18. राज्याची विभागणी

18. राज्याची विभागणी — चित्र 1

ब-याच वर्षानंतर, दाविद राजा मरण पावला अन् त्याचा पोरगा शलमोन हा इस्त्राएलवर राज्य कराले लागला. देवाने शलमोन राजाले दर्शन देले अन् त्याले सर्वात जास्त काय पायजे, असे विचारले. जवा शलमोन राजाने बुद्धि मागितली तवा देव त्याच्यावर प्रसन्न झाला अन् त्याने त्याले जगातला सर्वांत ज्ञानी माणूस बनवले. शलमोन राजा अनेक गोष्टी शिकला अन् तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला. देवाने त्याले खूप श्रीमंत पण बनवले.

18. राज्याची विभागणी — चित्र 2

शलमोनचा बाप दाविद राजा याच्या योजनेप्रमाणे अन् त्याने जमवलेल्या साधन सामग्रीने शलमोन राजाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले. लोकं दर्शनमंडपासमोर उपासना न करता आता मंदिरामध्ये देवाची उपासना अन् बलिदान कराले लागले. देव मंदिरात आला अन् त्याची उपस्थिती त्या मंदिरामध्ये होती, अन् देव आपल्या लोकायमध्ये वस्ती कराले लागला.

18. राज्याची विभागणी — चित्र 3

पण शलमोन राजाने दुसऱ्या देशाच्या बायावर प्रेम केले. त्याने अनेक बायासंग लग्न करुन देवाची आज्ञा मोडिली. त्याने जवळपास 1000 बायासंग लग्न केला! त्यायच्यातून अनेक बाया दुसऱ्या देशाच्या होत्या. त्यायनं आपल्या देवीदेवताच्या मुर्त्या आपल्या बरोबर आणल्या अन् त्यायची पूजा करणे चालू ठेवले. शलमोन राजा बुढा झाल्यानंतर त्यानेपण त्यायच्या देवतायची पूजा केली.

18. राज्याची विभागणी — चित्र 4

देव शलमोन राजाने केलेल्या कामाच्या बाऱ्यात त्याच्यावर कोपला. त्याच्या हया अविश्वासूपणाबद्दल देवाने त्याले दंड देला. देवाने शलमोन राजाच्या मृत्यूनंतर इस्त्रायलच्या राज्याचे दोन भाग केले.

18. राज्याची विभागणी — चित्र 5

शलमोन राजाच्या मृत्यूनंतर त्याचा पोरगा रहोबाम हा राजा झाला. रहोबाम हा मूर्ख माणूस होता. इस्त्रायल देशातले सर्व लोकं त्याले राजा म्हणून मान्यता देऊन त्याचा राज्याभिषेक करण्यासाठी एकत्र आले. त्यायनं रहोबामकडे तक्रार केली की, शलमोन राजाने त्यायले खूप परिश्रम करण्यासाठी भाग पाडले अन् जास्त प्रमाणात कर वसूल केला. त्यायनं रहोबाम राजाले विनंती केली कि त्यायच्या पासून कमी काम करून घ्यावे.

18. राज्याची विभागणी — चित्र 6

रहोबामने मूर्खपणाने उत्तर देले, ‘‘तुम्हाले वाटले असेल की माह्या बाप शलमोन हयाने तुमच्याकडून परिश्रम करुन घेतले, पण मी तर त्याच्यापेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करुन घेईन अन् तुमच्या संग क्रूरतेने वागीन.’’

18. राज्याची विभागणी — चित्र 7

इस्त्राएल देशाच्या दहा गोत्रायनं एकत्र येऊन रहोबामाविरुद्ध बंड पुकारले. केवळ दोनच गोत्रे त्याच्यासंग विश्वासू राहिली. हे दोन गोत्रे मिळून यहूदाचे राज्य बनले.

18. राज्याची विभागणी — चित्र 8

इस्राएल देशाच्या अन्य दहा बंडखोर गोत्रानं यरोबाम नावाच्या माणसाले आपला राजा म्हणून नेमले. त्यायनं उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली अन् त्यायले इस्त्रायलचे राज्य असे संबोधण्यात आले.

18. राज्याची विभागणी — चित्र 9

पण यराबामने देवाविरुध्द बंड पुकारले अन् लोकायले पापात पाडले. यहूदाच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात उपासना न करता त्याने आपल्या लोकायसाठी दोन मूर्ति स्थापन केल्या अन् त्यायची पूजा करु लागले.

18. राज्याची विभागणी — चित्र 10

यहूदाचे राज्य अन् इस्त्रायलचे राज्य एकमेकायचे शत्रू झाले अन् त्यायच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.

18. राज्याची विभागणी — चित्र 11

इ‌स्त्रायलच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते. त्याच्यापैकी बऱ्याच राजायचा वध अन्य इस्त्राएली लोकायनच केला, जे त्यायच्या जागी राज्य कराले पायत होते.

18. राज्याची विभागणी — चित्र 12

सर्व राजे अन् इस्त्रायलच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा मूर्तीची पूजा कराले लागले. त्यायच्या ह्या मूर्तिपूजेमध्ये व्यभिचार अन् बालकांचे बलिदान याचा जास्त समावेश होता.

18. राज्याची विभागणी — चित्र 13

यहूदाचे राजे हे दाविद राजाच्या वंशातील होते. त्याच्यापैकी काही राजे चांगले होते. त्यायनं न्यायाने राज्य केले अन् ख-या देवाची उपासना केली. पण यहूदाच्या राजांपैकी अनेक राजे दुष्ट होते. त्यायनं भ्रष्ट होऊन मूर्तिपूजा केली. त्याच्यापैकी काही राजायनं तर स्वत:च्या लेकराचेपण बलिदान खोटया देवायसाठी केले. यहूदाच्या राज्यातल्या खूपसाऱ्या प्रजेने पण देवाच्या विरुध्द बंड करुन अन्य दैवतायची उपासना केली.

बायबल कथा :1 राजे 1 - 6; 11 - 12

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।