19. भविष्यवक्ते

19. भविष्यवक्ते — चित्र 1

इस्त्रायलच्या संपूर्ण इतिहासामध्ये, देवाने त्यायच्याकडे भविष्यवक्त्यायले पाठवले. भविष्यवक्ते देवाकडून संदेश आयकायचे अन् त्या संदेशाले लोकायपर्यंत पोहचवत होते.

19. भविष्यवक्ते — चित्र 2

जवा अहाब इस्राएल राज्यचा राजा होता तवा एलीया हा भविष्यवक्ता होता. अहाब हा एक दुष्ट राजा होता अन् त्याने लोकायले बालदेवाची उपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले. एलीयाने अहाब राजाले म्हतलं, ‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाई.’’ हे आयकून अहाब राजाले खूप राग आला.

19. भविष्यवक्ते — चित्र 3

अहाब राजा एलीया भविष्यवक्ताले मारून टाकण्याच्या प्रयत्नात होता, म्हणून देवाने एलीया भविष्यवक्ताले जंगलातल्या एका नाल्याजवळ लपून राहाले सांगतले. प्रत्येक दिवशी सकाळी अन् संध्याकाळी, पक्ष्यायच्या द्वारे देवाने त्याले जेवण पुरवले. अहाब राजा अन् त्याचे सैनीक एलीया भविष्यवक्ताले शोधत होते, पण त्यायले तो सापडला नाई.

19. भविष्यवक्ते — चित्र 4

दुष्काळ एवढा भयानक होता की शेवटी तो नाला पण आटला. म्हणून एलीया भविष्यवक्ता शेजारच्या देशामध्ये गेला. त्या देशात रायणारी एक विधवा बाई अन् तिचा पोरगा यायच्याकडे असलेली अन्नसामग्री दुष्काळामुळे संपत आली होती कावून कि तती शेती झाली नव्हती. पण त्यायनं एलीयाची काळजी घेतली. म्हणून देवाने त्यायच्या गरजा पूर्ण केल्या अन् त्यायच्या डब्यातले पीठ अन् कुप्पीतले तेल कधीच संपले नाई. संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत त्यायच्याकडे अन्न उपलब्ध होते. एलीया भविष्यवक्ता त्या ठिकाणी काई वर्षे रायला.

19. भविष्यवक्ते — चित्र 5

साडेतीन वर्षानंतर देवाने एलीया भविष्यवक्ताले इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठवणार हाय, याची अहाब राजासमोर घोषणा करायले सांगतले. जवा अहाबा राजाने एलिया भविष्यवक्ताले पाहिले तवा त्यानं म्हतलं, ‘‘तूच तो समस्या निर्माण करणारा हाय नं!” एलिया भविष्यवक्तानं त्याले उत्तर देले, ‘‘तूच समस्या निर्माण करणारा हायस! तू आपला खरा देव यहोवाले सोडून बालदेवतेची पूजा केली हायस. आता तू इस्त्रायल राज्याच्या सर्व लोकायले कर्मेल डोंगरावर घेऊन ये.’’

19. भविष्यवक्ते — चित्र 6

तवा इस्त्रायलच्या राज्यातले सर्व लोकं, बालदेवताच्या 450 भविष्यवक्त्यासहित कर्मेल डोंगराकडे आले. एलीयाने लोकायले म्हतलं, ‘‘तुम्ही किती वेळा आपले मन बदलत रायणार? जर यहोवा हा खरा देव असीन तर त्याचीच सेवा करा! अन् जर बाल हा देव असीन, तर त्याची सेवा करा!”

19. भविष्यवक्ते — चित्र 7

मंग एलीया भविष्यवक्ताने बालदेवताच्या पुजाऱ्यायले म्हतलं, ‘‘एका बैलाले बली करा अन् बलिदान होण्यासाठी वेदीवर ठेवा, पण त्याले आग लावू नका. मी पण तसेच करीन. जो देव अग्निच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.’’ अशा प्रकारे बालदेवतेच्या पुजाऱ्यायनं होमबली तयार केली, पण त्याले आग लावली नाई.

19. भविष्यवक्ते — चित्र 8

मग बालदेवताचे पुजारी बालकडे प्रार्थना करु लागले, ‘‘बालदेवता, आमचे आयक!’’ ते दिवसभर प्रार्थना करत होते अन् ओरडत होते, अत परेंत कि त्यायनं स्वत:ले चाकूने कापले, तरी पण त्यायले उत्तर मिळाले नाई.

19. भविष्यवक्ते — चित्र 9

शेवटी संध्याकाळच्या वक्ती एलिया भविष्यवक्ताने देवासाठी होमबली तयार केले. मग त्याने लोकायले बारा घागरी(पाणी भरण्याचे मोठे भांडे) पाणी त्या होमबलीवर अन् लाकडायवर ओताले सांगतले. इतके की होमबली अन् लाकडं अन् वेदीच्या भोवतालची जमीन पण पूर्णपणे भिजली.

19. भविष्यवक्ते — चित्र 10

मंग एलीया भविष्यवक्ताने प्रार्थना केली, ‘‘हे यहोवा देवा, अब्राहाम, इसहाक अन् याकोबच्या देवा, इस्त्रायलामध्ये तूच देव हाय अन् मी तुह्या सेवक हाय, हे सर्वांले दाखव. मले उत्तर दे, म्हणजे तूच खरा देव हाय, अशी ह्या लोकायले खात्री होईन.”

19. भविष्यवक्ते — चित्र 11

तवा तुरंत अभायातून आग उतरली अन् त्याने होमबली, लाकडं, धोंडे, माती अन् त्या खळग्यातले पाणी पण भस्म करुन टाकले. हे पाहून सर्व लोकं जमिनीवर पालथे पडून म्हणाले, “यहोवा हाच देव हाय! यहोवा हाच देव हाय!”

19. भविष्यवक्ते — चित्र 12

तवा एलीया भविष्यवक्तानं त्या लोकायले म्हतलं, ‘‘बाल देवताच्या पुजाऱ्यायले पकडा; त्यायच्यातल्या एकाले पण निसटून जाऊ देऊ नका!’’ तवा त्यायनं त्यायले पकडले; अन् त्यायले दूर नेऊन मारून टाकले.

19. भविष्यवक्ते — चित्र 13

मग एलीया भविष्यवक्तानं अहाब राजाले म्हतलं, ‘‘लवकर नगरात जा कारण पाऊस येत हाय.’’ लगेच अभायामध्ये काळे ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडू लागला. यहोवा देवाने अशाप्रकारे दुष्काळ संपवला अन् तोच खरा देव हाय, हे सिद्ध केले.

19. भविष्यवक्ते — चित्र 14

एलीया भविष्यवक्ता नंतर देवाने अलीशा नावाच्या माणसाले आपला भविष्यवक्ता म्हणुन निवडले. देवाने अलीशा भविष्यवक्ता द्वारे अनेक चमत्कार केले. एक चमत्कार, त्याच्या देशाचा शत्रु, सेनापती नामान, याच्यासाठी झाला. त्याले एक भयंकर चर्मरोग होता. त्याने अलीशा भविष्यवक्ताच्या बाऱ्यात आयकले होते, म्हणून तो त्याच्याकडे गेला अन् मले बरे करा अशी विनंती केली. अलीशा भविष्यवक्ताने नामानले यर्दन नदीमध्ये सात वेळा डुबकी मारण्यासाठी सांगतले.

19. भविष्यवक्ते — चित्र 15

सुरुवातीले नामानले राग आला अन् असे करण्यासाठी तो तयार झाला नाई, कारण ते त्याले मूर्खपणाचे वाटले. पण नंतर त्याने आपले मन बदलवले अन् त्याने यर्दन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारली. जवा सातव्या वेळी त्याने डुबकी मारली तवा त्याचे कोड पूर्णपणे बरे झाले! देवाने त्याले बरे केले होते.

19. भविष्यवक्ते — चित्र 16

देवाने इस्रायली लोकायजवळ दुसऱ्या अनेक भविष्यवक्त्याले पण पाठवले. त्या सगळ्यायनं लोकायले मूर्तीपूजा बंद करा अन् दुस-यायले न्याय अन् दया दाखवा असे सांगतले. भविष्यवक्त्यायनं त्यायले इशारा दिला, की जर त्यायनं आपला बेकार मार्ग सोडून देवाच्या आज्ञा पाळल्या नाई, तर देव त्यायले दोषी ठरवून त्यायले शिक्षा करीन.

19. भविष्यवक्ते — चित्र 17

पुष्कळ वेळा लोकायनं देवाच्या आज्ञा पाळल्या नाई. त्यायनं नेहमी भविष्यवक्त्यायचा अपमान केला अन् कधी कधी त्यायले जीवे मारले. एकवेळा त्यायनं यिर्मया भविष्यवक्त्याले मारण्यासाठी त्याले कोरड्या विहिरीमध्ये ढकलून देले. विहिरीच्या तळात असलेल्या गाळामध्ये तो फसला, पण नंतर राजाले त्याची दया आली अन् तो मरण्यापुर्वी त्याले बाहेर काढण्याची त्याने त्याच्या सेवकायले आज्ञा देली.

19. भविष्यवक्ते — चित्र 18

जरी लोकं त्यायचा द्वेष करत होते, तरी भविष्यवक्ते देवाकडून बोलत रायले. त्यायनं लोकायले सावधानतेचा इशारा देला की जर त्यायनं पश्चाताप केला नाई, तर देव त्यायचा नाश करीन. देवाच्या प्रतिज्ञा प्रमाने मसिहा (ख्रिस्त) येणार हाय, याचीही त्यायनं लोकायले आठवण करुन देली.

बायबल कथा :1 राजे 16 - 18; 2 राजे 5 ; यिर्मया 38

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।