29. कृतघ्न चाकराची गोष्ट

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 1

एक दिवशी, पेत्राने येशूला विचारले, “प्रभू, जेव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करेल तेव्हा मी त्याला किती वेळा क्षमा करावी ? सात वेळा काय ? येशूने म्हंटले, “ सात वेळा नाही तर साताच्या सत्तर वेळा “ यावरून येशूला असे म्हणायचे होते की, नेहेमी आपण क्षमा करावी. तेव्हा येशूने ही गोष्ट त्यांना सांगितली.

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 2

येशू म्हणाला, “देवाचे राज्य कोण्या राजा सारखे आहे. त्याला आपल्या सेवकाकडून हिशोब घ्यावा असे वाटले. त्याच्या एका सेवकाकडे 200,000 वर्ष इतके फार मोठे कर्ज होते.

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 3

“हा चाकर कर्ज फेडू शकत नसल्यामुळे राजाने म्हंटले की, ह्या माणसास व त्याच्या कुटुंबास सेवक म्हणून विकून त्याच्या कर्जाची फेड करू घ्यावी “

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 4

“तो सेवक राजासमोर त्याच्या पाया पडून म्हणू लागला की, माझ्यावर दया करा व मला काही वेळ द्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडून टाकीन” राजाला त्या सेवकाची दया आली व त्याने त्याचे सर्व कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले.

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 5

“पण हा सेवक बाहेर गेला असताना त्याला त्याच्या सोबतच एक सेवक भेटला ज्याच्याकडून त्याचे सुमारे चार महिन्याच्या वेतन इतके कर्ज देणे होते. त्या सेवकाने आपल्या सोबतीच्या सेवकाला पकडले व म्हणाला, मला आताच्या आता माझे पैसे मला दे.”

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 6

“त्याच्या सोबतीचा सेवक गुढगे टेकून म्हणाला, “मला थोडा वेळ द्या व माझ्यावर दया करा, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडीन” पण त्याएवजी, त्याने आपल्या सोबतीच्या सेवकाला सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगात टाकले.

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 7

तेव्हा त्याच्या सोबतच्या दासाला फार दुखः झाले त्याने घडलेले सर्व आपल्या मालकाला सांगितले. त्यांनी राजाकडे जाऊन सर्वकाही सांगितले.

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 8

राजाने त्या चाकराला बोलावून घेतले व म्हंटले, अरे दुष्ट माणसा, तु माझ्याकडे येऊन माझे हाथ पाय पडला त्यामुळे मी तुझे सर्व कर्ज माफ केले. असे तुही आपल्या सोबतच्या सेवाकाशी वागला असताना, राजाला त्याचा खूप राग आला व त्याने त्याचे सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले.

29. कृतघ्न चाकराची गोष्ट — चित्र 9

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “ जर तुम्ही प्रत्येक जन आपापल्या भवाला मनापासून क्षमा करत नाही तर माझा स्वर्गातील पिता पण त्याप्रमाणे तुम्हांला क्षमा करणार नाही.”

बायबल कथा :मत्तय 18 : 21 - 35

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।