2. जगात पाप येणे

2. जगात पाप येणे — चित्र 1

आदम अन् त्याची बायको देवाच्या व्दारे बनवलेल्या सुंदर बगीच्या मध्ये खूप आनंदाने रायत होते. ते दोघ पण कपडे घालत नव्हते, पूर्ण पणे भोगये होते. तरी पण त्यायले या बाऱ्यात काई पण लाज वाटत नव्हती, कावून कि त्या वेळी जगात पाप नाई होता. ते दोघ पण बगीच्या मध्ये देवाच्या बरोबर फिरत असायचे अन् देवाच्या सोबत बोलत पण असायचे.

2. जगात पाप येणे — चित्र 2

पण त्या बगीच्या मध्ये एक सर्प होता, तो खूप धूर्त होता. त्याने त्या बाईले विचारले, “काय देवाने खरोखर तुमाले या बगीच्या मधले कोणत्याहि झाडाचे फळ खायाले मना केले हाय?”

2. जगात पाप येणे — चित्र 3

बाईने उत्तर देले, “देवाने आमाले सांगतल हाय कि त्या बऱ्या अन् वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाच्या फळाले सोडून कोणत्या पण झाडाचे फळ आमी खाऊ शकतो. अन् देवाने आमाले म्हतलं हाय, कि जर तुमी हे फळ खासान किंवा त्याले स्पर्श पण करसान, तर तुमी मरून जासान.”

2. जगात पाप येणे — चित्र 4

सर्पाने बाईले म्हतलं, “हे खोटं हाय! तुमी मरणार नाई. देवाले मालूम हाय, कि हे “फळ” खाल्ल्यावर, तुमी देवा सारखे होऊन जासान, अन् तुमाले त्याच्या सारखेच बऱ्या वाईटाचे ज्ञान होईन.”

2. जगात पाप येणे — चित्र 5

तवा बाईने पायले कि ते फळ खायाले चांगले अन् चविष्ट दिसत हाय, अन् तिले समजदार पण बनायचं होतं, म्हणून तिने फळ तोडला अन् खाल्ला, अन् मंग तिने आपल्या नवऱ्याले पण जो तिच्या सोबत होता, ते फळ खायाले देला. तवा त्याने पण खाल्ला

2. जगात पाप येणे — चित्र 6

अचानकचं त्यायचे डोये उघडले, अन् त्यायले मालूम झाले कि ते भोंगये हायत. मंग त्यायनं झाडाच्या पाणायले शिवून आपल्या शरीराले झाकण्यासाठी कपडे तयार केले, अन् आपल्या शरीराले झाकण्याचा प्रयत्न केला.

2. जगात पाप येणे — चित्र 7

तवा आदम अन् त्याच्या बायकोने, बगीच्या मध्ये फिरत असताना देवाचा आवाज आयकला. ते दोघ पण देवाचा आवाज आयकून झाडायच्या मागे लपले. तवा देवाने आदामाले हाक मारून विचारले, “तू कुठं हायस?” आदामाने उत्तर देले, “बगीच्या मध्ये चालण्याचा तुह्या आवाज आयकला, अन् मी भेलो, कावून कि मी भोंगया हाय, म्हणून मी लपलो.”

2. जगात पाप येणे — चित्र 8

मंग देवाने विचारले, ”तुले हे कोण सांगतल कि तू भोंगया हायस?“ काय तू ते फळ खाल्ले हायस, जे मी खायाले मना केले होते? आदमाने उत्तर देले, “तु मले जे बाई देली होती, तिनेच मले हे फळ देले हाय. मंग देवाने बाईले विचारले, “तू हे काय केले?” तवा ती बाई बोलली, “सर्पाने मले फसवले हाय.”

2. जगात पाप येणे — चित्र 9

देवाने सर्पाले म्हतलं, “तू शापीत झाला हायस! तू आपल्या पोटाने चालशीन अन् माती चाटसीन. तू अन् या बाई मध्ये वैर निर्माण होईन, अन् तुह्या संतती अन् तिच्या संतती मध्ये पण वैर निर्माण होईन. या बाईची संतान तुह्या डोक्शाले आपल्या पायाखाली ठेसीन, अन् तू त्याच्या टाकीले डसणार.”

2. जगात पाप येणे — चित्र 10

तवा देवाने बाईले म्हतलं, “मी असं करीन, कि तू मोठ्या कष्टाने लेकरायले जन्म देशीन. तरी पण तुह्याली ओढ तुह्या नवऱ्याकडे राईन, अन् तो तुह्यावर स्वामित्व करीन.”

2. जगात पाप येणे — चित्र 11

देवाने आदामाले म्हतलं, “तू आपल्या बायकोचे आयकले हाय, अन् माह्याली आज्ञा मोडली हाय, म्हणून जमीन श्रापित झाली हाय, आता तुले कष्ट करूनचं अन्न भेटणार, तू मरसीन अन् तुह्याले शरीर मातीत मिसळणार.” आदामाने आपल्या बायकोचे नाव हवा ठेवले, ज्याचा अर्थ हाय, “जन्म देणारी” कावून कि तीच्या पासून सगळे लोकं जन्माले आले. मंग देवाने आदम अन् हवाले जनावराच्या चामड्या पासून बनवलेले कपडे घालून देले.

2. जगात पाप येणे — चित्र 12

मंग देवाने म्हतलं, “आता मनुष्यप्राणी आपल्या सारखाच झाला हाय. त्याले पण बऱ्या अन् वाईटाचे ज्ञान झाले हाय, म्हणून त्यायले त्या जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ देऊ नये, कि ते नेहमी साठी जिवंत राहावे.” म्हणून देवाने आदम अन् हवाले बगीच्या मधून बायर काढले, अन् कोणी पण त्या जीवनाच्या झाडाचे फळ नाई खाल्ले पायजे, म्हणून देवाने बगीच्याच्या प्रवेश दारावर सामर्थशाली देवदूतायचा पहारा लावला.

बायबल कथाःउत्पत्ति 3

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।