13. देवाचा इस्राएली लोकायसंग करार
लाल समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएली लोकायले जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला. हा तोच पर्वत होता जती मोशेनं जळते झाड पाहिले होते. त्या लोकायनं पर्वताच्या पायथ्या जवळ आपले तंबू ठोकले.
देवाने मोशे अन् इस्राएली लोकायले म्हतलं, "जर तुमी माह्यी आज्ञा अन् माह्या कराराले पाळान, त तुमी माह्ये खास निवडलेले लोकं होसान, राजकीय याजकगण अन् पवित्र राष्ट्र होसान."
देव त्यायच्या जवळ यावा यासाठी लोकायनं तीन दिवस आत्मिक तयारी केली. देव सिनायी पर्वताच्या शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा आवाजाच्यासंग उतरून आला. तवा मोशे स्वता पर्वतावर चढला.
मग देवाने त्यायले हे वचनं सांगतले, "मी यहोवा, तुमचा देव हाय, ज्यानं तुम्हाले मिसर देशाच्या दास्यत्वातून सोडवले. तुम्ही अन्य देवताची पूजा करू नका."
आपल्यासाठी कोरीव मुर्ती करू नका अन् तिच्या पाया पडू नका, कारण मी, यहोवा, तुह्या देव जलन ठेवणारा देव हाय. तू माह्ये नाव व्यर्थ घेऊ नकोस. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून त्याचे पवित्रपणे पालन कर. अर्थात सहा दिवस तू आपले सर्व काम कर अन् सातवा दिवस हा तुह्या विश्रांतीचा दिवस अन् माह्या आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ.
आपल्या बापाचा अन् मायचा मान राख. तू खून करू नकोस. तू व्यभिचार करू नकोस. तू चोरी करू नकोस. तू खोटी साक्ष देऊ नकोस (खोटे बोलू नकोस.) तू आपल्या शेजा-याच्या बायकोचा, त्याच्या घराचा, किंवा त्याच्या कोणत्या पण गोष्टीचा लोभ करू नकोस.
मग देवाने ह्या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यायवर लिवून मोशेकडे देल्या. देवाने त्यायले पालन करण्यासाठी अजून खूप सारे नियम अन् विध्या पण देल्या. जर त्यायनं हे सर्व नियम पाळले, तर देवाने त्यायले आशीर्वाद अन् संरक्षण देण्याचे वचन देले. पण जर त्यायनं त्याचे उल्लंघन केले, तर देव त्यायले दंड देईन.
देवाने इस्राएली लोकायले त्याच्यासाठी एक मंडप बनवण्यासाठी तपशिलवार माहिती देली. ह्याले निवासमंडप म्हणत. देवाने त्यायले सांगतले कि मंडप कसे बनवायचे हाय अन् त्याच्या मध्ये कोणत्या वस्तू ठेवाच्या हाय. ह्या मंडप मध्ये दोन खोल्या होत्या अन् त्यायचे दोन भाग करण्यासाठी एक मोठा पडदा होता. पडद्याच्या पाठीमागे असणा-या खोलीमध्ये केवळ महायाजकालेच जाण्याची परवानगी होती कारण तती देवाचा निवास होता.
देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण निवासमंडपा समोर असणा-या वेदीवर देवाले होमबली करण्यासाठी एका जनावाराले आणू शकत होता. याजक त्या पशूले बली करून त्याले वेदीवर देवासाठी होमबली म्हणून जाळत होता. त्या जनावराच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीचे पाप झाकले जाऊन तो व्यक्ति देवाच्या दृष्टीत शुद्ध ठरत होता. मोशेचा भाऊ हारून अन् त्याच्या वंशजायले देवाने आपले याजक म्हणून निवडले.
देवाने दिलेल्या आज्ञाचे पालन करण्यासाठी अन् फक्त त्याचीच उपासना करून त्याचे खास लोकं होण्यासाठी इस्राएल लोकं सहमत झाले.
खूप दिवस, मोशे सिनायी पर्वत शिखरावर देवाशी संभाषण करत होता. लोकायले त्याची वाट पायता-पायता कंटाळा आला. म्हणून ते हारुन कडे सोनं घेवून आले अन् त्याच्या पासून एक मूर्ती बनविण्यासाठी सांगितले कि त्यायनं देवाच्या जागी त्या मूर्तीची उपासना करावी. अशा प्रकारे त्यायनं देवाच्या विरुद्ध भयंकर पाप केले.
हारोनाने त्याची एक वासराच्या आकाराची सोन्याची मूर्ती बनवली. लोकं बेभान होऊन त्या मूर्तीची उपासन करू लागले अन् त्या मूर्तीले बली चढवू लागले. त्यायच्या पापामुळे देवाले त्यायचा भयंकर राग आला अन् त्याने त्यायचा नाश करण्याचे ठरवले. पण मोशेने त्यायच्यासाठी प्रार्थना केली अन् देवाने त्याची प्रार्थना आयकली अन् त्यायचा नाश केला नाई.
शेवटी मोशे सिनाई पर्वतावरून खाली उतरला. तो त्या दोन दगडाच्या पाट्यायले घेऊन होता ज्याच्यावर देवाने त्या दहा आज्ञा लिवल्या होत्या. मोशे येवढा क्रोधीत झाला कि त्यानं त्या पाट्यायले चकनाचूर करून टाकल्या.
मंग त्याने त्या मूर्तीचा कुटून चुरा केला, अन् पाण्यामध्ये टाकला अन् लोकायले ते पाणी पिण्यासाठी देले. देवाने लोकायवर भयानक पीडा पाठविली अन् त्याच्यापैकी बरेचसे माणसे त्याच्या मध्ये मरण पावले.
मोशे परत पर्वतावर चढला अन् त्याने लोकायच्या क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली. देवाने मोशेचे आयकले अन् त्यायले क्षमा केली. मोशे दहा आज्ञा लिहिलेल्या नवीन पाट्या घेऊन परत पर्वतावरुन खाली उतरला. मग देवाने सीनायी पर्वतापासून प्रतीज्ञा केलेल्या देशाकडे जाण्यासाठी लोकायचे मार्गदर्शन केले.
बायबल कथाःनिर्गम 19-34
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।