28. एक श्रीमंत तरुण अधिकारी

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 1

एक दिवशी, एक श्रीमंत तरुन अधिकारी येशूकडे येऊन विचारू लागला, “हे उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय केले पाहिजे ? येशूने त्याला म्हंटले, “ तु मला उत्तम का म्हणतोस ? एक देव याशिवाय कोणीच उत्तम नाही. पण तुला सार्वकालिक जीवन पाहिजे हे तर, देवाच्या आज्ञा पाळ.

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 2

“कोणत्या आज्ञा मी पाळाव्या ? येशूने त्याला सांगितले “खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोट बोलू नको, आपल्या आई बापाचा मान ठेव, आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. “

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 3

पण त्या तरुणाने येशूला म्हंटले, “ह्या सर्व आज्ञा मी लहानपनापासुन पाळत आहे. सर्वकाळच्या जीवनासाठी मी काय करू ? येशूने त्याच्याकडे बघितले व त्याच्यावर प्रीती केली.

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 4

येशूने उत्तर दिले, “ जर तुला पूर्ण होण्याची इच्छा आहे तर जा, आणि तुझी सर्व संपत्ती विकून आलेला पैसा गरिबांना दे म्हणजे तुला स्वर्गा मधून संपत्ती मिळेन. मग चल माझ्या माघे ये.

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 5

येशूने जे सांगितले ते ऐकून तो तरुण खूप निराश झाला, कारण तो खूप श्रीमंत होता. व आपल्या जवळ असलेली संपत्ती दुसऱ्या लोकांना देण्याची त्याची इच्छा नवती. म्हणून तो येशू पासून निघून गेला.

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 6

मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, श्रीमंत माणसांचे स्वर्गात जाने खूप कठीण आहे. हो, श्रीमंताचा स्वर्गात प्रवेश होणार याच्यावून, उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे,

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 7

जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना नवल वाटले व त्यांना धक्का बसला म्हणून ते म्हणाले, “ तर मग कोणाचे स्वर्ग राज्यात जाणे शक्य आहे ?

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 8

येशूने शिष्याकडे बघून म्हंटले की, “माणसाला हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे “

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 9

पेत्र येशूला म्हणाला, “आम्ही सर्व सोडून तुझ्या माघे आलो आहे. याचे आम्हाला काय प्रतिफळ मिळणार ?

28. एक श्रीमंत तरुण अधिकारी — चित्र 10

येशूने उत्तर दिले, “ज्यांनी माझ्यासाठी घर, भाऊ, बहिण, आई, बाप, मुल, किवा संपत्ती सोडली तर त्यांना ते 100 पट ज्यास्त मिळणार व त्याबरोबर सार्वकालिक जीवन पण वतन म्हणून मिळेल. “ पण पहिले ते शेवटी व शेवटचे ते पहिले असे होईल.

बायबल कथा:मत्तय 19:16 - 30; मार्क 10: 17 - 31; लूक 18:18 - 30

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।