16. तारणारे

16. तारणारे — चित्र 1

यहोशु मेल्यानंतर, इस्त्राएली लोकायनं देवाचे अनुकरण केले नाई. उरलेल्या कनानी लोकायनं घालवून देले नाई अन् देवाचे नियम पाळले नाई. उलट ख-या अन् जिवंत देवाची उपासना न करता इस्राएली लोक कनानी देवतायची पूजा करू लागले. इस्त्राएली लोकायसाठी राजा नव्हता, म्हणून हरेक जण आपल्या दृष्टिनं जे बरे ते तो करत असे.

16. तारणारे — चित्र 2

इस्त्राएली लोकायनं नेहमी देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे, देवाने त्यायले त्यायच्या शत्रूंच्या सामोर पराभूत करून शिक्षा देली. ह्या शत्रूंनं इस्त्राएली लोकायच्या वस्तूची चोरी केली, त्यायच्या संपत्तीचा नाश केला अन् त्यायच्यातल्या कित्येकायले मारून टाकले. अनेक वर्षानंतर देवाचा आज्ञाभंग अन् शत्रूद्वारे जुलूम सोसून झाल्यानंतर त्यायले पश्चाताप झाला अन् त्यायनं सुटकेसाठी देवाकडे धाव घेतली.

16. तारणारे — चित्र 3

मग देवाने त्यायच्यासाठी एक तारणारा पाठवला, ज्याने त्यायले शत्रूंपासून सोडवले अन् त्यायच्या मध्ये शांती स्थापित झाली. पण नंतर इस्त्राएली लोकं देवाले विसरले अन् ते परत मूर्तिपूजा करू लागले. मंग देवाने शेजारच्या मिद्यांनी लोकायद्वारे त्यायचा पराभव केला.

16. तारणारे — चित्र 4

मिद्यांनी लोकायनं सात वर्षे इस्राएल लोकायचे अन्न - धान्य हडप केले. आता इस्राएली खूप भयभीत झाले अन् आपण मिघानी लोकायच्या हातामध्ये सापडू नये म्हणून ते गुफेमध्ये राहायले लागले. शेवटी आपला बचाव व्हावा म्हणून ते देवाकडे विनवणी करू लागले.

16. तारणारे — चित्र 5

एका दिवशी गिदोन नावाचा एक इस्त्राएली माणूस, मिद्यानी लोकायनं आपले धान्य चोरू नये म्हणून गुप्तपणे त्यायले मारून रायला होता. यहोवाचा एक दूत येऊन त्याले म्हणाला, ‘‘हे बलवान वीर, देव तुह्याबरोबर हाय. जा आणि इस्त्राएली लोकायले मिद्यानी लोकायच्या हातातून सोडव.’’

16. तारणारे — चित्र 6

गिदोनच्या बापानं एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती. देवाने गिदोनले ते वेदी तोडण्यासाठी सांगतले. पण गिदोनले लोकायचा भय वाटल्यामुळे, तो अंधार पडण्याची वाट पायत होता. मग त्याने ती वेदी फोडून तिचे तुकडे तुकडे केले. मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ‌ त्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली अन् त्याच्यावर देवाले पशूबली अर्पण केले.

16. तारणारे — चित्र 7

दुस-या दिवशी त्या वेदीचा कोणीतरी नाश केला हाय, हे पाऊन लोकं खूप रागवले. ते गिदोनले जीवे मारण्यासाठी त्याच्या घरी गेले, पण गिदोनचा बाप त्यायले म्हणाला, ‘‘तूमी आपल्या देवाची मदत करण्याचा प्रयत्न का करता? जर तो देव हाय तर त्याले स्वत:चे रक्षण करु द्या! ’’त्याने असे म्हटल्यामुळे त्यायनं गिदोनले मारले नाई.

16. तारणारे — चित्र 8

मंग मिद्यानी लोक परत इस्त्राएली लोकायचे धान्य चोरी करण्यासाठी आले. ते एवढे जास्त होते की, ते मोजण्याच्या पलीकडे होते. गिदोनने इस्त्राएली लोकायले एकत्र बोलावून मिद्यानी लोकायसंग युध्द करण्यासाठी तयार केले. गिदोनने देव त्याले इस्त्राएली लोकायची सुटका करण्यासाठी उपयोग करणार हाय, याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मांगतले.

16. तारणारे — चित्र 9

पयले चिन्ह म्हणून गिदोनने जमिनीवर कपडा ठेवला अन् देवाले म्हतलं, की उद्या सकाळी जमिनीवर ओस न पडता फक्त कापडावरच पडावे असे झाले पायजे. देवाने तसेच केले. दुस-या रात्री, त्याने म्हतलं की जमीन भिजावी पण कपडा कोरडाच रहावा असे झाले पायजे. देवाने ते पण केले. हया दोन्ही चिन्हाच्या द्वारे गिदोनले खात्री झाली की देव त्याचा उपयोग इस्राएली लोकायले मिद्यानी लोकायपासून सोडवण्यासाठी करणार हाय.

16. तारणारे — चित्र 10

32,000 इस्राएली सैनिक त्याच्याकडे आले, पण देवाने त्याले सांगतले की, ते खूप हाय. म्हणून युध्द करण्यासाठी भेणा-या 22000 सैनिकायले त्याने परत पाठवले. देवाने गिदोनले सांगतले की ते अजूनही पुष्कळ हाय. म्हणून 300 सैनिकायले सोडून बाकी सर्वायले त्याने घरी पाठवून देले.

16. तारणारे — चित्र 11

त्या रात्री देवाने गिदोनले सांगतले, ‘‘तू मिद्यानी लोकायच्या छावणीकडे जा अन् ते काय बोलत हाय, हे आयकून भयभित होऊ नको. ’’म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला अन् त्याले पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या दोस्ताले सांगत असल्याचे गिदोनने आयकले. त्या सैनिकाचा दोस्तं म्हणाला, ‘‘हया स्वप्नाचा अर्थ गिदोनचे सैनीक मिद्यानी सैनिकाचा पराभव करीन असा होते!’’ गिदोनने हे आयकून देवाची उपासना केली.

16. तारणारे — चित्र 12

मंग गिदोन आपल्या सैनिकायकडे परत आला अन् त्याने हरेकाले एक शिंग, एक मडकं अन् एक मशाल देली. मिद्यानी सैनिक झोपले होते त्या छावणीले त्यायनं घेरा घातला. गिदोनच्या 300 सैनिकायनं आपल्या मशाली मडक्यात घालून ठेवल्यामुळे मिद्यानी लोकायले त्याचा प्रकाश दिसला नाई.

16. तारणारे — चित्र 13

मग, एकाच वक्ती गिदोनच्या सैनिकायनं मडके फोडले अन् आपल्या मशालीची आग दिसू देली. त्यायनं आपली-आपली रणशिंगे फुकले अन् गर्जना केली, ‘‘यहोवा देवाची तलवार अन् गिदोनची तलवार!’’

16. तारणारे — चित्र 14

देवाने मिद्यानी लोकायले गोंधळून टाकले अन् त्यामुळे ते आपसातच एकमेकायवर हल्ले करु लागले अन् मारु लागले. लगेच, मिद्यानी लोकायले हाकलण्यासाठी मदत करायची म्हणून बाकीच्या इस्राएली लोकायले त्यायच्या घरी बोलावणे पाठवले गेले. त्यायनं त्यापैकी कित्येकायले जीवे मारले अन् बाकीच्यायले इस्त्राएलाच्या भूमितून घालवून देले. त्याच दिवशी 120000 मिद्यांनी सैनिक मारले गेले.देवाने इस्राएली लोकायची अशा प्रकारे सुटका केली.

16. तारणारे — चित्र 15

लोकं गिदोनले आपला राजा बनवाले पयत होते. गिदोनने त्यायले असे करण्यासाठी मना केले, पण त्यायच्या मधल्या हरेकाने मिद्यानी लोकायकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठयांपैकी काही त्याने मागतल्या. लोकायनं गिदोनले खूप सोने देले.

16. तारणारे — चित्र 16

मंग गिदोनने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या कपड्यासारखे एक विशेष कपडे तयार केले. पण लोकायनं त्या कपड्याले एक मूर्ती मानून तिची पूजा करु लागले. मग देवाने इस्राएली लोकायले परत दंड देला, कारण त्यायनं मूर्तिपूजा केली होती. देवाने त्यायच्या शत्रूंले त्यायचा पराभव करु देला. शेवटी त्यायनं देवाचीच मदत मागतली अन् देवाने त्यायच्यासाठी दुसरा तारणारा पाठवला.

16. तारणारे — चित्र 17

हया नमुन्याची खूप वेळा पुनरावृत्ती झाली. इस्राएली पाप करत होते, अन् देव त्यायले दंड देत होता, ते पश्चात्ताप करत होते अन् देव त्यायचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत होता. अनेक वर्षापासून, देवाने इस्त्राएली लोकायकडे त्यायले शत्रूंपासून सोडवण्यासाठी अनेक तारणारे पाठविले.

16. तारणारे — चित्र 18

शेवटी, लोकायनं दुसऱ्या देशासारखा राजा देवाकडे मागितला. त्यायले उंच, सशक्त अन् युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा पायजे होता. देवाले हे आवडले नाई, तरीपण त्याने त्यायच्या मागणी नुसार त्यायले एक राजा देला.

बायबल कथा :शास्ते 1 -39 ; 6 - 8

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।