6. देव इसहाकले मदत करते

6. देव इसहाकले मदत करते — चित्र 1

जवा अब्राहाम खूप बुडा झाला होता, तवा त्याचा पोरगा इसहाक जवान झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या एका सेवकाले त्याच्या नातेवाईक रायत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला पोरगा इसहाकसाठी एक नवरी शोधून आण्याले पाठवले.

6. देव इसहाकले मदत करते — चित्र 2

जती अब्राहामचे नातेवाईक रायत होते, त्या देशाच्या जायाच्या खूप लांब प्रवास केल्यानंतर देवाने त्या सेवकाले रीबिका पासी पाठवले, ते अब्राहामाच्या भावाची नात होती.

6. देव इसहाकले मदत करते — चित्र 3

रीबिका आपल्या बापाचे घर सोडून, त्या सेवकाच्या बरोबर इसहाकाच्या घरी जायाले तयार झाली. जसी ते इसहाकच्या घरी पोहचली, इसहाकाने तिच्यासोबत लग्न केले.

6. देव इसहाकले मदत करते — चित्र 4

खूप वर्षांनंतर अब्राहाम मरून गेला. तवा देवाने अब्राहामाचा पोरगा इसहाकाले, केलेल्या करारामुळे आशीर्वाद देला. त्या करारामध्ये देवाची प्रतिज्ञा होती, कि अब्राहामाचे असंख्य वंशज होणार. पण इसहाकाची बायको रीबिकाले लेकरू नव्हते.

6. देव इसहाकले मदत करते — चित्र 5

इसहाकाने रीबिकाच्या साठी प्रार्थना केली, अन् देवाने तिले जुडवा लेकरायचा गर्भ धारण करण्यासाठी सक्षम केले. जवा ते लेकरं रीबिकाच्या गर्भातच होते, ते एकामेकायच्या सोबत झगडू लागले, म्हणून जे काई होऊ रायले होते ते रीबिकाने देवाले सांगतले.

6. देव इसहाकले मदत करते — चित्र 6

देवाने रीबिकाले म्हतलं. "तु दोन लेकरायले जन्म देशीन. त्यायचे दोन वंशज होतीन, अन् ते अलग अलग जाती निर्माण करतीन. ते एकामेकायच्या सोबत भांडणे करतीन, पण मोठ्या पोरापासून निर्माण होणाऱ्या जातिले, लहान पोराच्या पासून निर्माण होणाऱ्या जातीची आज्ञा मानावी लागीन."

6. देव इसहाकले मदत करते — चित्र 7

जवा रीबिकाच्या लेकरायचा जन्म झाला, तवा पयला पोरगा तांबूस वर्णाचा असून त्याचे सगळे अंग केशवस्त्रासारखे होते, त्यायनं त्याचे नाव एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा लहान पोरगा एसावाची टाकीले पकडून जन्मला, अन् त्यायनं त्याचे नाव याकोब ठेवले.

बायबल कथाःउत्पत्ति 24:1-25:26

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।