14. जंगलामध्ये भटकणे

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 1

देवाने इस्राएली लोकायसंग केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम त्यायले पाळण्यासाठी देले होते ते सांगून झाल्यानंतर त्यायनं सीनायी पर्वत सोडला. देव त्यायले प्रतिज्ञा केलेल्या देशाकडे, ज्याले कनान देश पण म्हतल्या जायचे त्याच्याकडे त्यायले घेऊन जात होता. कनान देशाकडे जात असतांना देव ढगाचा खांबा मध्ये त्यायच्या समोर-समोर चालत होता अन् ते त्याच्या मागे-मागे चालत होते.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 2

देवाने अब्राहाम, इसहाक अन् याकोब यायले वचन देले होते की त्यायच्या वंशजायले तो प्रतिज्ञा केलेला देश देईन, पण आता त्या ठिकाणी अनेक जातीचे लोकं राहत होते. त्यायले कनानी असे म्हणत असत. कनानी लोक देवाची आराधना करत नव्हते अन् त्याची आज्ञा मानत नव्हते. ते खोट्या देवीदवतायची उपासना करत होते अन् खूप बेकार काम करत होते.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 3

देव इस्राएली लोकायले म्हणाला, "जवा तुमी प्रतिज्ञाच्या देशामध्ये जासान तवा तती रायणाऱ्या सगळ्या कनानी लोकायले पुर्णपणे नाश करा. त्यायच्या संग शांतीने वागू नका अन् त्यायच्या संग लग्न करू नका. तुमी त्यायच्या सर्व मूर्त्यांचा पूर्णपणे नाश करा. जर तुमी माह्या आज्ञा पाळल्या नाई, तर तुमी माह्या जागी त्यायच्या देवीदेवताची उपासना कराले लागान."

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 4

जवा इस्राएली लोकं कनान देशाच्या सीमेवर आले, तवा मोशेनं इस्राएली लोकायच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा माणसायले निवडले. त्याने त्या माणसायले कसे जावं अन् त्या देशाचा भेद कसा घ्यायचा ह्याबाऱ्यात सुचना देल्या कि तो देश कसा हाय हे पाहावे. त्यायले त्या कनानी लोकायचा पण भेद घ्यायचा होता, कि ते शक्तिशाली हाय की दुर्बल हाय हे पाहावे.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 5

हे बारा माणसं चाळीस दिवस कनान देशात फिरले अन् परत आले. त्यायनं लोकायले सांगतले, "ज्या देशात आमी फिरलो तिथली जमीन एकदम सुपीक हाय अन् पिकपाणी पण भरपूर हाय.” पण दहा हे म्हणाले, "शहरे खूप मजबूत अन् तटबंदीचे हाय, तिथले लोक धिप्पाड हाय! जर आपण त्यायच्यावर हल्ला केला तर ते निश्चितच आपल्याले हारवतीन अन् आपल्याले मारून टाकतीन!"

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 6

तवाच कालेब अन् यहोशु म्हणाले, "कनानी लोक उंच अन् बलाढ्य हाय हे गोष्ट खरी हाय, पण आपण त्यायचा निश्चितपणे पराभव करु शकतो. देव आमच्या बाजूने लढणार!"

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 7

पण लोकायनं कालेब अन् यहोशुचे ऐकले नाई. ते मोशे अन् हारूनवर भडकले अन् म्हणाले, "तुमी आम्हाले अशा भयानक ठिकाणी कावून आणले? इथं युद्धामध्ये मरणे अन् आमच्या बायका अन् लेकरं यायले गुलाम बनण्यापेक्षा मिसर देशामध्ये रायनं हे बरे होते. ते लोकं त्यायले परत मिसर देशामध्ये घेऊन जाईन असा वेगळा नेता त्यायले निवडाचा होता.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 8

हे पाहून देव रागावला अन् दर्शनमंडपाजवळ आला. देव म्हणाला, "तुमी माह्याविरूद्ध बंड पुकारल्यामुळे आता तुमी सगळ्यायले ह्या जंगलामध्ये भटकावे लागीन. फक्त यहोशु अन् कालेब, यायले सोडून बाकी सर्व वीस वर्षाचे अन् वीस वर्षाच्या वरचे लोकं ह्या जंगलामधीच मरतीन अन् त्यायचा प्रतिज्ञाच्या देशामध्ये प्रवेश होणार नाई.”

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 9

जवा लोकायनं देवाले असं म्हणतानं आयकलं, तवा त्यायले दुःख झाले. म्हणून त्यायनं आपले अवजार घेतले अन् कनानी लोकायविरूद्ध लढाई कराले गेले. मोशेने त्यायले सावध केले अन् म्हतले की जाऊ नका, कारण देव त्यायच्या संग जाणार नव्हता, तरी त्यायनं त्याचे आयकले नाई.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 10

ह्या लढाई मध्ये देव त्यायच्या संग गेला नव्हता, म्हणून त्यायचा पराभव झाला अन् बरेच लोकं मेले. मंग इस्राएली लोक कनान मधून वापस आले अन् चाळीस वर्षे जंगलामध्ये भटकत रायले.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 11

त्यायच्या ह्या चाळीस वर्ष भटकण्याच्या वाक्ती देवाने जंगलामध्ये पण त्यायच्या सगळया गरजा पूर्ण केल्या. त्याने त्यायले स्वर्गातली भाकर ज्याले त्यायनं "मन्ना" म्हतलं ते खायले देली. त्याने त्यायच्या तंबूमध्ये लावा पक्षायचे (हे पक्षी मध्यम आकाराचे असतात) थवे पाठवले, अशासाठी की त्यायले मांस खायले मिळावे. ह्या काळामध्ये, देवाने त्यायचे कपडे फाटू देले नाई अन् त्यायचे चप्पल जोडे पण फाटू देले नाई.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 12

देवाने आश्चर्यकारक रितीने त्यायले खडकामधून पाणी देले. तरी पण इस्राएली लोकायनं देवाच्या विरूद्ध अन् मोशेच्या विरूद्ध कुरकुर केली. तरीपण देव अब्राहाम, इसहाक अन् याकोब यायले देलेल्या प्रतिज्ञाच्या बाऱ्यात विश्वासयोग्य रायला.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 13

अजून एकवेळा जवा लोकायले पिण्यासाठी पाणी नव्हते, तवा देवाने मोशेले म्हतलं, "खडकासंग बोल, म्हणजे त्याच्यातून पाणी निघीन.” पण त्या खडकाले आज्ञा करण्याऐवजी त्याने दोनवेळा त्या खडकावर काठी मारून सर्व लोकायसमोर देवाचा अनादर केला. सर्वायले पिण्यासाठी खडकातून पाणी आले, पण देव मोशेवर रागवला अन् म्हणाला, कावून कि तू असं केलं म्हणून "तू प्रतिज्ञा केलेल्या देशात प्रवेश करणार नाई."

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 14

चाळीस वर्ष इस्राएली लोकं जंगलामध्ये भटकले, ज्या इस्राएली लोकायनं देवाच्या विरूद्ध बंड केले होते, ते सर्व तेथेच मरण पावले होते. मंग देवाने लोकायले परत त्या प्रतिज्ञा केलेल्या देशाकडे जाण्यासाठी त्यायचे मार्गदर्शन केले. मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामुळे देवाने लोकायचे नेतृत्व करण्यासाठी त्याची मदत करण्यासाठी यहोशुची निवड केली. देवाने मोशेले हे प्रतिज्ञा देली, की एक दिवस त्याच्या सारखाच दुसरा भविष्यवक्ता देव पाठविन.

14. जंगलामध्ये भटकणे — चित्र 15

मंग देवाने मोशेले अबीराम पर्वताच्या नबो नामक शिखरावर जाऊन प्रतिज्ञा केलेला देश पाहायले सांगितलं. मोशेने प्रतिज्ञा केलेला देश पायला, पण देवाने त्याले तेथे प्रवेश करण्यासाठी परवानगी देली नाई. मंग मोशे मरण पावला अन् इस्राएली लोकायनं तीस दिवस त्याच्यासाठी शोक केला. यहोशु त्यायचा नविन नेता बनला. यहोशु एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला अन् त्याच्या आज्ञा पाळल्या.

बायबल कथाःनिर्गम 16-17; गणना 10-14; 20; 27; अनुवाद 34

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।