8. देव योसेफ अन् त्याच्या कुटुंबाचा बचाव करते
ब-याच वर्षांनंतर जवा याकोब म्हातारा झाला होता, त्याने आपला आवडता पोरगा योसेफले मेंढरायचे राखण करनाऱ्या आपल्या मोठ्या भावायकडे त्यायचे कसं काय चालले हाय, हे पाहाण्यासाठी पाठवले.
त्यायचा बाप याकोबाचे योसेफवर जास्त प्रेम असल्यामुळे अन् योसेफ आपल्या भावायवर अधिकार करीन असे स्वप्न त्याले पडल्यामूळे, त्याचे भाऊ त्याचा राग करत होते. जवा योसेफ आपल्या भावायकडे आला, तवा त्यायनं त्याले बंदी बनवले अन् गुलामायचा व्यापार करण्याऱ्यायले विकून टाकले.
योसेफच्या भावायनं घरी परत येण्याच्या पयले, योसेफचा झगा बकरीच्या रक्तामध्ये बुडवला. मग त्यायनं तो झगा आपल्या बापाले दाखवला; याच्यासाठी की एखाद्या जंगली जनावराने योसेफची हत्या केली हाय, याच्यावर त्याचा विश्वास बसला पायजे. जवा याकोबाले माईत झाले कि त्याच्या आवडत्या पोराची जंगली जनावराने हत्या केली, तवा त्याले लय दुःख झाले.
त्या गुलामायचा व्यापार करण्याऱ्यायनं योसेफले मिसर देशामध्ये आणले. नील नदीच्या किनाऱ्यावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, अन् सामर्थ्यशाली देश होता. गुलामायच्या व्यापार करण्याऱ्यायनं योसेफले एका श्रीमंत सरकारी अधिकाऱ्याले विकून टाकले. योसेफनं आपल्या मालकाची चांगली सेवा केली, अन् देवाने योसेफले आशीर्वादित केलं.
योसेफच्या मालकाच्या बायकोनं योसेफ संग कुकर्म करण्याचा प्रयत्न केला, पण अशा प्रकारे देवाच्या विरूद्ध पाप करण्यासाठी योसेफनं नकार देला. ह्या गोष्टीवरून तिनं संतप्त होऊन योसेफवर खोटा आरोप केला अन् योसेफले पकडून जेलात टाकण्यात आले. जेलामध्ये पण, योसेफ देवासंग विश्वासयोग्य रायला, अन् देवाने त्याले आशीर्वादित केलं.
दोन वर्ष झाले होते, कोणता पण गुन्हा नसून पण योसेफ जेलातच होता. एका रात्री, मिसर देशाचा राजा फिरोनले, दोन चिंताजनक स्वप्ने पडले, ज्याच्यामुळे तो खूप परेशान झाला होता. त्याच्या सल्लागारायपैकी कोणीही त्याले स्वप्नायचा अर्थ सांगू शकला नाई.
देवाने योसेफले स्वप्नायचा अर्थ सांगण्याची क्षमता देली होती, म्हणून फिरोन राजाने योसेफले जेलातून आपल्या घरी बलावले. योसेफनं राजाले त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला अन् म्हतलं, "देव सात वर्षे पुष्कळ पिकपाणी देईन अन् त्यानंतर सात वर्षे दुष्काळ पडीन.
फिरोन राजा योसेफवर येवढा खुश झाला की त्याने योसेफले मिसर देशाचा पंतप्रधान बनवले.
योसेफने लोकायले भरपूर पिकाच्या सात वर्षांमध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवाले सांगतले. मग योसेफने दुष्काळातले सात वर्षे लोकायले खाण्यासाठी आवश्यक होईल इतके धान्य विकले.
तो दुष्काळ फक्त मिसर देशातच नाई, तर याकोब अन् त्याचे कुटुंबिय राहात असलेल्या कनान देशामध्ये पण भयंकर असा पडला होता.
मंग याकोबने आपल्या मोठ्या पोराले अन्न विकत घेण्यासाठी मिसर देशात पाठवले. धान्य विकत घ्यायले आलेले भाऊ योसेफच्या समोर उभे होते पण त्यायनं त्याले ओळखले नाई. पण योसेफने त्यायले ओळखलं.
ते बदलले हाय की नाही याची परीक्षा पाहिल्यानंतर, योसेफने त्यायले म्हतलं, "मी तुमचा भाऊ योसेफ हाय! भेऊ नका. तुम्ही मले गुलाम म्हणून विकून माह्ये वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच वाईटाचा माह्य चांगले करण्यासाठी उपयोग केला! या अन् मिसर देशामध्ये वस्ती करून राहा, म्हणजे मी तुम्हाले अन् तुमच्या कुटुंबियायले धान्याचा पुरवठा करु शकीन.
जवा योसेफचे भाऊ घरी आले तवा त्यायनं त्यायचा बाप याकोबले योसेफ अजून जीवंत हाय असे सांगतले, तवा याकोबले खूप आनंद झाला.
जरी याकोब आता म्हातारा झाला होता, तरी पण तो आपल्या कुटुंबासंग मिसर देशात आला अन् ते सर्व तेथे राहू लागले. याकोबाने आपल्या मरणाच्या पयले, आपल्या सर्व पोरायले आशीर्वाद देला.
देवाने अब्राहम संग केलेल्या कराराची प्रतिज्ञा इसहाकाकडे, मग याकोब आणि त्याच्या बारा पोरायकडे अन् त्यायच्या कुटुंबियाकडे सोपविण्यात आली. ह्या बारा पोरायची संतती हेच इस्राएल देशाचे बारा वंश झाले.
बायबल कथाःउत्पत्ति 37-50
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।