10. मिसर देशावर दहा भयंकर पीडा
देवाने मोशे अन् हारोनले चेतावणी देली होती कि, फिरोन राजा हटीला होऊन जाईन. जावा ते फिरोन राजाकडे गेले, ते म्हणाले, "इस्राएलाचा देव असं म्हणते, “माह्या लोकायले जाऊ दे!" पण फिरोन राजाने त्यायचे आयकले नाई, अन् इस्त्राएली लोकायले मोकळे करण्याच्या जागी त्याने त्यायले आणखी कष्टाचे कामं करण्याची सक्ती केली!
फिरोन राजाने लोकायले जाण्यासाठी सतत मनाई केली, म्हणून देवाने मिसर देशावर दहा भयानक पीडा पाठविल्या. या पीडायद्वारे देवाने दाखवून देलं, की तो फिरोन राजा अन् मिसर देशातल्या देवी-देवतायपेक्षा अधिक जास्त सामर्थ्यशाली हाय.
देवाने नील नदीच्या पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, तरीपण फिरोन राजा इस्राएल लोकायले सोडण्यासाठी तयार झाला नाही.
मग देवाने सर्व मिसर देशामध्ये बेडूक पाठवले. फिरोन राजाने मोशेले बेडूक दूर करण्यासाठी विनंती केली. पण सर्व बेडूक मेल्यानंतर फिरोन राजाचे मन अजून कठोर झाले अन् त्याने इस्राएल लोकायले मिसर देश सोडण्याची परवानगी देली नाई.
मग देवाने उवायची पीडा पाठवली. मग त्याने गोमाशायची पीडा पाठवली. फिरोन राजाने मोशे अन् हारोनले बोलावून म्हतलं, की जर ते गोमाशायची पीडा दूर करतीन त मी इस्राएली लोकायले मिसर देश सोडून जाऊ देईन. जवा मोशेनं प्रार्थना केली, तवा देवाने सर्व गोमाशा दूर केल्या. पण फिरोन राजाने आपले मन अजून कठोर केले अन् इस्राएली लोकायले जाण्यासाठी मनाई केली.
त्याच्या नंतर, देवाने मिसरी लोकायचे सर्व पाळीव प्राण्यायले बिमार करून मरू देले. पण फिरोन राजाचे मन अधिक कठोर होत गेले अन् त्याने इस्राएली लोकायले जाऊ देले नाई.
मंग देवाने मोशेले फिरोन राजाच्या समोर हवेमध्ये राख फेकाले सांगतले. त्याने असे केल्यानंतर, सर्व मिसर देशातल्या लोकायच्या आंगावर फोडे निघाले. पण इस्राएली लोकायले काही पण झालं नाई. देवाने फिरोन राजाचे मन अधिक कठोर केले, त्याच्यामुळे फिरोन राजा आता पण इस्राएली लोकायले सोडण्यासाठी तयार नव्हता.
त्यानंतर, देवाने मिसर देशावर गाराचा पाऊस पाडून खूप साऱ्या पिकायचे नुकसान केले अन् घराच्या बाहेर गेलेल्या हरेक व्यक्तीले ठार मारले. फिरोन राजाने मोशे अन् हारोनाले बोलावून म्हतलं, "मी मोठे पाप केले हाय. तुम्ही जाऊ शकता.” मग मोशेने प्रार्थना केली अन् गाराचा पाऊस थांबला.
पण फिरोन राजाने परत पाप केले अन् आपले मन कठोर केले. त्यानं इस्राएली लोकायले जाण्यासाठी मना केले.
मग देवाने मिसर देशावर गवतातल्या घोड्यायची पीडा पाठवली. ह्या गवतातल्या घोड्यायनं गारपिटाच्या पावसामध्ये वाचलेले सर्व पिक खाऊन टाकले.
मग देवाने मिसर देशावर तीन दिवस निबिड अंधकाराची पीडा पाठविली. एवढा काळोख होता की मिसरी लोक घराच्या बाहेर जाऊ पण शकत नव्हते. पण इस्राएली लोक राहत असलेल्या ठिकाणी उजेळ होता.
ह्या नऊ पीडा नंतर पण, फिरोन राजा इस्राएली लोकायले जाऊ देण्यासाठी नाकारत होता. फिरोन राजा आयकत नसल्यामूळे देवाने आजून एक शेवटची पीडा पाठविली. अन् शेवटी हे पीडा फिरोन राजाचे मन बदलवणार होती.
बायबल कथाःनिर्गम 5-10
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।