12. निर्गमन
मिसर देश सोडाच्या वाक्ती इस्राएली लोकायले खूप आनंद झाला. आता ते गुलाम नव्हते, ते आता प्रतीज्ञा केलेल्या देशाकडे जात होते! मिसर देशातल्या लोकायनं इस्राएली लोकायनं मागितलेल्या सर्व वस्तु देऊन देल्या, अतपरेंत कि, सोने, चांदी अन् दुसऱ्या मौल्यवान वस्तू त्यायले देल्या. काई दुसऱ्या देशाच्या लोकायनं पण देवावर विश्वास ठेवला अन् इस्राएल लोकायबरोबर त्यायनं पण मिसर देश सोडला.
देव एका ऊंच ढगाच्या खांबाद्वारे जो दिवसा त्यायच्या समोर चालत होता अन् रात्री तोच ऊंच आगीचा खांब बनत होता. त्याच्याद्वारे त्याने त्यायचे मार्गदर्शन केले. देव नेहमी त्यायच्याबरोबर होता अन् प्रवासात त्यायचे मार्गदर्शन करत होता. त्यायले एकच गोष्ट करायची होती ते म्हणजे देवाचे आज्ञापालन करणे.
थोड्या वेळाने इकडे फिरोन राजाचे अन् त्याच्या लोकायचे मन बदलले अन् इस्राएली लोकायले परत गुलाम करावे असे त्यायले वाटले. देवाने फिरोन राजाले हट्टी अन् कठोर बनवले, हे याच्यासाठी की लोकायले ख-या अन् जीवंत देवाची ओळख झाली पायजे अन यहोवा देव हा फिरोन राजा अन् त्याच्या देवी-देवतापेक्षा अधिक सामर्थ्यशाली हाय हे त्यायले समजले पायजे.
मग फिरोन राजा अन् त्याचे सैनिक इस्राएली लोकायले परत त्यायचे गुलाम बनवण्यासाठी त्यायचा पाठलाग करू लागले. जवा इस्राएली लोकायनं पायलं कि मिसरी सैनीक त्यायचा पाठलाग करून रायले, तवा त्यायले समजले की ते आता मिसरी सैनीक अन् लाल समुद्राच्या मधात फसले हाय. ते खूप घाबरले अन् ओरडले, "आमी मिसर देश कायले सोडला? आता आमी मरणार!"
मोशेने इस्राएली लोकायले सांगतले, "भिऊ नका! देव तुमच्या कडून आज लढणार हाय अन् तुमचे तारण करणार हाय.” मग देव मोशेले म्हणाला, "लोकायले लाल समुद्राकडे जाण्यासाठी सांग."
मग देवाने इस्राएली लोकं अन् मिसरी सैनीक यायच्या मधात ढगाचा खांब उभा केला अन् यामुळे मिसरी सैनीक इस्राएली लोकायले पाऊ शकत नव्हते.
देवाने मोशेले लाल समुद्रावर आपली काठी उभारण्यासाठी अन् त्या समुद्राले दोन भागात कराले सांगतले. मंग देवाने जोरदार वा-याच्या मदतीने समुद्राचे पाणी डावीकडे अन् उजवीकडे हटवले, अन् समुद्रात कोरडा रस्ता तयार केला.
इस्राएली लोकं भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालत गेले अन् त्यायच्या दोन्ही बाजूने पाणी भिंतीसारखे झाले.
मंग देवाने मेघस्तंभ वरती घेऊन रस्त्यातून हटवला, याच्यासाठी की इस्राएली लोकं आपल्या हातातून निसटून जात हाय हे मिसरी लोकायले दिसले पायजे. मिसरी लोकायनं त्यायचा पाठलाग कराचे ठरवले.
ते इस्राएली लोकायचा पाठलाग करत समुद्राच्या रस्त्याने अंदर आले, पण देवाने त्यायच्या अंदर भिती घातली अन् त्यायचे रथ पण चिखलामध्ये अडकून बसले. ते ओरडले, "पळा!" कारण देव इस्राएली लोकायकडून लढत हाय!"
जवा सर्व इस्राएली लोकं सुरक्षितपणे समुद्राच्या दुस-या बाजुले पोहोचले, तवा देवाने मोशेले आपला हात उंच कराले सांगतला. त्याने असं केल्यानंतर, समुद्राचे पाणी मिसरी सैन्यावर पडू लागले अन् पयले सारखे झाले. समुद्राच्या पाण्यामध्ये सगळे मिसरी सैनीक पाण्यात बुडून मेले.
जवा इस्राएली लोकायनं पायलं की मिसरी सैनीक मेले, तवा त्यायनं देवावर अन् मोशे हा देवाचा भविष्यवक्ता हाय ह्याच्यावर विश्वास ठेवला.
इस्राएली लोकायनं मोठा आनंद केला, कारण देवाने त्यायले मरणापासून अन् गुलामगिरीपासून वाचवले होते! आता ते आपल्या देवाची सेवा करण्यासाठी स्वतंत्र झाले होते. इस्राएल लोकायनं त्यायले नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याच्या बाऱ्यात खूप गाणे गाऊन आनंद केला अन् देवाची स्तुती केली, कारण देवाने त्यायले मिसरी सैनीका पासून वाचवले होते.
देवाने इस्राएली लोकायले मिसरी लोकायवर कसा विजय देला अन् त्यायले गुलामगिरीपासून कसे सोडवले याची आठवण त्यायले रायली पायजे म्हणून देवाने इस्राएली लोकायले दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्याची आज्ञा देली. निष्कलंक कोकरुचे बलिदान देऊन त्याचे मास बेखमीर भाकरीबरोबर खाऊन त्यायनं हा सण साजरा केला.
बायबल कथाःनिर्गम 12:33-15:21
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।