1. सृष्टी
अशा प्रकारे जगाच्या सुरवात मध्ये देवाने सगळ्या वस्तूची निर्मिती केली. देवाने सहा दिवसात जगाची अन् जे काई त्या मध्ये हाय, त्या सगळ्याची निर्मिती केली. देवाच्या व्दारे पृथ्वीची निर्मिती केल्या नंतर, ती अंधारमय अन् पूर्ण पणे खाली होती, कावून कि आतापरेंत देवानं पृथ्वीवर कोणतीच वस्तु बनवली नाई होती. पण देवाचा आत्मा तेथे पाण्यावर होता.
मंग देवाने म्हतलं, “ऊजीळ हो”! तवा ऊजीळ झाला. देवाने पायलं कि ऊजीळ चांगला हाय, तवा त्याने त्याले “दिवस” म्हतलं. देवाने त्याले अंधारापासून अलग केले अन् अंधाराले “रात्र म्हतलं.” देवाने जगाची सृष्टी करण्याच्या पयल्या दिवशी ऊजीळ बनवला.
सृष्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाने म्हतलं, “पाण्याच्या वरती एक अंतर होऊन जावो” अन् एक अंतर बनला. देवाने त्या अंतराले “अभाय म्हतलं.
तिसऱ्या दिवशी देवाने म्हतलं, “पाणी एका ठिकाणी जमा होऊन जावे, अन् कोरडी जमीन दिसावे.” त्याने कोरड्या जमीनीले “पृथ्वी” म्हतलं, अन् पाण्याले “समुद्र” म्हतलं. देवाने पायलं कि जे काई त्याने बनवले ते चांगले हाय.
मंग देवाने म्हतलं, “पृथ्वीवर सगळ्या प्रकारचे झाडे अन् रोपटे उगावे” अन् तसेच झाले. देवाने पायलं कि जे काई त्याने बनवले हाय, ते सगळं चांगल हाय.
सृष्टी बनवाच्या चौथ्या दिवशी देवाने म्हतलं, “अभायात ज्योती बनावे,” अन् सूर्य, चंद्र, अन् तारे बनले. देवाने त्यायले पृथ्वीवर ऊजीळ देण्यासाठी, अन् दिवस, रात्र, ऋतू अन् वर्षामधला भेद दर्शवण्यासाठी बनवले. देवाने पायलं कि जे काई त्याने बनवले ते सगळं चांगल हाय.
पाचव्या दिवशी देवाने म्हतलं, “जिवंत प्राणी पाण्याले भरून टाकावे अन् आकाशात पक्षी उडावे.” अशा प्रकारे देवाने पाण्यातले जीव जंतू व अभायातले पक्षी बनवले. देवाने पायलं कि हे सगळं चांगल हाय, तवा त्याने त्यायले आशीर्वाद देला.
सृष्टीच्या सहाव्या दिवशी देवाने म्हतलं, “पृथ्वीवर रायणारे सगळ्या प्रकारचे जनावर हो” अन् देव जसा बोलला तसेच झाले. काई जनावर पाळीव, काई जमीनीवर रेंगणारे अन् काई जंगली जनावर निर्माण झाले. अन् देवाने पायलं कि हे सगळं चांगल हाय.
मंग देवाने म्हतलं, “या आपण माणसाले आपल्या प्रतिरूपात अन् आपल्या समानते मध्ये बनवू, ते पृथ्वीवरच्या सगळ्या प्रकारच्या जनावरावर सत्ता करतीन.”
शेवटी देवाने माती पासून माणसाले बनवले, अन् त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला. या माणसाचे नाव आदम ठेवले. देवाने आदमले रायण्यासाठी एक मोठा बगीचा बनवला अन् त्या बगीच्याची देखरेख करण्यासाठी आदमाले तती ठेवले.
बगीच्याच्या मधात देवाने दोन खास झाडे लावले, एक जीवनाचे झाड अन् दुसरे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. देवाने आदामाले आज्ञा देली, कि त्या बगीच्या मधल्या बऱ्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाचे फळ खाऊ शकतो, अन् जर तू या झाडाचे फळ खासीन तर निश्चित मरून जासीन.
मंग देवाने म्हतलं, “माणूस एकटा रायने चांगले नाई हाय,” पण कोणत्याहि जनावरा मधून आदमासाठी जोडीदार मिळाला नाई.
मंग देवाने आदमले गाढ झोपेत टाकले, मंग देवाने आदमची एक पासोई काढून त्याव्दारे एका बाईले तयार केले, अन् तिले आदमापासी आणले.
जवा आदमाने तिले पायलं, तवा त्याने म्हतलं, “हे तर माह्यासारखीचं हाय! तिले बाई म्हतल्या जाईन, कावून कि ते माणसापासून बनवल्या गेली हाय.” म्हणूनच माणूस आपल्या माय-बापाले सोडून, आपल्या बायको सोबत जुडून रायते.
देवाने माणूस अन् बाईले आपल्या सारखे दिसणारे बनवले. देवाने त्यायले आशीर्वाद देला, अन् त्यायले म्हतलं, “खूप सारे पोरं पोरी व नातू पुतु उत्पन्न करा अन् पृथ्वीले पूर्ण पणे भरून टाका!” देवाने पायलं कि जे काई त्याने बनवले ते सगळं खूप चांगल हाय, अन् देव त्या सगळ्यायच्या बार्यात खूप आनंदित होता. हे सगळं सृष्टीच्या सहाव्या दिवशी झाले.
सातव्या दिवशी निर्मितीचे काम पूर्ण झाले होते. मंग आपल्या कामापासून त्या दिवशी देवाने आराम केला. देवाने सातव्या दिवसाले आशीर्वादित करून पवित्र ठरवले कारण त्या दिवशी त्याने आपल्या कामापासून आराम घेतला. अशा प्रकारे देवाने जग अन् त्याच्यात सगळ काई निर्माण केलं.
बायबल कथाः उत्पत्ति 1 -2
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।