7. देव याकोबले आशीर्वाद देतो
जवा हे पोरं मोठे झाले, तवा याकोबले घरीच राहायले आवडत होतं, पण एसावाले जनावराचे शिकार कराले आवडत होतं. याकोब त्याची माय रिबकाचा आवडता होता, पण एसाव त्याचा बाप इसाहाकाचा आवडता होता.
एका दिवशी, जवा एसाव शिकार करून परत आला, तवा त्याले खूप भूक लागली होती. एसावाने याकोबाले म्हतलं, “तू तुह्या बनवलेल्या जेवणातून काहीतरी मले दे.” याकोबाने उत्तर देलं, “पयले तू माह्या संग प्रतिज्ञा कर, कि तुह्या मोठा पोरगा म्हणून जो अधिकार हाय, तो अधिकार मले देऊन दे, मंग मी तुले काई अन्न खायले देईन.” अशा प्रकारे एसावाने त्याच्या लहान भाऊ याकोबाले आपला मोठा पोरगा असण्याचा अधिकार देऊन देला. मंग याकोबाने त्याले काही अन्न खायले देलं.
इसहाकले आपला आशीर्वाद त्याचा मोठा पोरगा एसावले देण्याची इच्छा होती. पण असं कऱ्याच्या पयले, रीबिका अन् याकोब यांनी मिळून याकोब हा एसाव असाचा ढोंग केला अन् इसहाकले फसवलं. इसहाक म्हातारा झाल्यामुळे त्याले डोळ्याने दिसत नव्हतं. त्याच्या बाप इसहाकने त्याले ओयखू नये म्हणून याकोबने एसावचे कपडे घातले अन् आपल्या मानीवर अन् हातायवर बकरीचे कातडे घातले होते.
याकोबनं त्याचा बाप इसहाक कडे येऊन म्हतलं, "मी एसाव हाय. तुम्ही मले आशीर्वाद देला पायजे म्हणुन मी तुम्हच्या कडे आलो हाय.” जवा इसहाकनं याकोबनं घातलेल्या बकरीच्या केसाले स्पर्श केला अन् त्याच्या कपड्यायचा वास घेतला, तवा तो एसावच हाय असं त्याले वाटले अन् त्यानं त्याले आशीर्वाद देला.
तवा पासून एसाव याकोबाचा द्वेष कराले लागला, कावून कि याकोबने त्याचा मोठा पोरगा असण्याचा अधिकार अन् आशीर्वाद पण चोरला होता. म्हणून त्यायचा बाप इसहाक मेल्यानंतर त्याने याकोबले मारून टाकण्याची योजना बनवली.
पण रीबिकानं एसावच्या योजनेच्या बाऱ्यात आयकलं. म्हणून तिनं अन् इसहाकनं याकोबले आपल्या दूर देशात असलेल्या नातेवाईकाकडे राहाले पाठवलं.
याकोब बरेच वर्ष रीबिकाच्या नातेवाईका बरोबर रायला. त्या दिवसामध्ये त्याने लग्न केले अन् त्याले बारा पोरं अन् एक पोरगी झाली. देवाने त्याले खुप श्रीमंत बनवले.
त्यानंतर याकोब वीस वर्षानं कनान देशामध्ये असणा-या आपल्या घरी, त्याच्या कुटुंब, नोकर-चाकर अन् गायढोरायले घेऊन आपल्या घरी वापस आला.
याकोब खूप भेत होता, कावून कि त्याले वाटत होतं, की त्याचा भाऊ एसाव अजूनही त्याले मारण्यासाठी टपला असीन. म्हणून त्यानं आपल्या जनावरायचे खूपसारे झुंड एसावाकडे भेट म्हणून पाठवले. ज्या सेवकायनं ते कळप एसावाकडे नेले ते त्याले म्हणाले, "तुह्या दास याकोब तुह्यासाठी हे जनावरायचे झुंड भेट म्हणून देत हाय. तो लवकरच येत हाय."
पण एसावनं पयलेच याकोबले क्षमा केली होती, अन् त्यायले एकमेकायले भेटून आनंद झाला. मग याकोब सुखाने कनान देशामध्ये राहाले लागला. मंग इसहाक मरण पावला, अन् याकोब अन् एसावानं त्याले गाडले. देवाने अब्राहामा संग केलेल्या कराराची प्रतिज्ञा आता इसहाकाकडून याकोबाकडे सोपवण्यात आली होती.
बायबल कथाःउत्पत्ति 25:27-33:20
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।