11. वल्हांडणाचा सण
देवाने मोशे अन् हरोनले फिरोन राजाकडे हे सांगण्यासाठी पाठवले, की जर तो इस्राएली लोकायले जाऊ देणार नाई, तर देव मिसर देशातल्या पयल्या जन्मलेल्या माणसायले अन् प्राण्यायले मारून टाकीन. जवा फिरोन राजाने हे आयकले तेवा पण त्याच्यावर ह्याचा काही परिणाम झाला नाई अन् त्याने इस्राएली लोकायले सोडले नाई.
देवाने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाच्या पण पयला जन्मलेल्या पोराले वाचवण्यासाठी रस्ता काढला. हरेक कुटुंबाले एक निष्कलंक कोकरु निवडायचा होता अन् त्याचे वध करायचे होते.
देवाने इस्राएली लोकायले सांगतले की त्यायनं त्या वध केलेल्या कोकरुचे काही रक्त त्यायच्या घराच्या दरवाजाच्या चौकटीले लावावे अन् त्याचे मास आगीवर भाजून बेखमीर भाकरी बरोबर घाईघाईने खावे. त्याने त्यायले जेवण झाल्यानंतर मिसर देश सोडण्यासाठी तयार राहाले सांगतले.
देवाने सांगितल्याप्रमाणे इस्राएली लोकायनं सगळी तयारी केली. मध्यरात्री, देवाने जाऊन मिसर देशातल्या हरेक कुटुंबातल्या पयल्या जन्मलेल्या पोराले मारले.
इस्राएली लोकायच्या सर्व घरायच्या चौकटीवर कोकरुचे रक्त असल्यामूळे देव त्या घरायले ओलांडून गेला. त्या घरातले सर्वजण सुरक्षित होते. कोकरुच्या रक्तामुळे त्यायचा बचाव झाला होता.
तरीपण मिसर देशातल्या लोकायन देवावर विश्वास ठेवला नाई अन् त्याच्या आज्ञा पाळल्या नाई. म्हणून देवाने त्यायचे घर सोडले नाई. देवाने मिसर देशातील हरेक पयल्या जन्मलेल्याले पोराले मारून टाकले.
जेलात पयल्या जन्मलेल्या पोरापासून त फिरोन राजाच्या घरातल्या पयला जन्मलेल्या पोरापरेंत हरेक मिसरी पुरूष मरण पावला. मिसर देशातील पुष्कळ लोक खुप दुःखामुळे रडत होते अन् विलाप करत होते.
त्याच रात्री, फिरोन राजाने मोशे अन् हारूनले बोलावून म्हतलं, "इस्राएली लोकायले घेऊन लवकर मिसर देश सोडा अन् आपल्या देवाची भक्ती (उपासना) करा. मिसर देशातील लोकायनं पण इस्राएली लोकायले मिसर देश लवकर सोडण्याची विनंती केली.
बायबल कथाःनिर्गम 11:1-12:32
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।