9. देव मोशेची अगुवाई करते

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 1

योसेफ मेल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक मिसर देशात रायत होते. ते अन् त्यायची संताने पुष्कळ वर्षे तेथे राहिले अन् त्यायले पुष्कळ लेकरं झाले. त्यायले इस्राएली असे म्हणत होते.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 2

शेकडो वर्षांनंतर इस्राएली लोकायची संख्या खूप वाढली. योसेफनं केलेल्या कामगिरीले मिसर देशातले लोकं विसरले होते. त्यायले आता इस्राएली लोकायची भिती वाटू लागली होती. कावून कि ते पुष्कळ होते. म्हणून त्यावेळी मिसर देशावर राज्य करत असलेल्या फिरोन राजाने इस्राएल लोकायले मिसरी लोकायचे गुलाम करून ठेवले.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 3

मिसर देशाच्या लोकायनं इस्राएली लोकायले खूपसाऱ्या इमारतींचे बांधकाम कऱ्याले अन् मोठमोठ्या शहरायले निर्माण करण्यासाठी सक्ती केली. अशा कष्टायच्या कामाने त्यायचे जीवन खूप त्रासदायक झाले, पण देवाने त्यायले आशीर्वादित केले अन् त्यायले आणखी लेकरं झाले.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 4

फिरोन राजाने पायलं की इस्राएल लोकायले पुष्कळ लेकरं होत हाय, म्हणून त्याने आदेश दिला की इस्राएल लोकायच्या बाईने पोराले जन्म देला तर त्या पोराले नील नदीमध्ये फेकून द्यावे.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 5

एका इस्राएली बाईने एका पोराले जन्म देला. तिनं अन् तिच्या नवऱ्यानं आपल्या बाळाले काही काळापर्यंत लपविण्याचा प्रयत्न केला.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 6

जवा त्या बाळाचे आईवडिल त्याले अजून जास्त लपवू शकले नाही, तवा त्यायनं त्या बाळाले मृत्युपासून वाचविण्यासाठी एका तरंगणा-या टोपलीमध्ये ठेवून ते नील नदीच्या काठावर ठेवली. त्या बाळाची मोठी बहिण त्याचे काय होईल ते पायत होती.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 7

फिरोन राजाच्या पोरीने ते टोपली उघडून अंदर पायले. जवा तिने त्या बाळाले पायले, तवा तिने त्याले आपला पोरगा बनवले. तिने त्या बाळाले दुध पाजण्यासाठी एका इस्राएली बाईले बोलावले, पण ते त्याची आई होती हे तिले माईत नव्हते. जवा ते बाळ मोठे झाले अन् त्याले आपल्या आईच्या दुधाची आवश्यकता नाई होती, तवा तिने त्याले फिरोन राजाच्या पोरीकडे देऊन देले, फिरोन राजाच्या मुलीने त्याचे नाव मोशे ठेवले.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 8

एका दिवशी, जवा मोशे मोठा झाला, तवा त्याने एका मिसर देशाच्या मानसाले एका यहूदी गुलामाले मारताने पायले. मोशेने आपल्या इस्राएली भावाले वाचविण्याचा प्रयत्न केला.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 9

मले कोणी पायत नाही, हे पावून मोशेने त्या मिसर देशाच्या मानसाले मारून टाकले अन् त्याचे शरीर जमिनीत रोऊन टाकले. पण मोशेने केलेले हे काम कोणीतरी पाहिले होते.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 10

जवा फिरोन राजाने मोशेने केलेल्या कामाच्या बाऱ्यात आयकले तवा त्याने त्याले मारण्याचा प्रयत्न केला. फिरोन राजाच्या शिपायायपासून सुरक्षित राहाण्यासाठी मोशे मिसर देश सोडून जंगलात पळून गेला.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 11

मोशे आता मिसर देशापासून दूर जंगलामध्ये मेंढरे चाराले लागला होता. त्याने तिथं एका बाई संग लग्न केलं अन् त्याले तिथं दोन पोरं झाले.

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 12

एका दिवशी मेंढरं चारत असतांना, मोशेनं एक झाड जळत असतांना पाहिले. पण ते झाड जळून भस्म होत नाई, असे त्याले दिसून आले. मग आजून चांगल्या प्रकारे पाह्या साठी तो त्या झाडाकडे गेला. तो त्या जळत असलेल्या झाडाजवळ जात असतांना, देवाचा आवाज त्याले आयकाले आला, तो आवाज असे म्हणत होता, "मोशे, तू आपल्या पायातले जोडे काढ. कारण तू पवित्र भूमीवर उभा हाय."

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 13

देवाने म्हतलं, "मी आपल्या लोकायचे दुःख पाहिले हाय. मी तुले फिरोन राजाकडे माह्या लोकायले मिसरी लोकायच्या गुलामीतून सोडविण्यासाठी पाठवणार हाय. मी त्यायले कनान देश देणार हाय, ज्याले मी अब्राहाम, इसहाक अन् याकोबले देण्याची प्रतिज्ञा केली होती."

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 14

मोशेनं म्हतलं, "जर लोकायनं मले विचारलं की तुले कोण पाठवलं हाय, त मी त्यायले काय सांगीन? "देवाने म्हतलं, "मी जो हाय तो हाय. त्यायले सांग, ‘मी हाय, यानं मले तुमच्याकडे पाठवले हाय. ’त्यायले हे पण सांग की, मी त्यायच्या पूर्वजायचा म्हणजे अब्राहाम, इसहाक अन् याकोबाचा देव हाय. हेच माह्य सनातन नाव हाय."

9. देव मोशेची अगुवाई करते — चित्र 15

मोशे लय भयभित झाला अन् फिरोन राजाकडे जाण्यासाठी नकार देऊ लागला, कारण त्याले बरोबर बोलता येत नव्हत, म्हणून देवाने मोशेचा भाऊ, हारोन, याले त्याच्या मदती साठी पाठवले. देवाने मोशे व हारोनले पयलेच सांगून ठेवले की फिरोन राजा हट्टीपणा करीन.

बायबल कथाःनिर्गम 1-4

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।