27. चांगल्या शोमरोन्याची गोष्ट
एक दिवशी, शास्राचा पंडित व्यक्ती येशूची परीक्षा बघण्यासाठी त्याच्याकडे येऊन म्हणाला, “गुरुजी सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे ? येशूने उत्तर दिले, “ देवाच्या शास्रात काय सांगितले आहे ?
त्याने म्हंटले, “तु आपला देव याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि जशी स्वतः वर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर “ येशूने म्हंटले “ आगदी बरोबर सांगितले हेच कर म्हणजे वाचशील”.
पण शास्र पंडित स्वतःला चांगला ठरवण्यास बघत होता. म्हणून त्याने विचारले. “माझा सेजारी कोण ?
येशूने त्याला एक गोष्ट सांगितली त्या शास्र पंडितला विचारले, “एक यहूदी माणूस यरूशलेमहून यरीहो गावाच्या रस्त्याने जात होता”.
“तो माणूस रस्त्याने जात असताना,लुटारूंनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याच्याकडे असलेली सर्व मालमत्ता घेऊन त्याला मारहाण केली व मेलेला समजून सोडून गेले.
“त्यानंतर लगेच, एक यहूदी याजक त्याच रस्त्याने जात होता. जेव्हा त्या याजकाने पहिले की याला लुटारूंनी लुटले आहे व मरण्यासाठी टाकून दिले आहे. तेव्हा तो याजक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. त्याने त्याची मदत न करता तेथून निघून गेला.
“त्यानंतर लगेच दुसऱ्या वेळेस एक लेवी व्यकी त्याचा रस्त्याने आला ( लेवी हे यहूदी लोकामधील एक कुळातील लोक होते जे मंदिराच्या सेवेमध्ये याजकाची मदत करता ) त्या लेवीने पण त्या माणसाकडे बघितले ज्याला लुटारूंनी लुटले होते. त्याने पण लक्ष न देता दुसऱ्या रस्त्याने निघून गेला.”
“त्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या माणसांनी जो एक शोमरोनी होता. ( शोमरोनी हे यहूदी वंशातील परदेशीयांशी लोकांशी लग्न केलेले लोक ) शोमरोनी व यहूदी हे एकमेकांचा राग करत असे. पण ह्या शमरोनी माणसांनी यहूदी माणसाकडे बघितले, तेव्हा त्याची त्याला दया आली. मग त्याने त्याची काळजी केली व त्याच्या जखमावर मलम पट्टी केली.
“मग त्या शोमरोनी माणसाने त्या माणसाला उचलून आपल्या गाढवावर बसवले व त्याने त्याला रस्त्यात असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणले व त्याची काळजी घेतली.
“दुसऱ्या दिवशी, शोमरोनी माणसाला पुढे प्रवास करायचा होता. त्यामुळे त्याने उतार शाळेच्या माणसाला काही पैसे देऊन म्हंटले. “याची काळजी घे, आणि यापेक्षा जे काही अझून लागेल तो सर्व खर्च मी परत आल्यावर देईल
तेव्हा येशूने त्या शास्र पंडितला विचारले, “ तुला काय वाटते ? त्या तिघापैकी कोण त्या लुटलेल्या व जखमी माणसाचा शेजारी ठरला ? त्याने येशूला उत्तर दिले, “ज्याने त्याच्यावर दया दाखवली तो “ येशूने त्याला सांगितले तुही जाऊन तसेच कर.”
बायबल कथा :लूक 10 : 25 - 37
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।