4. देवाचा अब्रामा संग करार
महापुर आल्यानंतर कईक वर्षांनंतर, जगात परत लोकं वाढले, अन् त्यायनं परत देवाच्या अन् एकादुसऱ्याच्या विरुद्ध पाप केले. कावून कि ते सगळे एकच भाषा बोलत होते, म्हणून ते एकत्र आले, अन् देवाची जे आज्ञा होती कि संपूर्ण जगात पसरून जा, हि आज्ञा सोडून त्यायनं एक शहर निर्माण केलं.
ते खूप घमंडी होते अन् त्यायले कसे जीवन जगाले पायजे या बाऱ्यात ते देवाच्या आज्ञेले मानत नाई होते. अतपरेंत कि त्यायनं एक अशी उंच ईमारत बांधाले सुरवात केली जे स्वर्गा परेंत पोहोचणार. तवा देवाने पायले कि जर ते एकत्र येऊन बेकार काम करत रायतीन, तर ते आणखी खूप सारे पापाचे काम करू शकतात.
म्हणून देवाने त्यायच्या भाषेमध्ये गडबड निर्माण केली अन् त्यायच्या खूप साऱ्या भाषा निर्माण केल्या अन् अशा प्रकारे त्यायले सगळ्या जगात पसरवले. जे शहर त्यायनं बनवायले सुरवात केले होते, ते बाबेल म्हतल्या जाते, ज्याचा अर्थ हाय, “गडबड.”
खूप साऱ्या वर्षानंतर, देवाने अब्राम नावाच्या माणसाबरोबर गोष्ट केली. देवाने त्याले म्हतलं, “तू आपला देश अन् आपले नातेवाईकायले सोडून अशा ठिकाणी जाय, जे मी तुले दाखवीन. मी तुले आशीर्वाद देईन, अन् तुह्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुह्याले नाव मोठे करीन. जे लोकं तुले आशीर्वाद देतीन, त्यायले मी आशीर्वाद देईन, अन् जे लोकं तुले श्राप देतीन, त्यायले मी श्राप देईन. तुह्यापासून जगातल्या सगळ्या कुळातले लोकं आशीर्वादीत होतीन.”
शेवटी अब्रामाने देवाच्या आज्ञेचे पालन केले. त्याने आपली बायको साराले अन् आपल्या सगळ्या नोकरचाकरासहीत, आपली सगळी मालमत्ता घेऊन, देवाने त्याले दाखवलेल्या कनान देशात जायाले निघाला.
जवा अब्राम कनान देशात आला, तवा देवाने अब्रामाले म्हतलं, “तू तुह्या चवभवतात पाह्य, हा देश जो तू पाहत हाय मी तुले अन् तुह्याल्या वंशजायले नेहमी साठी अधिकार करण्यासाठी देईन.” मंग अब्राम त्या ठिकाणी वस्ती करून रायला.
मलिकिसिदक नावाचा एक माणूस जो सर्वोच्च देवाचा एक याजक होता. एक दिवस जवा अब्राम लढाई करून येत होता, तवा मलिकिसिदक याजक अन् अब्राम एकामेकायले भेटले. तवा मलिकिसिदक याजकाने अब्रामाले आशीर्वाद देऊन म्हतलं, “सर्वोच्च देव जो अभाय अन् पृथ्वीचा स्वामी हाय, तो तुले आशीर्वाद देवो.” मंग अब्रामाने लढाई मध्ये जिकलेल्या सगळ्या वस्तूचा दहावा भाग मलिकिसिदक याजकाले देला.
खूप वर्षे झाले होते, पण अब्राम अन् साराले आतापरेंत लेकरं झाले नव्हते. तवा देवाने परत अब्राम सोबत गोष्ट केली, अन् म्हतलं, “त्याले एक पोरगा होईन, अन् जसे अभायात चांदण्या हाय, तसेच त्याचे वंशज होतीन.” अब्रामाने देवाच्या प्रतिज्ञावर विश्वास केला. देवाच्या प्रतिज्ञावर विश्वास ठेवल्यामुळे देवाने अब्रामाले धर्मी ठरवले.
तवा देवाने अब्राम बरोबर एक करार केला. सामान्यपणे करार हा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पक्षामध्ये केला जाणारा एक समझोता असते. देवाने अब्राम बरोबर प्रतिज्ञा तवा केली जवा अब्राम झोपला होता, पण तो देवाले आयकू शकत होता. देवाने म्हतलं, “मी तुले तुह्याच पोटचा एक पोरगा देईन. मी तुह्या वंशजायले कनान देश देईन.” पण अजूनहि अब्रामले पोरगा झाला नव्हता.
बायबल कथाःउत्पत्ति 11-15
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।