15. प्रतिज्ञाचा देश
शेवटी मंग इस्राएली लोकायले कनान देशामध्ये, म्हणजेच देवाने प्रतिज्ञा केलेल्या देशामध्ये प्रवेश करण्याचा वेळ आला. यहोशवाने कनानी शहर यरीहो जे मोठ्या मजबूत भिंतीने सुरक्षित केले गेले होते, तेथे दोन भेद घेणाऱ्यायले पाठवले. त्या शहरामध्ये रहाब नावाची एक वेश्या राहत होती. तिनं त्या भेद घेणाऱ्यायले आपल्या घरामध्ये लपवले अन् नंतर त्यायले निसटून जाण्यासाठी मदत केली. तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता. जेव्हा इस्राएल लोकं यरीहो शहराचा नाश करतीन तवा रहाब अन् तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्यायनं वचन देले.
इस्राएली लोकायनं प्रतिज्ञाच्या देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यरदन नदी पार करने आवश्यक होते. देवाने यहोशुले सांगतले, "पयले याजक लोकायले सामोर जाऊ दे.” जवा याजकायच्या पायाचा स्पर्श पाण्याले झाला, तवा यरदन नदीचा वरून येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला अन् इस्राएली लोकं कोरड्या जमिनीवरून चालत नदीच्या पलिकडे जाऊ शकले.
यरदन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशुले सांगतले की कशा प्रकारे त्यायनं मजबूत यरीहो नगरावर हल्ला केला पायजे. लोकायनं देवाच्या आज्ञेचे पालन केले. देवाने सांगतल्या प्रमाणेच सर्व सैनिकायनं अन् याजकायनं यरीहो शहराले सहा दिवस प्रत्येकी एक वेळा प्रदक्षिणा घातल्या. मग सातव्या दिवशी, इस्राएली लोकायनं आणखी सात वेळा शहराले प्रदक्षिणा घातल्या.
सातव्या वाक्ती प्रदक्षिणा घातल्या नंतर, सैनिकायनं गर्जना केल्या अन् याजकायनं आपली तुरही वाजवली.
मंग यरीहो शहराच्या चारही बाजूच्या भिंती पडल्या. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकायनं शहराचा हरेक वस्तूचा नाश केला. त्यायनं केवळ राहाब अन् तिच्या कुटुंबाले जिवंत ठेवले, जे नंतर इस्राएलचा एक भाग बनले. जवा कनान देशामध्ये राहणा-या दुसऱ्या लोकायनं आयकले की इस्राएली लोकायनं यरीहो शहराचा नाश केला हाय, तवा इस्राएली लोक त्यायच्यावर पण हल्ला करतीन याची त्यायले भिती वाटली.
देवाने इस्राएली लोकायले आज्ञा केली होती की त्यायनं कनानी लोकायबरोबर शांतीचा करार करायचा नाई. पण गिबोनी नावाच्या कनान देशातल्या एका जातीने यहोशु बरोबर खोटे बोलले. त्यायनं म्हतलं की ते कनान देशापासून खूप दूर रयतात. त्यायनं यहोशुले त्यायच्यासंग शांतीचा करार करण्यासाठी विनंती केली. यहोशु अन् इस्राएली लोकायनं गिबोनी लोकं कोठून आले होते याची देवाकडे विचारपूस केली नव्हती. तरीपण यहोशुनं त्यायच्या संग शांतीचा करार केला.
तीन दिवसाच्या बाद जवा इस्राएली लोकायले माईत झाले की गिबोनी लोकायनं त्यायची फसवणूक केली हाय, तवा ते खूप रागावले. पण तरीही त्यायनं तो करार पाळला, कारण त्यायनं देवाच्या समोर त्यायले वचन देले होते. काही काळानंतर, कनान देशातल्या दुसऱ्या जातीच्या राजायनं, अमोरी लोकायनं, आयकले की गिबोनी लोकायनं इस्राएली लोकायसंग करार केला हाय, तवा त्यायनं आपले सैन्य एकत्र करून गिबोनी लोकायवर हल्ला केला. गिबोनी लोकायनं यहोशुकडे संदेश पाठवला अन् त्यायले मदत करण्याची विनंती केली.
यासाठी यहोशुने इस्राएलच्या सैनिकायले जमा केले अन् गिबोनी लोकायकडे पोहोचण्यासाठी रात्रभर चालत रायले. पहाटेच त्यायनं अमोरी सैनिकायले आश्चर्याचा धक्का देला अन् त्यायच्यावर हल्ला केला.
त्या दिवशी इस्राएलच्या बाजूने देव स्वतः लढला. देवाने अमोरी सैनिकायमध्ये गोंधळ निर्माण केला अन् त्यायच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये खुपसारे अमोरी मरण पावले.
देवाने पण सूर्याले आकाशात एका जागी स्थिर रायण्याची आज्ञा केली, कारण इस्राएली लोकायले अमोरी लोकायचा पुर्णपणे नाश करण्यासाठी वेळ मिळावा. त्या दिवशी देवाने इस्राएलाले मोठा विजय प्राप्त करून देला.
देवाने त्या सैनिकायले पराजित केल्यानंतर, अनेक कनानी जातीच्या लोकायनं एकत्र येऊन इस्त्राएलवर चढाई केली. यहोशु अन् इस्राएली लोकायनं त्यायच्यावर हल्ला करून त्यायचा नाश केला.
या लढाईनंतर देवाने इस्राएलच्या प्रत्येक वंशाले प्रतिज्ञा केलेल्या देशाची वाटणी करुन देली. त्याच्या बाद देवाने इस्राएलच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.
जवा यहोशु म्हातारा झाला, तवा त्याने सगळ्या इस्राएली लोकायले एकत्र बोलावले. मंग यहोशुने इस्राएली लोकायले देवाने त्यायच्यासंग केलेल्या सीनायी पर्वतावरच्या कराराचे स्मरण करून देले, की त्यायनं देवाच्या आज्ञा पाळाव्या. सर्व लोकायनं देवासंग विश्वासयोग्य रायण्याचे अन् त्याच्या आज्ञा पाळण्याचे वचन देले.
बायबल कथाः यहोशू अध्याय 1-24
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।