूने सर्व गरदीतून रस्ता काढला. व नासारेथ गाव सोडले.
मग येशू गालील मधून पुढे चालत गेला. व पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्याकडे येऊन अनेक आजारी, अपंग. आंधळे. पांगले, बहिरे, व बऱ्याच रोग्यांना घेऊन आले. आणि येशूने त्यांना बरे केले.
भूते लागलेली लोक येशूकडे आणले गेले. येशूच्या आज्ञेने. ते भूते त्या माणसातून निघाली व ओरडून असे म्हणत होते की,” तु देवाचा मुलगा आहेस “ मोठ्या गर्दिने नवल करत देवाची आराधना केली.
तेव्हा येशूने बारा शिष्यांची नेमणूक केली. त्यांना येशूचे प्रेषित म्हणायला लागले. ते शिष्य येशूबरोबर राहत होते आणि त्याच्यापासून शिकत होते.
बायबल कथा:मत्तय 4 : 12 - 25; मार्क 1 : 14 - 15; 35 - 39; 3 : 13-21; लूक 4 : 14 - 30; 38 - 44
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।