17. देवाचा दाविद राज्या संग करार

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 1

शाऊल इस्त्रायलचा पहिला राजा होता. इस्राएली लोकायले पाहिजे तसाच तो सुंदर अन् ऊंच होता. इस्त्राएलवर काही वर्ष शाऊल राजाने चांगले राज्य केले. पण नंतर तो एक दुष्ट राजा बनला अन् त्याने देवाची आज्ञा मानली नाई, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या माणसाले निवडले.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 2

देवाने शाऊल नंतर दाविद नावाच्या एका इस़्त्रायली जवान पोराले राजा होण्यासाठी निवडले. दाविद हा बेथलेहेम नगरातला एक मेंढपाळ होता. आपल्या बापाची मेंढरे चारीत असताना दाविदाने अनेकदा मेंढरायवर हल्ला करणा-या सिंह अन् अस्वलाले जीवे मारले होते. दाविद हा देवाचे भय माननारा नम्र अन् धर्मी माणूस होता.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 3

दाविद लहान असतानाच त्याने गोलीयात नावाच्या एका लंब्या-चौड्या माणसासंग युद्ध केले. गोलीयात हा एक प्रशिक्षित, बलाढय अन् जवळपास नऊ फुट उंचीचा सैनिक होता! पण देवाने दाविदाची मदत केली अन् त्याच्याद्वारे गोलीयातले मारून इस्त्रायली लोकायले सोडवले. त्यानंतर दाविदाने इस्राएलाच्या शत्रूंवर अनेक विजय मिळवले, दाविद एक महान योद्धा बनला अन् त्यानं खूप साऱ्या युद्धामध्ये इस्रायली सैनिकाची अगुवाई केली. त्यामुळे लोकायनं त्याची प्रशंसा केली.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 4

लोकं दाविदाची प्रशंसा करत हाय हे पाऊन, शाऊल राजाले त्याचा हेवा वाटाले लागला. शाऊल राजाने खूप वेळा त्याले जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदने स्वताले शाऊल पासून लपविले. एका दिवशी शाऊल दाविदले मारण्यासाठी शोधत होता. दाविद लपून बसलेल्या गुहेमध्ये शाऊल गेला, पण शाऊल राजाले तो दिसला नाई. दाविद आता शाऊलच्या एकदम जवळ होता अन् तो त्याले मारु शकत होता, पण त्याने तसे केले नाई. त्याऐवजी, दाविदने शाऊलच्या कपड्याचा काठ कापला अन् शाऊल राजा जवा गुफेतून बायेर निघाला तवा दाविदने त्याले कपड्याचा कापलेला काठ दाखवला. अशा प्रकारे दाविदने सिद्ध केले की राजा बनण्यासाठी तो शाऊलचा वध करणार नाई.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 5

शेवटी काई दिवसानं शाऊल युद्धात मरण पावला अन् दाविद इस्त्रायलचा राजा झाला. तो खूप चांगला राजा होता अन् लोकं त्याच्यावर प्रेम करत होते. देवाने दाविदले आर्शिवादीत केले अन् तो यशस्वी झाला. दाविदने अनेक युद्ध केले अन् देवाने त्याची इस्त्रायली लोकायच्या शत्रूले पराजित करण्यासाठी मदत केली. दाविदने यरुशलेम शहर जिंकला अन् त्याले आपली राजधानी बनविली, जती तो रायला अन् शासन केले. दाविदाच्या कारकीर्दीत इस्त्रायल सामर्थ्यवान अन् श्रीमंत राष्ट बनला.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 6

दाविदले एक मंदिर बांधाचे होते, ज्याच्यामध्ये सर्व इस्राएली लोकं देवाची उपासना अन् बलिदान करु शकतीन. जवळपास 400 वर्ष लोकं मोशेने बांधलेल्या दर्शन मंडपाच्या समोर देवाची उपासना करत होते अन् बलिदान आणत होते.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 7

पण देवाने नाथान भविष्यवक्त्याले दाविदकडे संदेश घेऊन पाठवले, ‘‘तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाई. तूह्या पोरगा ते मंदिर बांधीन. पण मी तुले खूप आशीर्वादीत करीन. तुह्याच वंशातला एक माणूस माह्या लोकायवर सर्वकाळ राज्य करीन!’’ सर्वकाळ राज्य करणारा दाविदच्या वंशातला एकमात्र माणूस म्हणजे मसिहा होता. मसिहा हा देवाचा निवडलेला अभिषिक्त होता जो जगातल्या लोकायले त्यायच्या पापांपासून सोडवणारा होता.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 8

दाविदने हे शब्द आकल्यावर लगेच देवाचा धन्यवाद केला अन् त्याची स्तूती केली, कारण देवाने त्याले हा सन्मान अन् पुष्कळ आशीर्वाद देण्याची प्रतिज्ञा केली होती. देव हे कधी पूर्ण करीन ह्याबाऱ्यात दाविद राजाले कल्पना नव्हती. पण मसिहा येण्याच्या पयले इस्त्रायली लोकायले जवळपास 1000 वर्ष त्याची वाट पाहावी लागली.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 9

दाविद राजाने न्यायाने अन् विश्वासूपणाने अनेक वर्ष राज्य केले अन् देवाने त्याले आशीर्वादित केले. पण, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाच्या विरुध्द भयंकर पाप केले.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 10

एका दिवशी दाविद राजाचे सर्व सैनीक युद्ध करण्यासाठी बाहेर गेले होते, त्याने आपल्या राजमहालातून एका सुंदर बाईले आंघोळ करीत असताना पाहिले. तिचे नाव बथशेबा होते.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 11

दाविद राजाने त्या बाईले त्याच्याकडे आणावे, म्हणुन कोणाले तरी पाठवले. तो तिच्यापाशी झोपला अन् तिला तिच्या घरी पाठवून देले. काई दिवसानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविद राजाले पाठविला.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 12

बथशेबाचा नवरा उरीया, हा दाविद राजाचा शूर योद्धा होता. दाविदने उरीयाले युद्धातून परत बोलावले अन् आपल्या बायको बरोबर राहण्यास सांगितले. पण दूसरे सैनिक युद्ध करत असताना आपले घरी जाणे योग्य नाई, असे समजून त्याने घरी जाण्यास नकार देला. म्हणून दाविद राजाने उरीयाले परत युद्धामध्ये पाठवले अन् सेनापतीले सांगतले, की त्याने घोर युद्धाच्या ठिकाणी उरीयाची नेमणूक करावी, म्हणजे उरीया युद्धात मेला पायजे.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 13

उरीया मेल्यानंतर दाविद राजाने बथशेबा संग लग्न केले. नंतर तिने दाविदा राजाच्या पोराले जन्म देला. दाविदा राजाने केलेल्या कामाबद्दल देवाचा क्रोध भडकला, अन् त्याने नाथान भविष्यवक्त्याले दाविदाकडे पाठवून त्याचा पाप किती बेकार होता ह्याबाऱ्यात सांगतले. दाविदाने आपल्या पापाच्या बाऱ्यात पश्चाताप केला अन् देवाने त्याले क्षमा केले. नंतर मरेपर्यंत दाविद राजाने खूप कठिण वक्ती पण देवाच्या आज्ञा पाळल्या.

17. देवाचा दाविद राज्या संग करार — चित्र 14

पण पापाची शिक्षा म्हणून दाविद राजाचा पोरगा मरण पावला. दाविद राजाच्या उरलेल्या जीवनात, त्याच्या कुटुंबात नंतर झगडे होत राहिली अन् त्याचे सामर्थ्यही खुप कमी झाले. जरी दाविद देवाशी अविश्वासू राहिला होता, तरीपण देव आपले वचन पाळण्यासाठी दाविद राज्यासंग विश्वासू रायला. नंतर दाविद अन् बथशेबा यायले आणखी एक पोरगा झाला, अन् त्यायनं त्याचे नाव शलमोन असे ठेवले.

बायबल कथा : शमूवेल 10; 15-19; 24; 31; 2 शमूवेल 5 : 7; 11 - 12

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।