3. महापूर (जल प्रलय)

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 1

खूप वर्षानंतर पृथ्वीवर खूप लोकसंख्या वाढली होती, लोकं खूप दृष्ट अन् हिंसाचारी झाले होते. एवढ खराब झाले होते, कि देवाने निश्चय केला कि संपूर्ण जगाले जलप्रलयाने नाश करावे.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 2

पण देव नुहावर प्रसन्न होता, तो दृष्ट माणसायमध्ये रायणारा एक धर्मी माणूस होता. देवाने नुहाले सांगतले होते, कि मी एक मोठा जलप्रलय करणार हाय, म्हणून देवाने नुहाले एक मोठे जहाज बनवायले सांगतले.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 3

देवाने नुहाले 140 मीटर लंबे अन् 23 मीटर रुंद अन् 13.5 मीटर उंचीचे जहाज बनवायले सांगतले. ते जहाज तीन मंजिल वाले अन् खूप साऱ्या खोल्या, छत, अन् खिडकी बनवायले सांगतले. त्या जहाजामध्ये नुहा अन् त्याच्यावाले कुटुंब अन् पृथ्वीवरच्या हरेक जातीचे जनावर सुरक्षित रायणार होते.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 4

नुहाने देवाची आज्ञा मानली, त्यानं अन् त्याच्यावाल्या पोरायनं तसेच जहाज बनवले जसे देवाने त्यायले सांगतले होते. हे जहाज बनण्यासाठी खूप सारे वर्षे लागली, कावून कि ते जहाज खूप मोठे होते. नुहाने लोकायले जलप्रलयाबद्दल सांगतले होते अन् देवाकडे येण्यास सांगतले, पण लोकायन त्याच्यावर विश्वास केला नाई.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 5

देवाने नुह अन् त्याच्या कुटुंबासाठी व जनावरायसाठी खूप अन्नधान्य जमा करण्यासाठी सांगतले होते. जवा जहाज तयार झाले तवा देवाने नुहाले अन् त्याच्या बायकोले त्याचे पोरं व त्याच्या सुना त्या सगळ्यायले जहाजात जायाले सांगतले. ते सगळे मिळून आठ जण होते.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 6

देवाने हरेक जनावरापैकी अन् पक्ष्यायपैकी नर अन् मादी नुहा पासी पाठवले, कि जहाजात जावे व जलप्रलयापासून सुरक्षित राहावे. देवाने हरेक जातीच्या जनावरापैकी सात नर अन् मादी पण पाठवल्या ज्यायचा उपयोग बलिदान करण्यासाठी होणार होता. जवा त्या सगळ्यायन जहाजात प्रवेश केला, तवा देवाने जहाजाचा दरवाजा स्वता बंद केला.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 7

मंग पाऊस सुरु झाला, अन् हा पाऊस चाळीस दिवस अन् चाळीस रात्र लगातार सुरु रायला, पृथ्वीवर हरेक ठिकाणी पाणी साचले अन् सगळे पहाड पण पाण्याने डुबून गेले.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 8

जहाजात नुह अन् त्याचे संपूर्ण कुटुंब अन् जनावरे हे सोडून बाकीचे जे जमिनीवर रायले होते ते सगळे जलप्रलयाने मरून गेले. जहाज पाण्यावर तरंगत रायला, अन् जे जहाजात होते ते सगळे डूबण्यापासून सुरक्षित रायले.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 9

पाऊस थांबल्यावर जहाज पाच महिन्या पर्यंत पाण्यावर तरंगत रायले, अन् त्यानंतर पाणी कम होतं गेले, तवा एक दिवस ते जहाज एका पहाडावर ठेकले पण सगळ्या जगात अजून पण पाणीचं पाणी होते, अन् तीन महिन्यानंतर पहाडायचे माथे दिसू लागले.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 10

मंग चाळीस दिवसांनतर नुहाने एका कावळ्याले हे पायाले पाठवले, कि पाणी सुकले कि नाई. तो कावळा कोरडी जमीन मिळावी म्हणून इकडे तिकडे फिरत रायला, पण त्याले कोरडी जमीन मिळाली नाई.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 11

मंग नुहाने एका कबुतराले बायर पाठवले, पण त्याले हि कोरडी जमीन नाई मिळाल्याने ते पण नुहापासी वापस आले. एका हप्त्याने नुहाने परत कबुतराले बायर पाठवले, तवा ते आपल्या चोचीत जैतुनाची फांदी घेऊन वापस आले. पाणी घटत होते, अन् झाडे झुडपे वाढू लागले होते.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 12

नुहाने आणखी एका हप्त्या वाट पाहून परत त्या कबुतराले बायर पाठवले, यावेळी त्या कबुतराले थांबण्यासाठी ठिकाण मिळाले अन् ते परत वापस नाई आले, कावून कि पाणी सुकत चालले होते.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 13

दोन महिन्यानंतर देवाने नुहाले म्हतलं, तू अन् तुह्यावाले कुटुंब अन् सगळे जनावर आता जहाजाच्या बायर निघून या, तुमाले पोरं पोरी अन् नातू पुतु होवोत अन् सगळी पृथ्वी भरून टाका, मग नुह अन् त्याच्यावाले कुटुंब जहाजाच्या बायर आले.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 14

नूह जहाजातून बायर आल्यावर, त्याने एक वेदी बांधली, अन् बलिदानासाठी वापरल्या जाण्याऱ्या जनावरापैकी हरेक प्रकारातून काई जनावराचे देवाले बलिदान चढवले. देव नुहाच्या बलिदानाने खुश झाला अन् नुहाले अन् त्याच्या कुटुंबांले देवाने आशीर्वाद देला.

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 15

देवाने म्हतलं, “मी आता वचन देतो, आता पुढे माणसायच्या दृष्टकामामुळे पृथ्वीले कधीही श्राप देणार नाई, अन् पाण्याने जगाचा कधीही नाश करणार नाई, कावून कि सगळे लोकं लहानपणापासून पापी हायत.”

3. महापूर (जल प्रलय) — चित्र 16

मंग देवाने आपली प्रतिज्ञा म्हणून पयल्यांदा अभायात मेघधनुष्य बनवला, अन् नुहाच्या बरोबर करार केला, कि जवा जवा अभायात मेघधनुष्य दिसणार, तवा तवा माणसाबरोबर केलेल्या या कराराची आठवण होईन, अन् त्याच्या सगळ्या लोकायले पण आठवण होईन.

बायबल कथा : उत्पत्ति 6-8

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।