5. देवाच्या प्रतिज्ञा नुसार झालेला पोरगा
अब्राम अन् सारा कनान देशात येऊन दहा वर्ष झाले होते, तरीपण त्यायले लेकरं झाले नव्हते. म्हणून अब्रामची बायको साराने त्याले म्हतलं, “देवानं मले लेकरं देले नाई अन् आता मी खूप म्हातारी झाल्यामुळे मले लेकरं होऊ शकत नाई, म्हणून तुमी माह्यी दासी हाजिरा संग लग्न करून घ्या, अन् ते मह्यासाठी एका संतान उत्पन्न करणार.”
म्हणून अब्रामाने हागार संग लग्न केलं. हाजिरा पासून अब्रामले एक पोरगा उत्पन्न झाला, व त्याचे नाव त्याने इश्माएल ठेवले. पण सारा हाजिराचा द्वेष करु लागली. इश्माएल तेरा वर्षांचा असतांना, देव परत अब्राम संग बोलला.
देवानं म्हतलं, “मी सर्वसमर्थ देव हाय. मी तुह्यासंग एक करार करीन. ”मग अब्रामाने देवा संग जमिनीपर्यंत लवून नमन केले. देवाने अब्रामाले असं पण म्हतलं की, “तु खूप साऱ्या देशाचा पिता होसीन. मी तुले अन् तुह्या वंशजायल कनान देश देईन अन् मी त्यायचा नेहमीचा देव होईन. तू आपल्या घराण्यातल्या हरेक माणसाचा खतना कर.
“तुह्यी बायको सारा हिले पोरगा होईन-तोच खरा वारसदार होईन. त्याचं नाव इसहाक ठेव. मी त्याच्या संग आपला करार करीन अन् त्याले महान राष्ट्र करीन. मी इश्माएल पासून पण एक मोठे राष्ट्र करीन. पण माह्या करार इसहाक संग असीन.” मग देवानं अब्रामाचे नाव बदलून अब्राहाम असे ठेवले, याचा अर्थ “खूप लोकायचा पिता.” देवाने सारेचे पण नाव बदलले, अन् तिचे नाव “सारा” असे ठेवले याचा अर्थ, “राजकन्या.”
त्या दिवशी अब्राहामाने आपल्या घराण्यातल्या सगळ्या माणसायचा खतना केला. एका वर्षानंतर, अब्राहाम 100 वर्षाचा अन् सारा 90 वर्षाची असतांना साराने अब्राहामाच्या पोराले जन्म देला. त्यायनं देवाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव इसहाक ठेवले.
जवा इसहाक जवान झाला तवा देवानं अब्राहामाच्या विश्वासाची परिक्षा पायण्यासाठी, त्याले म्हतलं, “अब्राहाम, तुह्या एकुलत्या-एक पोरगा इसहाकले घे अन् त्याले माह्यासाठी होम बली कर.” अब्राहामने परत देवाची आज्ञा मानली अन् इसहाकले बली करण्याचा निर्णय घेतला.
अब्राहाम अन् इसहाक होम बलीच्या ठिकाणी जात असतांना इसहाकाने विचारले, “बाबा, होम बली साठी काड्या हाय पण कोकरु कोठे हाय?” अब्राहामनं म्हतलं, “मले देव स्वत: होम बली साठी कोकरु पाऊन देईन.”
जवा ते होम बलीच्या जागेवर पोहोचले तवा अब्राहामनं आपला पोरगा इसहाकले बांधलं अन् वेदीवर ठेवलं. तो आपल्या पोराची बली करणारच होता त इतक्यात देव बोलला, “थांब! पोराले बली करू नको! आता मले माईत झालं कि तू माह्य भय मानतो, कारण तून आपल्या एकुलत्या-एक पोराले माह्यासाठी राखून राखून ठेवलं नाई.”
अब्राहामाने जवळच्या झुडूपामध्ये शिंगं गुंतलेला एक मेंढरू पायला. इसहाकाच्या ठिकाणी देवानं मेंढरू बली करण्यासाठी देला होता. अब्राहामने आनदाने त्या मेंढरूचे होम बली केले.
मंग देव अब्राहाम संग बोलला, “कारण तून माह्यासाठी आपलं सगळ काई देलं, अतपरेंत कि आपल्या एकुलत्या-एक पोराले पण देण्याचे निर्णय केला, म्हणून मी तुले आशीर्वाद देतो. तुह्ये वंशज आकाशातल्या ताऱ्यायपेक्षा जास्त होतीन. तु माह्यी आज्ञा पाळली म्हणून तुह्या संतानायद्वारे पृथ्वीवरचे सगळे देश आशीर्वादित होतीन.”
बायबल कथाःउत्पत्ति 16-22
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।